Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकूंनी सर्वांसमोर केला अप्रतिम झिंगाट डान्स, काकूंचा उत्साह तर तरुणींनाही लाजवेल

ह्या काकूंनी सर्वांसमोर केला अप्रतिम झिंगाट डान्स, काकूंचा उत्साह तर तरुणींनाही लाजवेल

काही चित्रपट असे असतात की ज्यांची मोहिनी काही केल्या कमी होत नाही. ते कधीही बघावयास मिळाले तरी प्रेक्षकांची ते बघण्याची तयारी असते. या मांदियाळीतील एक चित्रपट म्हणजे सैराट. मागच्याच आठवड्यात असं झालं की झीच्या एका वाहिनीवर सुरुवातीस या चित्रपटावर आधारित एक प्रहसन दाखवलं गेलं होतं. त्यानंतर लगेचच हा चित्रपट दाखवला गेला. त्यामुळे त्या प्रहसनाची आणि मूळ चित्रपटाची अशा दोहोंची मजा घेता आली. एवढं झाल्यावर मग वातावरण सैराट न होतं तरच नवल. आपली टीमसुद्धा मग सैराटच्या महोलात गेली. फायदा असा झाला की यानिमित्ताने एक जुना वायरल व्हिडियो बघण्यात आला. हा व्हिडियो आहे जवळपास चार वर्षांपूर्वीचा. म्हणजे सैराट प्रदर्शित झाल्यापासून काही काळानंतरचा. या चार वर्षांच्या काळात या व्हिडियोला जवळपास सवा करोडहुन अधिक प्रेक्षक लाभले आहेत. या व्हिडियोत आपल्याला एक ताई भेटतात. तो दिवस एखाद्या कार्यक्रमाचा असावा. कारण सगळ्या महिला एकत्र जमलेल्या असतात. छान गोलाकार उभ्या असतात या सगळ्या ताया माया. त्यांच्या या गोलकारात उभ्या असतात आपल्या ताई. सोबत वाजत असतं सैराटचं प्रसिद्ध गाणं – झिंगाट.

हे गाणं असं आहे की निरुत्साही माणसाला सुदधा नाचावंस वाटेल. या ताई तर उत्साही असतात त्यामुळे त्या मस्त नाचायला सुरुवात करतात. आधी जागेवर काही स्टेप्स करत नाचतात. गाणं जस जसं पुढे जातं, तस तसं मग त्या अजून खुलून नाचायला लागतात. त्या गाण्याच्या शब्दांवर तर नाचतातच पण सोबतच या गाण्याच्या भन्नाट म्युझिक वर सुदधा थिरकतात. प्रत्येक म्युझिकला वेगळ्या स्टेप्स करत त्या नाचतात. काही स्टेप्स मूळ गाण्यातल्या ही असतात. त्यांचा उत्साह एवढा असतो की त्यांच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या सगळ्या महिलांमध्ये हा उत्साह संचारलेला दिसतो. एक आजी तर एवढ्या उत्साहित होतात की जागेवरून उठत नाचायला लागतात. या दोघींमुळे हा व्हिडियो लक्षात राहतो. सगळ्या स्त्रिया या सतत आपल्या कुटुंबासाठी झटत असतात. आपापल्या परीने आपलं कुटुंब सुखी राहावं यासाठी या माऊल्या आग्रही असतात. मग त्यात गृहिणी आणि नोकरी, व्यवसायात व्यस्त असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा समावेश आहे. पण त्यामुळे त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो.

त्यातूनच कधी वेळ मिळाला आणि थोडी करमणूक झाली तर तेवढाच त्यांच्यासाठी विरंगुळा म्हणायचा. आम्हाला खात्री आहे या व्हिडियोतील ताईंसाठी सुद्धा त्यांचा हा डान्स म्हणजे छोटासा विरंगुळा ठरला असणार. या नाचात त्यांनी जी धमाल केली आणि आनंद अनुभवला तो काही अंशी आपल्या पर्यंतही पोहोचला आहेच.

आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला ही आवडला असणार हे नक्की. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख ही आपल्याला आवडला असेल असा सार्थ विश्वास आहे. आपल्या वाचकांमध्ये अनेक स्त्रिया आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी आपल्या लेखांचे कौतुक होत असते आणि अनेक चांगल्या सूचना ही येत असतात. या दोहोंमधुन नवनवीन गोष्टी शिकत आपली टीम उत्तमोत्तम लेख लिहीत आलेली आहे. हे लेखही आपल्या सगळ्या या स्त्री वाचकांसाठी काही क्षण का होईना पण विरंगुळ्याचे क्षण देणारं माध्यम ठरत राहो हीच सदिच्छा. आपणही नवनवीन सकारात्मक सूचना आणि प्रतिक्रिया देत राहा. आपला हा आमच्या टीमप्रति असलेला स्नेह वाढत राहो. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *