Breaking News
Home / बॉलीवुड / ह्या कारणामुळे होऊ शकले नाही अभिषेक आणि करिष्माचे लग्न

ह्या कारणामुळे होऊ शकले नाही अभिषेक आणि करिष्माचे लग्न

आज ज्या गोष्टीबद्दल आपण वाचणार आहोत, त्या गोष्टीबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेलच. ज्या प्रेमकहाणीबद्दल आम्ही सांगणार आहोत ती तुम्हांला माहिती असेलच परंतु अश्या काही गोष्टी आहेत ह्या दुःखद प्रेमकहाणीमध्ये ज्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज आपण वाचणार आहोत अभिषेक आणि करिष्मा कपूर ह्यांच्या दुःखद प्रेमकहाणीबद्दल. तसं तर ह्यांच्या बद्दल सर्वाना माहिती आहेच, जेव्हा दोघेही रिलेशनशिप मध्ये होते तेव्हा लोकांना वाटले होते कि दोघेही लवकरच लग्न करणार. इतकंच काय, अमिताभ बच्चन ह्यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा होणार असल्याचे सुद्दा घोषित केला गेले. परंतु अचानक असे काय झाले कि, दोघांनाही आपली रिलेशनशिप तोडावी लागली. हे नातं तुटण्याअगोदरची दुःखद कहाणी तुम्ही ह्या लेखात वाचणारा आहात.

ह्या दोघांचीही भेट झाली होती एका लग्नात, आणि असं बोललं जातं कि, एका लग्नामध्ये अनेक लग्ने असतात. आणि असंच काहीसं अभिषेक आणि करिष्माच्या बाबतीत घडलं होतं. त्यांची भेट झाली १९९७ मध्ये, ती सुद्धा स्वतःच्या परिवारातील लग्नामध्ये. होय, आम्ही अमिताभ बच्चन ह्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि निखिल नंदा ह्यांच्या लग्नाबद्दल सांगत आहोत. १९९७ मध्ये ह्या दोघांचे लग्न झाले. जसे कि, आपण सर्व जाणतो कि श्वेता अभिषेकची बहीण आहे, तर दुसरीकडे निखिल सुद्धा कपूर परिवारातील एक भाग आहे. निखिल आणि श्वेताच्या लग्नामध्ये अभिषेक आणि करिष्मा कपूर ह्यांची नजर एकमेकांवर पडली. तिथूनच त्यांच्यात बोलणे सुरु झाले. आणि हळूहळू दोघेही जवळ येऊ लागले. त्यानंतर ‘मृत्यूदाता’ चित्रपटावेळी ह्या दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. ह्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि करिष्मा कपूर प्रमुख भूमिकेत होते. ‘मृत्यूदाता’ च्या सेटवर अभिषेक बच्चन बहाणे बनवून करिश्माला भेटण्यासाठी येत असे. सुरुवातीला तर दोघांचे रिलेशन खूपच गुप्त होते. हे दोघेही पब्लिक मध्ये एकत्र कधीच येत नसत. परंतु हळूहळू जसे दोघांचे प्रेम वाढू लागले, त्यांना समजू लागले कि दोघेही एकमेकांसाठीच बनलेले आहेत.

त्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात करिश्माने बच्चन कुटुंबात सामील होणे, किंवा असे म्हणा कि प्रत्येक ठिकाणी अभिषेक आणि करिष्मा हातात हात घालून दिसून येत असे. दोघांनी खूप प्रयत्न केला कि दोघांचे नातं गुप्त राहावे, परंतु असं बोलतात ना कि प्रेम कधी लपत नाही. ह्या दोघांच्या बाबतीत सुद्दा असंच काहीसं झालं. अभिषेक आणि करिष्मा चर्चेचा विषय बनले होते. आणि प्रत्येकजण जाणू इच्छित होता कि पुढे ह्या दोघांच्या प्रेमकहाणीला कोणती दिशा मिळणार आहे. अश्यामध्येच २००० साली अभिषेक आणि करीना कपूर जी करिष्मा कपूरची लहान बहीण आहे, दोघांचा ‘रेफुजी’ चित्रपट आला. बहुतेकांनी हि गोष्ट सांगितली कि, करीना ह्या चित्रपटाच्या सेटवर अभिषेकला ‘जीजू’ म्हणून हाक मारत असे. असं नाही आहे कि फक्त करीना सोबतच अभिषेकने चित्रपटात जोडी बनवली, अभिषेक करिश्मासोबत सुद्धा पडद्यावर दिसून आला आहे. दोघांचा ‘हा मैने भी प्यार किया’ हा चित्रपट रिलीज झाला होता, ज्यात अक्षय कुमार सुद्धा दोघांसोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नव्हता.

काही वर्षे रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर ह्या दोघांनी २००० साली आपल्या साखरपुड्याची घोषणा केली, ते सुद्धा अमिताभ बच्चन ह्यांच्या ६० व्या जन्मदिवसाच्या वेळी. आणि हि घोषणा इतर कोणी नाही तर अभिषेक बच्चन ह्यांची आई जया बच्चन ह्यांनीच केली होती. त्यांनी करिश्माला बच्चन कुटुंबाची सून म्हणून संबोधले होते. परंतु नशिबाला काही वेगळेच मंजूर होते. सूत्रांच्या माहितीनुसार, करिश्माची आई बबिता ह्यांनी लग्नाअगोदर बच्चन कुटुंबासमोर एक कॉन्ट्रॅक्ट ठेवले. ज्यात ती हे जाणू इच्छित होती कि, अमिताभ बच्चन ह्यांनी अभिषेकसाठी कोण कोणती प्रॉपर्टी ठेवली आहे आणि त्याच्या करिअर पुढे जाऊन चांगले चालण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत. तर दुसरीकडे अश्या सुद्धा चर्चा होत्या कि, करिश्माने चित्रपटांत काम करू नये, असे जया बच्चन ह्यांचे म्हणणे होते. कुठे ना कुठे हि कारणेच राहिली आहेत, कि ह्या दोघांचे लग्न होण्याअगोदरच तुटले. जिथे दोघांच्या साखरपुड्याची घोषणा झाली होती तेव्हा तिथे अनेक मीडियावाले उपस्थित होते, तर दुसरीकडे दोघांच्या ब्रेकअपवर कोणीच बोलू इच्छित नव्हते. प्रत्येक जण फक्त अंदाज बांधत होते कि, शेवटी ह्या दोघांमध्ये असं काय झाले असेल. दोघांच्या ब्रेकअप मधील खरं कारण जरी दोघांनीही मीडियामध्ये सांगितलं नसलं तरी वरील दोन कारणं त्यांच्या ब्रेकअपला कारणीभूत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *