Breaking News
Home / बॉलीवुड / ह्या कारणामुळे जुही चावलाने आपल्यापेक्षा कितीतरी वर्षांनी मोठे असलेल्या जय मेहताशी लग्न केले

ह्या कारणामुळे जुही चावलाने आपल्यापेक्षा कितीतरी वर्षांनी मोठे असलेल्या जय मेहताशी लग्न केले

असं तर प्रत्येकाला वाटत असेल कि बॉलिवूडच्या कलाकारांची प्रेमकथा एखाद्या परिकथे सारखी असेल, परंतु असे काही घडत नाही. अशीच काहीशी कथा आहे जुही चावला आणि तिचा पती जय मेहता ह्यांच्याबद्दल. जुही चावलाकडे पाहून असंच वाटतं कि तिचे आयुष्य खूप सुंदर चालू असेल, तिचे सर्व खूप चांगलं चालू असेल. जुही चावलाचे व्यक्तिमत्वच असे आहे कि प्रत्येकाला वाटत असेल तिच्या जीवनात दुःख येऊच शकत नाही. परंतु हि पूर्ण चुकीची गोष्ट आहे. जर आपण गोष्ट करत असाल जुही चावल्याच्या लव्हस्टोरी बद्दल तर हि गोष्ट नक्कीच खोटं सिद्ध करते. जुही चावला आणि जय मेहता ह्यांचे लग्न १९९५ मध्ये झाले. जुहीने त्याच्याशी तेव्हा लग्न केले जेव्हा ती तिच्या करिअर मध्ये यशाच्या शिखरावर होती. त्याकाळी प्रत्येक स्टार तिच्यासोबत काम करू इच्छित होता, आणि तरुणांमध्ये तर तिची फॅन फॉलोईंग खूपच जास्त होती. प्रत्येक जण हेच विचार करायचा कि जिथे तिच्यासोबत इतके मोठे मोठे हिरो असताना, अश्यामध्ये तिने शेवटी एका उद्योगपतीसोबत का लग्न केले, चला तर आजच्या लेखात आपण हे जाणून घेऊया.


जय मेहता एक उद्योगपती आहेत आणि ते मेहता ग्रुप्सचे मालक आहेत. जुही आणि जय ह्यांची भेट ‘कारोभार’ चित्रपटाच्या सेट वर झाली होती. त्यांना ह्रितिक रोशन ह्यांचे पिता राकेश रोशन ह्यांनी भेटवले होते. चित्रपटाच्या सेट वर त्यांची भेट झाली, नंतर त्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. काही घटनांमध्ये दोघांनी एक मित्र म्हणून एकमेकांना खूप समजून घेतले आणि एकमेकांना प्रोत्साहन सुद्धा दिले. परंतु ह्या दोघांमध्ये प्रेम होण्याचा कोणताच प्रश्न नव्हता. कारण जय मेहता ह्यांचे पहिले लग्न झाले होते. ते त्यांची पहिली पत्नी सुजाता बिर्ला हिच्यावर मनापासून प्रेम करत होते. परंतु एक दिवस नशिबाने तिची साथ सोडली. आणि सर्वच बदलून गेले. १९९० साली जय मेहता ह्यांच्या पहिल्या पत्नी सुजाता ह्यांना एका विमान दुर्घटनेत प्राण गमवावे लागले. हीच ती वेळ होती जेव्हा जय मेहता पूर्णपणे तुटून गेले. त्यांना ह्या कठीण प्रसंगी जर कुणी मदत केली, कुणी साथ दिली ती होती जुही चावला. जय मेहता पत्नीच्या निधनानंतर डिप्रेशनमध्ये जात होता. जुहीला हे बघवलं नाही. ती आपल्या मित्राला ह्या दुःखाच्या छायेतून सावरू इच्छित होती. ह्या दुःखाच्या छायेखाली त्याने त्याचे संपूर्ण जीवन असंच व्यतीत करावे, असे तिला मनापासून वाटत नव्हते. तिने एक चांगली मैत्रीण असल्याची प्रत्येक प्रयत्न केले ज्यामुळे जय त्या दुःखापासून बाहेर आला.


त्यानंतर दोघांमध्ये कुठेना कुठे प्रेमाची एक छोटीशी आशा दिसत होती. परंतु हि प्रेमाची आशा होती ती फक्त जयच्या बाजूने. कारण जुहीने जयला फक्त आणि फक्त तिचा मित्र मानले होते. जयने जुहीला इम्प्रेस करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. परंतु जुही होकार द्यायलाच तयार नव्हती. परिस्थिती अशी होती कि जयने सलग एक वर्ष जुहीच्या घरी पुष्पगुच्छ, भेटवस्तू, चॉकलेट्स पाठवल्या. एका मुलाखतीत जुहीने स्वतः मान्य केले कि त्यावेळी तिला असे वाटले होते कि काय जयकडे काम नाही आहे का, जो ह्या सर्व गोष्टी पाठवत असतोस दिवसभर. परंतु जयने हिंमत हारली नाही आणि प्रयत्न करत राहिला कि जुहीला कोणत्याही प्रकारे प्रेमासाठी राजी करणे. त्याच्या ह्या प्रयत्नांपासून जुही स्वतःला थांबवू शकली नाही. त्याने त्या सर्व ठिकाणी प्रयत्न केले कि जुहीला ते सर्व सुख मिळावे, त्या सर्व गोष्टी केल्या ज्याची जुही हकदार होती. जुहीला सुद्धा जयची तिच्यासाठी असलेली तळमळ दिसून आली. तिने सुद्धा प्रेमासाठी होकार दिला. परंतु दोघांच्या नशिबाने अजूनही त्यांना अजमावणं सोडलं नव्हतं.


असं बोलतात कि शेवट चांगलं तर सर्व चांगलं, इथे जुही आणि जय ह्यांना असंच काहीसं वाटलं होतं कि लग्नामुळे दोघांच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडतील. परंतु त्याअगोदरच एका कार अपघातात जुहीच्या आईला प्राण गमवावे लागले. त्याच्या काही काळानंतर जुहीचा भाऊ जो दीर्घकाळ आजारी असायचा, त्याचे सुद्धा निधन झाले. आता जयची वेळ होती, कारण ज्याप्रकारे जुहीने जयला त्याच्या कठीण प्रसंगी दुःखातून सावरले होते, आता तशीच परिस्थिती जुहीच्या आयुष्यात आली होती. जयसाठी जुहीला मदत करणे खूप गरजेचे होते, तिला ह्या दुःखाच्या छायेतून बाहेर काढणे गरजेचे होते. जयने सुद्धा तसेच केले जसे अगोदर जुहीने त्याच्यासाठी केले होते. जेव्हा जुहीच्या आईचे निधन झाले होते तेव्हा जुही ह्या लग्नासाठी तयार नव्हती, जरी लग्न ठरले होते. तेव्हा ती लग्न करण्याच्या मनस्थितीत नव्हती. कदाचित हेच कारण होते कि ती लग्न करण्यास तयार नव्हती. परंतु जिथे जय सारखं व्यक्ती असेल तिथे जुही आपले हृदय कसे नाही देणार. तिला विश्वास बसला होता कि जय पेक्षा चांगला मुलगा तिला मिळूच शकत नाही. त्यामुळे लग्नासाठी जुहीने शेवटी होकार दिला. डिसेंबर १९९५ मध्ये दोघेही लग्नाच्या प्रवित्र नात्यात बांधले गेले. त्यांना दोन मुलं आहेत अर्जुन आणि जान्हवी. डिसेंबर २०२० ला त्यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण होतील.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *