Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकूंनी केलेला हा अतरंगी नागीण डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या काकूंनी केलेला हा अतरंगी नागीण डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आपल्यापैकी प्रत्येकाला गायन आणि नृत्य या कलांची प्रचंड आवड असते. अर्थात त्यांचं सादरीकरण करायला मात्र आपल्याला आवडत नाही. साहजिकच आहे म्हणा ! आपला गळा गोड नसून ते नरड आहे असा प्रत्येकाचा गैरसमज असतो त्यामुळे गाणं वगैरे गाण्याच्या फंदात कोणी पडत नाही. त्यातही सगळ्यांच्या समोर गाणं तर नाहीच. तीच बाब डान्सची ! आपण नाचायला लागलो तर कसे दिसू, लोकं हसतील या विचारांपायी आपण डान्स वगैरे करायला जात नाही. केलाच तर ओळखीचे लोक असतील तर ठीक आहे.

पण खरं सांगायचं तर मंडळी, गायन असो डान्स असो वा इतर कोणतीही कला असो. इतरांना आनंद होतोय की नाही या एव्हढंच महत्व आपल्या स्वतःला आनंद होतोय की नाही यात असतो. बरं हा आनंद उपभोगण्यासाठी आपण उत्तम कलाकार असावे अशी काही अट नसते. अगदी डान्सच्या बाबतीत तर नसतेच नसते. कारण ही अशी एक कला आहे की जिला कितीही नियमांत बांधून ठेवलं तरी बांधता येत नाही. तिच्यात नवनवीन गोष्टी या घडतच असतात. तसेच आपल्याला आवडेल तसा डान्स केला म्हणून कोणाचाही आक्षेप असण्याचं कारण नसतं. उलट हा डान्स मजेशीर असेल तर बघणारी व्यक्ती ही याचा कित्येक पटीने आनंद घेताना दिसते. आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या ना मंडळी !

हा व्हिडियो खरं तर आहे काही वर्षांपूर्वीचा ! फारसा वायरल ही न झालेला ! पण त्यातील जो डान्स आहे ना तो धमाल आणतो. इतकी धमाल की आपल्या टीमला हा व्हिडियो बघताच क्षणी याविषयी लिहावं अस वाटून गेलं. मग काय, त्यातूनच आजचा हा लेख लिहिला जातो आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक भला मोठा मंच दिसून येतो. काही प्रतिष्ठित व्यक्तींनी एखादा कार्यक्रम आयोजित केलेला असावा असं लक्षात येतं. पण चित्रीकरण करणाऱ्याच्या कॅमेरा सतत हलता असल्याने नीटसं काही कळत नाही. असो. पण अस असलं तरी या भल्या मोठ्या मंचावर आपल्याला निवेदक आणि काही स्वयंसेवक दिसून येतात. तसेच काही स्त्रिया ही दिसून येतात. या कार्यक्रमानिमित्त काही खेळ आयोजित केलेले असणार हे आपण ताडतो. अशावेळी सहसा डान्स करण्याचे किंवा काही छोटे खेळ असतात. इथेही तसच असतं. डान्सची छोटेखानी स्पर्धा असावी असं वाटतं. पण या छोटेखानी स्पर्धेतही एक स्पर्धक अशी काही धमाल आणतात की विचारू नका. आपण तर ही धमाल केवळ व्हिडियोच्या मार्फत बघतो. पण तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना ही धमाल तिथे स्वतः पाहता येते. त्यांना किती मजा आली असेल याची कल्पना करून बघा.

बरं हा व्हिडियो तसा कमी वेळेचा आहे. अगदी एका मिनिटापेक्षा ही कमी वेळेचा आहे. पण इतका धमाल आहे की आपण हा वारंवार पाहतो आणि त्यात काही मिनिटं निघून जातात. पण ही मिनिटं वाया जात नाहीत. उलट मस्त मजा येते. ही मजा येते ती वर उल्लेख केलेल्या स्पर्धकामुळे ! या स्पर्धक एक ताई असतात. त्यांना एका गाण्याच्या धून वर नाचायचं असतं. बरं वाजवणारे पण लोकप्रिय अशी धून वाजवतात. ‘नागीण डान्स’ साठी प्रसिद्ध असलेली ही धून असते. आता नागीण डान्सची धून म्हंटल्यावर नागीण डान्स होतोच. या ताई असा काही नागीण डान्स करतात की हसून हसून पोट दुखायला लागतं. सुरुवातीला एका हाताची नागीण मग आपसूक दोन हातांची होते. या दरम्यान या ताईंनी बिट्स ही चांगल्या पकडलेल्या असतात. इतक्या की त्यांचा डान्स आणि बिट्स यांचा मस्त ताळमेळ बसून जातो. इतकी धमाल येते आणि त्यात कीबोर्ड वाजवणारे शेवटी शेवटी अजून मस्त धमाल आणतात.

शेवटी त्या निवेदकाला राहवत नाही. कौतुक म्हणून तो या ताईंना काही तरी सांगतो आणि ताईंसकट सगळे जण हसायला लागतात. आता हे निवेदक भाऊ काय बोलतात हे जाणून घ्यायला आपल्याला हा व्हिडियो बघायला हवा. आपण एव्हाना हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला या व्हिडियोचा आनंद घेता आला असेलच. पण आपण हा व्हिडियो नसेल बघितला तर जरूर बघा. आपली टिम हा व्हिडियो खाली शेअर करेलच. असो.

वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या टीमला हा व्हिडियो खूप भावाला. मजेशीर वाटला. आपल्याला ही आवडेल म्हणून त्यावर लेखनही केलं आहेच. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.