आजकाल कोणताही कार्यक्रम असला तरी देखील लोक नाच-गाण्याचा कार्यक्रम ठेवतात. कारण त्याच्याशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. अशातच लोक देखील संधीचा चांगला फायदा घेतात आणि आपल्या जीवनाचा आनंद उचलतात. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये 3 काकू डान्स करण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. आणि हा डान्स काकूंच्या एका विशेष स्टाईलमुळे फेमस झालेला आहे.
डान्सची क्रेझ तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच पाहायला मिळत आहे. नाचण्यासाठी वय नसते हे सोशल मीडियाने सिध्दही केले आहे. व्यक्ती कोणत्याही वयात कोणत्याही प्रकारचे नृत्य करू शकते. इंटरनेटवर दररोज असे हजारो व्हिडिओ शूट करून चर्चेत येतात. ज्यामध्ये लहान मुले, तरुण आणि वृद्ध लोकांच्या जबरदस्त डान्सचे व्हिडिओ लोकांना चकीत करतात.
असाच एक रॉकिंग डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक काकू थेट रस्त्यावर लग्नात धुमाकूळ घालत नाचताना दिसत आहे. त्यांची एनर्जी तर भयंकर आहेच पण त्यांनी ज्या पद्धतीने ग्रॅव्हिटीला तोड देत मायकल जाक्सनसारखा तुफान डान्स केला आहे. अर्थात ही ग्रॅव्हिटीला तोडून नाचण्याची देशी स्टाईल होती.
लग्न म्हटलं तर डान्स हवाचं. डान्सशिवाय प्रत्येक लग्न अपूर राहत असं म्हणायला हरकत नाही. सध्या लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे लग्नात डान्स नसेल, तर त्या लग्नाला काही धमाल नसते. लग्नात वऱ्हाडी तुफान डान्स करतात. शिवाय वधू-वराच्या डान्सकडे देखील पाहुण्यांचं लक्ष असते. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये वधू-वर नाही, तर एक काकू आहेत, ज्यांच्यासोबत अख्ख महिला मंडळ थिरकताना दिसत आहे.
आणि या महिला मंडळाचा डान्स पाहून फक्त सासूच नाही तर, जमलेले सगळे थक्क झाले. लोकांचे जाऊ द्या पण त्यांना चक्क गुरुत्वाकर्षणाचे सुद्धा भान राहिलेले नाही. इतक्या बेभान व बेधूंद होऊन नाचणाऱ्या महिलांच्या आत्मविश्वाससचे कौतुक करताना नेटकर्त्यांना शब्दच कमी पडत आहेत पण त्याहीपेक्षा जास्त कौतुकांचा वर्षाव या महिलांच्या भन्नाट स्टेप्स वर होत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्टेप्स नाही बरं तर या महिला हावभावांच्या बाबतही एकदम सरस आहेत. तुम्ही कमेंट बॉक्स पाहिल्यास पोट धरून हसाल, एकाने न्यूटन सुद्धा या महिलांसमोर फिका पडेल असे म्हंटले आहे तर एकाने वो स्त्री है कूच भी कर सक्ती है अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
बघा व्हिडीओ :