Breaking News
Home / जरा हटके / ह्या काकूंचे हे अज’ब कौशल्य पाहून तुम्हीसुद्धा थ’क्क व्हाल, बघा व्हिडीओ

ह्या काकूंचे हे अज’ब कौशल्य पाहून तुम्हीसुद्धा थ’क्क व्हाल, बघा व्हिडीओ

प्रत्येक माणसांत काही ना काही कला किंवा कौशल्य असते हे आपण जाणतोच. म्हणजे नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प या कलांसोबतच इतरही काही कला कौशल्यं असतात जी, काहीच व्यक्तींना अवगत असतात. यातील काही कौशल्यं ही उपजत असतात तर काही कौशल्यं ही शिकावी लागतात. एक मात्र खरं की सोशल मीडियामुळे आपल्याला अशा अनेक लोकांबद्दल घर बसल्या जाणून घेता येतं ज्यांच्यात असे वेगळे आणि उल्लेखनीय असे गुण, कला, कौशल्यं आहेत. आता एका वायरल व्हिडियोचं घ्या ना. हा वायरल व्हिडियो कोंकणातील किंवा गोव्यातील वाटतो. या व्हिडियोत एका काकूंनी आपलं धा’रदार कौशल्य दाखवून उपस्थितांना आणि हा व्हिडियो बघणाऱ्यांना आ’श्चर्यचकित करून सोडलं होतं. धा’रदार कौशल्य म्हणजे चा’कू, सु’रे किंवा त’लवार चालवण्याचा प्रयोग असं काही नाहीये. किंबहुना त्यांच्यापेक्षाही भन्नाट गोष्ट आहे.

काकूंनी केवळ दातांच्या साहाय्याने एक अख्खा नारळ सोलून दाखवला आहे. खरंच विश्वास बसत नाही हे सगळं वाचून. पण खरं आहे. हा व्हिडियो सुरू होतो आणि या काकू त्या नारळाची सालं काढण्यास सुरुवात करतात. पहिल्या काही सेकंदातच कॅमेऱ्यामागुन ‘ओह शी’ट’ असा आवाज येतो. आपलीही तीच प्रतिक्रिया असते आणि तीसुद्धा नेमकी त्याच वेळेस आलेली. एरवी जो नारळ सोलायला धार काढलेला को’यता किंवा सु’रा लागतो तो नारळ या काकू दातांनी सोलत असतात. या व्हिडियोच्या दोन मिनिटांच्या कालावधीत काकू संपूर्ण नारळ सोलून काढतात. या काळात कॅमेऱ्यामागील व्यक्तींकडून त्यांना प्रोत्साहन मिळत असतंच. तसेच त्या ज्या पद्धतीने नारळ सोलत असतात त्याचंही विश्लेषण चालु असतं. दातांसोबतच हातांचाही तेवढाच उत्तम वापर काकू करतात असं आपल्या कानावर पडतं आणि ते आपल्याला पटतंही. बरं हे सगळं होत असताना काकूंशी काही जण बोलण्याचाही प्रयत्न करत असतात. नारळ सोलता सोलता काकू या ओळखीच्यांना उत्तरंही देत असतात याविषयी त्यांचं अजून विशेष कौतुकंच. दोन मिनिटांच्या शेवटी शेवटी कॅमेऱ्यामागून मग त्यांना थांबण्यास संगीतले जाते असं वाटतं. तरीही त्या आपल्या कामात मग्न असतात.

पण शेवटी काही सेकंदांनी थांबण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात थकवा जाणवत असतो पण तरीही काम पूर्ण केल्याचं समाधानही दिसत असतंच. तेवढ्यात बाजूने कोणी तरी काही विनोद करतात आणि काकू हसतात आणि व्हिडियो संपतो. या संपूर्ण व्हिडियोत कॅमेऱ्यामागून जशी काकूंची प्रशंसा होत असते तशीच प्रशंसा कळत नकळत आपल्याही तोंडून निघत असते. कारण एरवी को’यता वापरत जबरदस्त जोर काढून ज्याला सोललं जातं तो नारळ सोलण्याचं काम मानवी दातांनी करताना पाहून आ’श्चर्य वाटतंच राहतं. आज या काकू कुठे असतील माहीत नाही किंवा त्यांच्या पर्यंत आमचा हा लेख पोहोचेल की नाही कल्पना नाही, पण त्यांना या लेखामार्फत आमच्या मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. केवळ एकच विनंती जर आजही त्या हे काम करत असतील तर त्यांनी स्वतःला सांभाळावे, तब्येत जपावी. तसेच या काकूंना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणार्या कॅमेऱ्यामागील व्यक्तींनाही धन्यवाद !

तुम्हाला हा लेख आवडला असल्यास नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात लेख शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या टीमने लिहिलेल्या अन्य वायरल व्हिडियोज वरील लेखांचाही आनंद घ्या. त्यासाठी आमच्या वे’बसाई’टवरील स’र्च मध्ये जाऊन वायरल असं लिहून स’र्च करा. मग आपल्याला विविध मनोरंजक लेख वाचायला मिळतील. आपल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *