Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकूंची हि अनोखी कला पाहून तुम्हीही थक्क व्हाल, बघा डोळ्यावर विश्वास न बसणारा हा व्हिडीओ

ह्या काकूंची हि अनोखी कला पाहून तुम्हीही थक्क व्हाल, बघा डोळ्यावर विश्वास न बसणारा हा व्हिडीओ

आपल्या प्रत्येकाचे आवडते असे काही कलाप्रकार असतात. यातील एक कलाप्रकार मात्र आपल्या सगळ्यांनाच आवडतो, भावतो आणि आपल्या आयुष्यात नेहमी आपल्या सोबत असतो. संगीत हा तो कलाप्रकार. त्याच्या कितीही नानाविविध तऱ्हा आपण अनुभवत असतो आणि आनंद उपभोगत असतो. हे संगीत मग शब्दांत गुंफलेलं असू दे किंवा केवळ ताल सुरांनी. ते श्रवणीय वाटतं. आपल्या टीमने आज असा एक व्हिडियो पाहिला ज्यातून संगीताची जादू अनुभवता येते ती जलतरंग या माध्यमातून. या व्हिडियोविषयी आणि त्यातील व्यक्तींविषयी सुद्धा आपल्या वाचकांना जाणून घ्यायला आवडेल असं वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे.

हा व्हिडियो आहे जलतरंग विदुषी म्हणून ज्या विख्यात झाल्या आहेत त्या शशिकला दानी यांचा. शशिकला यांना संगीत कलेचे बाळकडू मिळाले ते त्यांच्या वडिलांकडून. अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीत साधनेला सुरुवात केली. हळूहळू त्यांना जलतरंग या वाद्याविषयी असलेलं कुतुहुल वाढू लागलं. याच आवडीतून त्यांनी हे वाद्य अतिशय तन्मयतेने शिकून घेतलं.

पुढेही त्यांची ही तपस्या सुरू झाली आणि यथावकाश त्या या वाद्यामुळे विदुषी म्हणून लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या या तपस्येसाठी त्यांना संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत पुरस्कार मिळाले आहेत. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थी सुदधा घडवले आहेत आणि आजही घडवत आहेत. या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी म्हणजे त्यांचा मुलगा सुग्नन दानी हे होय. पेशाने इंजिनिअर असले तरी मनाने कलाकार असणारे सुग्नन हे स्वतः उत्तम जलतरंग वादक आहेत आणि त्यांच्या आईप्रमाणे कलोपासक आहेत. त्यांच्या या वादनाची झलक त्यांच्या युट्युब चॅनेल वरून अनुभवता येते. तसेच शशिकलाजींच्या कलेला ही अनुभवता येतं. याच कलेचा एक उत्तम नमुना म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला वायरल व्हिडियो. या व्हिडियोत आपल्याला शशिकला जी या एका बैठकीवर बसलेल्या दिसून येतात. त्यांच्या समोर अर्ध गोलाकार आकारात जलतरंग वाद्य म्हणून अनेक भांडी व्यवस्थित ठेवलेली दिसून येतात. या व्हिडियो साठी त्यांनी शंकर महादेवन या आपल्या लाडक्या संगीतकाराचं ‘ब्रेथलेस’ हे गाणं निवडलेलं असतं.

प्रत्येक कलाकाराचं स्वतःचा असा एक मास्टर पीस परफॉर्मन्स किंवा कलाकृती असते, ज्यांमुळे त्यांना अनेक वर्षे ओळखलं जातं. शंकरजींनी संगीत क्षेत्रात किती उत्तुंग योगदान दिलेलं आहे हे वेगळं सांगायला नको. पण आजही ब्रेथलेस म्हंटलं की क्षणार्धात त्यांचं नाव आपल्या डोळ्यांसमोर येतं. तर अशा उत्कृष्ठ गाण्यावर शशिकलाजी परफॉर्मन्स देणं सुरू करतात. हा व्हिडियो जसजसा उलगडत जातो, तस तसं शशिकलाजींना विदुषी ही उपाधी का मिळाली असेल याचा आपण अनुभव घेत असतो. अगदी लीलया फिरणारे त्यांचे हात समोरील पाणी भरलेल्या भांड्यांमधून श्रवणीय स्वर उत्पन्न करत असतात. या गाण्याची सगळ्यांत महत्वाची बाब म्हणजे त्याचा वेग. शशिकलाजी त्या वेगाशी जुळवून घेण्यात यशस्वी होतातच, तसेच त्या अगदी सहजतेने हे करतात. या सहजतेचं कौतुक वाटत राहतं. अर्थात आपल्या डोळ्यांना सहज वाटणाऱ्या या गोष्टींसाठी त्यांची कित्येक दशकांची तपश्चर्या कारणीभूत आहे. या काळात त्यांनी केलेली संगीत साधना आता युट्युबच्या माध्यमातून आपल्या समोर येते आहे.

श्रेय जातं ते अर्थातच त्यांच्या मुलाला सुग्नन यांना. या लेखाच्या निमित्ताने त्यांचे मनःपूर्वक आभार, त्यांनी चित्रित केलेल्या या व्हिडियोमुळे एक श्रवणीय आनंद घेता आला. तसेच शशिकलाजींना आमच्या टीमचा मानाचा मुजरा. आपण संगीत क्षेत्राची इतकी दशके जी अविरत सेवा करत आहात त्याबद्दल मानाचा मुजरा. तसेच येत्या काळातही आपल्या विविध कलाकृती आम्हाला आणि आमच्या वाचकांना अनुभवायला मिळोत ही सदिच्छा.

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते. या आमच्या प्रयत्नांना आपण सगळे वाचक मंडळी उत्तम प्रतिसाद देत असता. आपल्या कमेंट्स मधून प्रोत्साहन, सूचना या मिळत राहतात ज्यांमुळे आपली टीम नेहमी सुधारणा करत राहते. तसेच नवीन विषय हाताळण्यासाठी ऊर्जा ही मिळते. तेव्हा आपला हा पाठिंबा आपल्या टीमच्या पाठीशी कायम असू द्या ही विनंती. आपल्या टीमवर कायम लोभ असावा ही सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *