४२ वर्षीय अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या भावाच्या (विक्रम लांबा) मुलावर(रणशेर) प्रेम करते, लाड करते. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून रणशेरसाठी वेळ काढतेच असं असूनही ती सध्या आई होण्यासाठी मानसिक दृष्टीने तयार नाही. मल्लिकाला नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात प्रश्न विचारला, ‘जर तुम्हाला लहान मुलं खुप आवडतात, तर भविष्यात आई होण्यासाठी इच्छुक आहात का?’ उत्तर देताना ती म्हणाली सध्या तरी मी मानसिक दृष्ट्या या गोष्टी साठी तयार नाहीये.
या कारणामुळे तिला स्वतःचं मूल नको आहे
आई न होण्याच्या कारणाविषयी विचारले असता मल्लिकाने उत्तर दिले. आईपण निभावणं ही खुप मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार पाडण्याबाबत माझ्या मनात भीती आहे. याशिवाय आता मी माझ्या मनाला वाटेल तिथे सुटकेस घेऊन प्रवासाला, शुटिंगसाठी बिंधास्त जाऊ शकते पण मुल झाल्यावर मला त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्याची शाळा, त्याचं शिक्षण व अन्य गोष्टींचा विचार करून मला वेड लागायची वेळ येईल, त्यामुळे सध्या जशी आहे त्यामध्ये खुप खुश आहे.
रणशेर सोबत आहे तिचं खास नातं
मल्लिका म्हणते, ‘माझं त्याच्या (रणरेश)सोबत खास नातं आहे. माझं स्वतःचं मूल नाही त्यामुळे रणरेश मला माझ्या मुलासारखाच आहे. रणरेश सोबत मला वेळ कसा जातो हे लक्षात सुध्दा येत नाही.मी त्याच्या सोबत खेळते, त्याच्या सोबत फिरायला जाते व चांगले क्षण जगुन झाल्यावर मी त्याला त्याच्या आईवडीलांकडे सोपवते.’ मल्लिका त्याला मागच्या वर्षी झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुध्दा घेऊन गेली होती.
पुन्हा प्रेमात पडायला इच्छुक आहे मल्लिका
काही काळापूर्वी मल्लिका फ्रेंच बिझनेसमन सिरील ऑक्सेफंस याला डेट करत होती. तरी आता ती सिंगल असुन पुन्हा एकदा प्रेमात पडायला उत्सुक आहे. ती म्हणते- रोमान्स ही जगातील सुंदर गोष्ट आहे पण कामातुन रोमान्स वगैरे गोष्टींना वेळच मिळत नाही. बू सबकी फटेगी या वेबसिरीज मधुन दिसलेल्या मल्रिकाचा लवकरच तुम्हारी प्यारी सुनीता नावाचा चित्रपट येत आहे. ज्यात तिच्यासोबत रजत कपूरही असणार आहे.