Breaking News
Home / मनोरंजन / ह्या कुत्र्याला पाहून सिंहाची सुद्धा टरकली, व्हिडीओ पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

ह्या कुत्र्याला पाहून सिंहाची सुद्धा टरकली, व्हिडीओ पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

माणूसाला जशी स्वतःविषयी आणि इतर माणसांविषयी कायम उत्सुकता असते तशीच ती इतर सजीवांविषयी सुद्धा असते. खासकरून आपल्या आजूबाजूला असणारे पाळीव प्राणी आणि त्यांच्या अगदी उलट कधीही पाळीव न होऊ शकणाऱ्या प्राण्यांविषयी आपल्याला खास उत्सुकता असते. कारण पाळीव प्राण्यांचा आपल्याला जवळून सहवास लाभतो. त्याच्यामुळे त्यांच्या वागण्यातील किंचित फरक सुद्धा आपल्याला टिपता येतो आणि त्यातच आपला आनंद सामावलेला असतो.

याउलट पाळीव नसणाऱ्या आणि अर्थातच हिंस्त्र समजल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत भीतीयुक्त उत्सुकता असते. याच्यातूनच अनेक जण त्यांना कैद करून पाळीव बनवण्याचा ही प्रयत्न करतात. पण अस असलं तरी त्यांच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी व्यवस्था केलेली असतेच. त्यामुळेच आकर्षण असलं तरी अशा प्राण्यांची दहशत मनात कायम असते. याचप्रमाणे विविध प्राणी एकमेकांसमोर आले तर कसे वागतील हे जाणून घेण्याकडे ही आपला कल असतो. फार सुरुवातीला कुत्रा आणि मांजर एकत्र राहू शकत नाही हा आपला समज होता. अर्थात तो काही अंशी खरा असला तरी ज्या घरांमध्ये अथवा व्यक्तींकडे हे दोन्ही प्राणी असतात त्यांनी एकमेकांसोबत जगणं शिकून घेतलेलं दिसतं. हीच बाब इतर प्राण्यांनाही लागू पडते.

अनेकवेळा पाळीव आणि हिंस्त्र प्राणी सुद्धा एकत्र राहून राहून एकमेकांना सरावतात. अर्थात त्यासाठी त्यांचा प्रदिर्घ सहवास असावा लागतो. अन्यथा अचानक एकमेकांसमोर आले तर सहसा संघर्ष होण्याची चिन्हेच जास्त असतात. आता आपल्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घेऊ. हा व्हिडियो काही काळापूर्वी एका आय ए एस सुशांता नंदा यांनी शेअर केला होता. बहुधा एखाद्या सफरीवर असताना त्यांना आलेला अनुभव त्यांनी चित्रित केला होता. सफारी ही तशीही अविस्मरणीय असते. एरवी ज्यांना केवळ चित्रात वा टीव्हीच्या पडद्यावर बघायची सवय असते त्या प्राण्यांना समोर बघता येतं. त्यात असे काही किस्से घडले की ती अजून अविस्मरणीय होते. तर, इथे होतं हे की व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक सिंहीण आणि एक कुत्रा समोरासमोर आलेले दिसून येतात. काहीशा अंतरावर हे दोघे उभे असतात. पहिल्या काही क्षणात लक्षात येतं की कुत्रा हळूहळू भुंकतो आहे. अर्थात समोर सिंहीण आहे म्हंटल्यावर ती ऐकून थोडी घेईल. ती ही काही पावलं धावत येते. पण हा कुत्रा बराच बिलंदर आणि काहीसा धाडसी असावा. कारण दुसरा तिसरा कोणी असता तर पळूनच आला असता. पण हा मात्र तिकडेच उभा राहून भुंकतो. सिंहीण ही गोंधळते.

इतकंच नाही तर पुढच्या काही क्षणात हा कुत्रा तिच्या अंगावर धावून जातो. काय धाडस म्हणावं की काय कळत नाही. कारण सिंहीणीचा एक पंजा बसला तर शेवटचा भो भो ऐकायला येईल अशी अवस्था असते. पण धाडस दाखवणाऱ्याला नशिबाची साथ ही मिळते म्हणतात. इथेही तसच काहीसं होताना दिसत. कारण हा कुत्रा अंगावर येतोय पाहून ती सिंहीण खरं तर मागे जाते. पण शेवटी सिंहीणच ती ! एक पंजा फिरवते. तेव्हा वाटतं आता कुत्रा कोकलणार ! पण नेमका तो वार त्याच्या डोक्यावरून जातो. मग काय हा कुत्रा त्या सिंहीणीला अजून पाठी पिटाळतो. अर्थात तिचं गुरकावण आणि पंजे चालवणं चालु असतं. पण ती बऱ्यापैकी पाठी गेलेली असते. अर्थात धोका कायम असतोच. कुत्रा कितीही शूरवीर असला तरी त्यालाही याची जणू जाणीव असावी. कारण अति केलं तर अंगाशी येऊ शकतं असा विचार केला असावा की काय कळायला मार्ग नाही. पण सिंहीण पुरेशी पाठी गेली आहे हे कळताच तो गुपचूप पाठी फिरतो. आता तो एवढं धैर्य कुठून गोळा करतो वगैरे करायला मार्ग नाही.

सोशल मीडियावर अनेकांना हा त्याचा इलका वगैरे असावा असं वाटतं. अर्थात कारण काहीही असो. पण या दोन प्रजातींमधला हा अचानक झालेला सामना लक्षात राहतो हे नक्की ! आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याही लक्षात राहिला असेल. पण आपण तो बघितला नसेल तर जरूर बघा. आमची टीम आपल्या वाचकांसाठी सदर व्हिडियो खाली शेअर करणार आहे. तेव्हा या लेखाचा आनंद घेतलात तसाच या व्हिडियोचा ही आनंद घ्या.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *