Breaking News
Home / मराठी तडका / ह्या कारणामुळे नेत्राने सोडली ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका, स्वतः व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

ह्या कारणामुळे नेत्राने सोडली ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका, स्वतः व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

मालिका म्हणजे आपल्या मनोरंजन विश्वातील एक महत्त्वाचं माध्यम होय. दैनंदिन जीवनात या माध्यमाची, प्रेक्षकांवर जी परिणामकारकता दिसते, ती खचितच इतर कोणत्या माध्यमाची असेल. यातून दररोज भेटणारे कलाकार तर आपल्याला, आपल्याच घरचे वाटू लागतात. इतके की त्यांचं कौतुक आणि त्यांच्यावर टिकाही आपण अगदी हक्काने करतो. अनेकवेळा तर आपण त्यांच्यात इतके हरवून जातो की त्यांचं कथानक आपल्याला खऱ्या आयुष्यातलं वाटायला लागतं. अर्थात या सगळ्यांत आपलं सगळ्यांत जास्त लक्ष नायक, नायिकेवर असतं. पण काही वेळा , खलनायक वा खलनायिका या भूमिका ही इतक्या उत्तम वठलेल्या असतात की त्यांचं कौतुक वाटतं.

या सगळ्या काळात जर कधी सगळ्यांत जास्त दुःख कधी होत असेल तर ते म्हणजे एखाद्या कलाकाराची मालिकेतून एग्झिट होताना. कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे, आपल्याला त्यांचा सहवास हवाहवासा वाटत असतो. पण कधी कधी, कथानकाची गरज तशी असते वा इतरही कारणं असतात, त्यामुळे कलाकारांना मालिकेच्या परिघातून बाहेर पडावं लागतं. असंच काहीसं एका मालिकेच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी झालं. या मालिकेचं नाव आहे – ठिपक्यांची रांगोळी !

सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी, एक लोकप्रिय मालिका होय. यातील नायक, नायिका हे जसे लोकप्रिय ठरले आहेत, तशीच यातील खल व्यक्तीरेखा, ‘नेहा’ ही सुद्धा लोकांच्या पसंतीस उतरली आहे. अर्थात या खल प्रवृत्तीचं कौतुक होत नसलं, तरी या भूमिकेला जिवंत करणाऱ्या, स्नेहलता माघाडे यांच्या अभिनयाचं मात्र कौतुक होताना दिसतं आहे. स्नेहलता या गेल्या काही वर्षांपासून रंगभूमी, मालिका, जाहिराती या क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करताना दिसून येतात. त्या स्वतः अभिनयाचं पदव्युत्तर प्रशिक्षण ही घेत आहेत. किंबहुना, ही मालिका सुरू झाली, तेव्हा पासून आपलं शिक्षण आणि मालिकेतील काम यांचा त्यांनी ताळमेळ साधायचा प्रयत्न केला होता. तो उत्तम जमुनही आलेला होता. पण सरतेशेवटी अभ्यास आणि काम, हे कालपरत्वे वाढतच जातात. त्यामुळे दोन्ही गोष्टी सांभाळताना जास्तच तारेवरची कसरत होऊ लागली. पण यांमुळे मालिकेवर आणि अभ्यासावर ही परिणाम होऊ नये म्हणून स्नेहलता यांनी एक समंजस निर्णय घेतला आणि त्या मालिकेतून बाहेर पडल्या आहेत. याविषयीची माहिती त्यांनी, त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहेच. तसेच, त्यांनी या मालिकेतून एग्झिट घेतली असली, तरी मालिका आणि त्यातील कलाकार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. जे चाहते, स्नेहलता यांना फॉलो करतात त्यांना त्यांच्या या मास्टर्स अभ्यासक्रमाविषयी कल्पना आहेच. आणि तसंही, स्नेहलता या त्यांच्या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने कार्यरत राहतीलच.

त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटला जरी आपण भेट दिली तरी त्यांनी अभिनित केलेल्या अनेक नाटकांचे फोटो आपल्याला सहज बघायला मिळू शकतात. तसेच त्या मॉडेलिंग ही करतात. आणि मध्यंतरी तर त्यांनी एक हिंदी वेब सिरीज ही केली होती. एकूणच काय, तर सध्या जरी त्यांनी अभ्यासवरच लक्ष केंद्रित केलं असलं तरी त्यांची नाटकांतून वा इतर कलाकृतींमधून, आपल्या चाहत्यांशी भेट होतच राहणार आहे. तसेच त्यांनी साकार केलेली, ‘नेहा’ ही भूमिका ही प्रेक्षकांच्या लक्षात राहणार आहे हे नक्की. या लेखाच्या निमित्ताने, स्नेहलता यांना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! दोन्ही क्षेत्रात आपल्याला उदंड यश मिळो ही सदिच्छा.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा काय म्हणाली स्नेहलता :

 

View this post on Instagram

 

A post shared by snehalata maghade🦄 (@snehalataa_)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *