तुम्ही कितीही मोठे व्हा…. तुमच्यालं ते लहान खट्याळ बाळ असतं ना त्याला कधी मोठं होऊ देऊ नका… त्याच्याशी कधी खोटं वागू नका. त्याला त्याच्या म्हणण्याप्रमाणं जगू द्या… मग बघा काय धम्माल घडते ती. अशीच धम्माल या काकूंनी उडवून दिलीयं. त्यांच्या आवडीचं गाणं लागलं आणि त्यांनी एकदम बारच उडवून दिला. बेभान, बेफाम होऊन त्या नाचत सुटल्या. ना कुणी काय म्हणेल याची फिकीर केली की सासूबाई ओरडेल नवरा हाताला धरून ओढून नेईल याची पर्वा केली. खरंतरं इतका सुंदर डान्स पाहून कुणी आलंचं नाही. आल्या त्या ताल धरायला तिच्या मैत्रीणी. तिनंही ठेका धरला. काकूंनी मैत्रिणीलाही स्टेप शिकवली. गर्रर्र गर्रर्र फिरकी घेत काकू निघाली एक चक्कर मारून पुन्हा तिथंच स्थिरावली. काकूनं काहीबी इपरित नाही केलंयं मनाला वाटलं ते करुन दाखवलं.
इतकी वर्षं झाली संसाराला पण चूल मूल रांधा वाढा उष्टी काढा, या सगळ्यात तिला आपल्या मनातल्या बाळाकडं लक्षच देता आलं नाही. कधीतरी लहानपणी लग्नाच्या वरातीत किंवा अशाच एखाद्या कार्यक्रमात बालपणी काकू बेफाम बेभान होऊन नाचल्या असतील. तेव्हा कदाचित आईनं पाठीत धपाटा घालून परत घरी पाठवलं असेल. तरुणपणी अशाच कुठंतरी पोराटोरांच्या घोळक्यात काकू नाचल्या असतील पण तेव्हाही तरण्या पोरीचा डान्स कुणाला रुचला नसेल. आपण अशा सोसायटीत राहतो जिथं लोक काय म्हणतील, या विचारानंच अर्धी हौसमौज पाण्यात सोडावी लागते. काकू त्याला अपवाद कशा असतील. आज मात्र, काकूंना एकदम चान्स भेटला होता. माहौल भी है, दस्तूर भी है आणि आज हात धरून शांत बस असं सांगणारंही कुणीच नव्हतं आजूबाजूला काकूंच्या आनंदाला पारावार उरला नव्हत्या.
त्यांनी अस्सा काही ठेका धरला की त्यांनी भल्याभल्यांना तोंडात बोट घालून थक्क करायला लावलं. अहो आपल्या कॉलेजातल्या पोरंपोरी फेल होऊन राहिल्यात असला भारी डान्स पाहून कुणीही थक्क व्हाल. म्युझीक थांबवलं तसं काकूंनी स्वतःला सावरलं. पण पुन्हा एकदा नवं गाणं सुरू झालं आणि त्या गाण्याच्या रिदमवर काकूंनी पुन्हा एकदा ताल धरला. पुन्हा धमाका आणि पुन्हा एकदा सुरू झाला नृत्याचा अविष्कार हे सगळं त्या मनातल्या लहान बाळामुळं तुमच्याही मनातल्या बाळाला कधीतरी असं मोकळं सोडून बघा. स्वतःला कुठेतरी स्वतःच्याच उंचीवर जाऊन भेटाल. हा व्हीडिओ कसा वाटला ते आम्हाला कळवा.
बघा व्हिडीओ :