Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकूंनी अक्षय कुमारच्या ‘बाला बाला’ ह्या गाण्यावर केलेला डान्स होतोय खूपच लोकप्रिय, बघा व्हिडीओ

ह्या काकूंनी अक्षय कुमारच्या ‘बाला बाला’ ह्या गाण्यावर केलेला डान्स होतोय खूपच लोकप्रिय, बघा व्हिडीओ

‘तकलिया’…. ‘तेरा बाप टकल्या’ !!! हे वाक्य वाचून काही आठवलं. अहो आठवेल नाहीतर काय. ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातला गाजलेला डायलॉग. पुढे त्यावर किती मिम्स बनले नी त्यांचा चिडवा चिडवी साठी कसा उपयोग झाला, हे काही वेगळं सांगायला नको. हा डायलॉग ज्या गाण्यासोबत ऐकला गेला ते गाणंही भलतंच गाजलं. इतकं की आजतागायत या गाण्याला टी सिरीजच्या युट्यु’ब चॅ’नेलवर जवळपास ६० कोटी लोकांनी पाहिलेलं आहे. यावरून या गाण्याची लोकप्रियता लक्षात यावी. पण तुम्ही म्हणाल आज अचानक यांची आठवण व्हावी असं काय झालंय?

तर आमच्या टीमने पाहिलाय एक व्हिडियो. तो ही एका हळदी कुंकू समारंभाच्या वेळचा. बहुतेक को’विड पूर्वीचाच व्हिडियो असावा. हा व्हिडियो आधारलेला आहे ‘बाला बाला’ या गाण्यावर आणि या गाण्यावर असा काही भन्नाट डान्स केला गेलाय की त्यावर लेख लिहावा असं मनापासून वाटलं.

बरं, सहसा तरुण मुलं-मुली, काका-मामा मंडळी या अशा तडकट्या फडकत्या गाण्यांवर डान्स करताना दिसतात. पण यात चक्क एका काकूंनी अगदी धमाल उडवून दिली आहे. काय आवेशात नाचल्या आहेत काकू. व्हिडियो सुरू होतो तेव्हा गाणं नुकतंच सुरू झालेलं असतं. काकूंनी डान्स करायला सुरुवात केलेलीच असते. पण जस जसा डान्स पुढे सरकत जातो तस तसा काकूंना मिळणारा प्रतिसाद पण वाढत जातो. इतका हा डान्स सगळ्यांना आवडल्याचं जाणवतं. इतकं की आधी त्यांच्या मागे बसलेल्या बहुतांश स्त्रिया त्यांच्या समोर येऊन उभ्या राहतात. त्यांनी चेहऱ्यावर दाखवलेले हावभाव टिपण्यासाठी म्हणून एक ताई चट्कन जागा बदलतात. मागे बराच वेळी बसलेली एक ताईसुद्धा टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देत देत, औत्सुक्याने पुढे येते. सगळी धमाल असते. आणि ही धमाल उडवून देण्याचं श्रेय जातं ते या काकूंना. त्या मस्त ४८ सेकंद नाचत असतात. एवढी मजा घेत असतात की जेव्हा डान्स संपतो तेव्हा तर त्यांना ही हसल्यावाचून राहवत नाही.

डान्स करताना तो मनमोकळेपणाने केला तर तो सगळ्यांना आवडतोच. मग त्यात आपणही आलोच. एरव्ही डान्स व्यवस्थित येवो अथवा न येवो, पण मनमुराद डान्स केलात तर किती बरं वाटतं. या काकूंच्या चेहऱ्यावर पण तेच दिसून येतं जेव्हा त्या डान्स थांबवतात. तसेच उपस्थित स्त्रियांमध्ये ही ते दिसून येतं. इथे काकू नाचत असतात पण मनातल्या मनात का होईना इतर स्त्रियाही डान्स करत असतातच. काहींना असंही वाटलं असेल की आपणही यांच्यासारखं नाचावं, कोण जाणे. एरवी हळदी कुंकू म्हंटलं की काही ठराविक ठोकताळ्यातला समारंभ डोळ्यांसमोर उभा राहतो. पण या काकू स्वतःच्या डान्स ने मात्र नूर पालटतात. पण त्यामुळे मजाच येते. त्यामुळे सध्या तरी या व्हिडियोतल्या या ‘काकू रॉक्स आणि बाकी सगळे शॉक्स’ अशी परिस्थिती आहे. आपल्याला ही हा व्हिडियो बघितल्या नंतर आवडला असेलच. तसाच हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा लेख शेअर करायला विसरू नका. सकारात्मक कमेंट्स करून तुम्ही आपल्या मराठी गप्पा टीमला जे प्रोत्साहन देत असता, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आपला लोभ यापुढेही कायम असू द्यावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.