प्रेक्षकांना बबड्या आणि शनाया या भूमिका आता तशा तोंडपाठच झाल्या आहेत. त्यांचा कधी राग येतो तर कधी ते बरोबर वाटतात. अगदी या मालिका न पाहणाऱ्यांनाही या भूमिकांबद्दल ऐकून माहिती असतं एवढ्या या भूमिका प्रसिद्ध आहेत. तर नुकतीच एक बातमी शनायाबद्दल आली. ती बातमी अशी कि, इशा केसकर हिने या मालिकेचा घेतलेला निरोप. तिच्या जागी रसिका सुनील हिने तिची जागा घेतली. रसिका हिनेच या भूमिकेची सुरुवात केली होती. मग काही कारणांमुळे तिला मालिकेच्या बाहेर जावं लागलं. आणि तिचं पुन्हा पदार्पण. ऐकताना चमत्कारिक वाटतं. पण कारण पण तसचं आहे.
खुद्ध इशा केसकर ने प्रसिद्ध केलेल्या एका विडीयो मध्ये तिने ते कारण दिलय. तो व्हिडीओ आम्ही ह्या आर्टिकलच्या शेवटला अपलोड केलेला आहे. या विडीयोमध्ये आपल्याला इशा दिसते ती एका ठिकाणी येताना. तिला एका ठिकाणी जायचं असतं पण सिक्युरिटी तिला थांबायला सांगतात. आणि मग ती
प्रेक्षकांशी संवाद साधते. यात ती म्हणते कि तिला नुकताच ताप येऊन गेला. त्याचं कारण होतं ते म्हणजे दाढदुखी. अर्थात तिने त्यावर उपचार केले खरे. ऑपरेशन करावं लागलं. आणि यात वेळ गेला. आणि ती म्हणते तसं, मनोरंजन क्षेत्रात एक नियम पाळला जातो तो म्हणजे शो मस्ट गो ऑन. त्यामुळे तिला हि
मालिका सोडावी लागली.
एखाद्या कलाकारासाठी एखादी कलाकृती अर्धवट सोडून जाणं जिव्हारी लागतं तसच प्रेक्षकांचही होतं. यात त्या कलाकृतीला सुद्धा सावरायला वेळ लागतो. या विडीयोमध्ये सुद्धा इशाचा काकुळतीला आलेला चेहरा पहिला कि हे जाणवतच. अर्थात असं असलं तरीही तिने या हटके अंदाजात हि बातमी सांगितली यासाठी तिचं कौतुक पण. आणि तीने प्रेक्षकांना येत्या काळात नवीन कलाकृती घेऊन येऊन मनोरंजन करण्याचं वचन दिलंच आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा हिरमोड होण्याचंही कारण नाही. तिच्या डॉक्टर कडील वाऱ्या संपवून ती प्रेक्षकांसाठी पुन्हा मनोरंजन करायला रुजू होईल हे मात्र नक्की. तिच्या सुदृढ आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)