Breaking News
Home / बॉलीवुड / ह्या कारणामुळे झाले होते सलमान-ऐश्वर्याचे ब्रेकअप, बघा काय घडले होते त्या रात्री

ह्या कारणामुळे झाले होते सलमान-ऐश्वर्याचे ब्रेकअप, बघा काय घडले होते त्या रात्री

बॉलिवूडमध्ये स्टार्सची कमी नाही आहे. इथे एकाहून एक टॅलेंटेड स्टार्स आहेत. काही स्टार्स असे आहेत ज्यांची लोकप्रियता अगोदर जशी होती तशीच आजसुद्धा आहे. जसे कि शाहरुख खान, सलमान खान, अमीर खान. बॉलिवूडची हि खान मंडळी अशी आहेत, ज्यांचे चित्रपट पाहण्यासाठी दर्शक अगोदर सुद्धा गर्दी करायचे आणि आज सुद्धा गर्दी करतात. आज आपण त्यापैकीच एका खान बद्दल वाचणार आहोत. आज ह्या लेखामध्ये आपण बॉलिवूडच्या दबंग खान म्हणजेच सलमान खान बद्दल वाचणार आहोत. सलमान खानच्या लोकप्रियतेबद्दल सर्वांनाच माहिती आहे. सलमान खान बॉलिवूडचा असा अभिनेता आहे ज्याचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणाने मीडियामध्ये चर्चेत असतेच. मीडिया आणि सलमानचे नातं म्हणजेच जणू काही एकाच नाण्याचा दोन बाजू झाल्या आहेत. सलमान आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. एकेकाळी हि लव्हस्टोरी खूपच चर्चेत असायची. परंतु ह्या प्रेमकहाणीचा अंत सुखद होऊ शकला नाही. सलमान-ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले आणि ऐश्वर्याने अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. सलमान आज सुद्धा अविवाहित आहे आणि आपल्या जीवनसाथीच्या शोधात आहे. जरी दोघेही आजच्या काळात आपापल्या जीवनात व्यस्त असले तरी हि गोष्ट आता खूप जुनी झाली आहे. परंतु आज सुद्धा लोकांना ह्या गोष्टीचा खुलासा नाही मिळाला कि, त्यांचे ब्रेकअप का झाले होते. त्यांचे चाहते आज सुद्धा ह्या प्रश्नाचे उत्तर जाणू इच्छितात. आजच्या ह्या लेखात आम्ही तुम्हाला दोघांशी जुडलेले काही खास गोष्टी उघड करणार आहोत.

‘जोश’ चित्रपटात मिळाला होता ऐश्वर्याचा भावाचा रोल :
दोघांची प्रेमकहाणी ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटापासून सुरु झाली होती. त्या वेळी दोघेही आपलं रिलेशनशिप जगापासून लपवून ठेवू इच्छित होते. परंतु तेव्हा एक फोटो खूप व्हायरल झाला होता, ज्यामुळे खूप चर्चा झाली होती. ह्या फोटोत सलमान ऐश्वर्याला चुंबन करत होता. तुम्हाला सांगू इच्छितो कि, ऐश्वर्याच्या जीवनावर ‘हॉल ऑफ़ फेम’ हे पुस्तक लिहलं गेलं आहे. ह्या पुस्तकात ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे कि साल २००० मध्ये आलेल्या ‘जोश’ चित्रपटाची ऑफर अगोदर सलमानला देण्यात आली होती. ह्या चित्रपटात त्याला ऐश्वर्याच्या भावाची भूमिका निभवायची होती. हि गोष्ट माहिती पडताच सलमानने हि ऑफर नाकारली आणि नंतर शाहरुख खानला हा रोल मिळाला. सलमान खानने चित्रपटाच्या प्रोड्युसर रतन जैन ह्यांना हेसुद्धा म्हटले होते कि, “यार ऐश्वर्या को मेरी बहन मत बनाओ..” हळू हळू ऐश्वर्या आणि सलमान दोघांचे प्रेमसंबंध जुळू लागले. सलमानच्या कुटुंबीयांनी ऐश्वर्याला आपल्या सुनेच्या स्वरूपात स्वीकारले होते. अगदी इथपर्यंत कि सलमानच्या घरातली मंडळी ऐश्वर्याला ‘भाभी…भाभी’ म्हणून हाक मारत.

सलमानचा आक्रमक स्वभाव :
सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात खूप बुडाला होता. तो कोणत्याही परिस्थितीत तिला मिळवू इच्छित होता. ह्याच गोष्टीमुळे सलमानचा स्वभाव खूपच आक्रमक होत गेला. सलमान खानचा आक्रमक स्वभावाच्या विषयी ऐश्वर्या ने खुलासा केला होता, कि सलमान आणि तिच्या ब्रेकअपमधील सर्वात मोठे कारण होते त्याचे आक्रमकपणा आणि त्याचे मारहाण करणं. ऐश्वर्याच्या म्हणण्यानुसार आमचे ब्रेकअप झाल्यानंतर सलमानने माझ्यासोबत फोनवर मूर्ख गोष्टी म्हटल्या. इतकंच नाही तर तो माझ्या को-स्टार्स बद्दल असलेल्या अफेअर्स संदर्भात शंका घ्यायचा. मी त्यावेळी अभिषेक पासून ते शाहरुख पर्यंत प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत काम करत होती आणि त्या कलाकारांबद्दल अफेअर्सच्या चर्चेमुळे तो नेहमी मला त्रास देत असे, कधी कधी तर मारहाण सुद्धा करायचा. इतकं होऊनही मी चित्रपटांत काम करायला जायची जसे काहीच झालं नाही आहे. ऐश्वर्या लग्नासाठी सतत टाळाटाळ करत असल्यामुळे सलमानचा रागाचा पारा चढत असे. तो ऐश्वर्याच्या चित्रपटांच्या सेट वर जाऊ लागला. तिथे तो खूप हंगामा करत असे. ‘कुछ ना कहो’ च्या सेट वर त्याने खूपच हंगामा केला होता. ह्या चित्रपटात अभिषेक बच्चन हिरो होता. असं बोललं जातं कि रागात सलमानने शूटिंग दरम्यान सेटवरच्या सामानांची तोडफोड केली आणि त्यानंतर सुद्धा त्याचे मन भरले नाही, तेव्हा त्याने ऐश्वर्याच्या कारचे सुद्धा नुकसान केले होते.

ऐश्वर्याच्या आई-वडिलांना पसंद नव्हते स्थळ :
जेव्हा ऐश्वर्या सलमानसोबत रिलेशनशिप मध्ये होती, तेव्हा ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सलमानच्या घरी जात राहायची. हि गोष्ट ऐश्वर्याच्या आई वडिलांना खटकायची. सलमानचा स्वभाव त्यांना माहिती होता. त्याच बरोबर सलमानचे ह्या अगोदर सुद्धा अनेक मुलींसोबत असलेली प्रेमप्रकरणे सुद्धा त्यांना माहिती होती. अश्या मध्ये आपल्या मुलीची त्यांना खूप काळजी वाटायची. ऐश्वर्यच्या आईवडिलांना हे स्थळ पसंद नव्हतं. ऐश्वर्याच्या जीवनावर लिहिलेल्या ‘हॉल ऑफ़ फेम’ पुस्तकाच्या आधारानुसार, ऐश्वर्याने एका इंटरव्ह्यूच्या दरम्यान म्हटले होते कि, ती कधी असे काम नाही करणार ज्यामुळे तिच्या आईवडिलांना दुःख होईल. आता हे वाचून हा नका विचार करू कि, तिने सलमान सोबतचे आपले नातं वाचवण्यासाठी काही नाही केलं असे. जेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला सलमानसोबत असलेले नातं तोडण्यास सांगितले, तेव्हा ती आपले घर सोडून मुंबईतील लोखंडवाला मध्ये ब्रुकहिल अपार्टमेंटच्या एका टॉवर मध्ये शिफ्ट झाली होती. नंतर ह्यानंतर तेच घडलं जे दोघांच्या नशिबात लिहिलं होता. दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीमुळे खूप वाद झाला आणि दोघांचे ब्रेकअप झाले. असं बोललं जातं कि त्या रात्री सलमान खान ने ऐश्वर्याच्या आईवडिलांना खूप वाईट शब्द बोलले, ज्यामुळे ऐश्वर्याने सलमानला सोडून दिले.

ह्याशिवाय सलमानचा वेडेपणा सुद्धा ह्या त्यांच्या नात्यामधले ब्रेकअप मागचे एक खास कारण होते. सलमान अनेकवेळा मध्यरात्री ऐश्वर्यच्या घरी जाऊन तिच्या घरचा दरवाजा आपटायचा, दारातली बेल वाजवत राहायचा. एकदा तर तो रात्री ऐश्वर्याच्या घरी पोहोचला आणि तिचा दरवाजा जोरजोरात ठोकू लागला. तो रात्री ३ वाजेपर्यंत तिचा दरवाजा आपटत राहिला. त्यामुळे त्याचे हाथ जखमी सुद्धा झाले. सलमानने रागाने बिल्डिंग वरून उडी मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. तो तिला लग्नासाठी सतत दबाव आणत असे, तर दुसरीकडे ऐश्वर्याचे करिअर यशाच्या शिखरावर होते. त्यामुळे ती ह्या गोष्टींना टाळत असे. ह्यामुळे लग्नानंतर ऐश्वर्याने चित्रपटांत काम करू नये अशी सलमानची स्पष्ट भूमिका होती. एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्याने खुलासा केला होता कि जेव्हा सलमान मद्य प्यायचा तेव्हा त्याची वागणूक माणसांप्रमाणे नसायची. ती त्याच्या मध्य पिण्याची सवय आणि त्यानंतर घडणाऱ्या हरकतींपासून त्रासली होती. तिच्यासोबत तो अर्वाच्च भाषा, मारहाण आणि भावनिकदृष्ट्या त्रास द्यायचा. अनेकवेळा तिच्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेला ठेच पोहोचेल अश्या गोष्टी तो बोलत असेल. ह्याच सर्व कारणांमुळे तिने त्याच्याशी नातं तोडण्याचा निर्णय घेतला.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.