Breaking News
Home / मनोरंजन / ह्या कॉलेजच्या तरुणींनी सर्वांसमोर साडीवर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

ह्या कॉलेजच्या तरुणींनी सर्वांसमोर साडीवर केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

डान्स हा आपल्या सगळ्यांचा आवडता कलाप्रकार आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. आपल्याला डान्स येवो न येवो पण एखादा उत्तम डान्स बघून दाद द्यावीशी वाटतेच. बहुतांश वेळा आपण दाद देतही असतो. आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो ही असाच दाद द्यावा असा आहे. जवळपास दोन तीन वर्षांपूर्वीचा व्हिडियो असला तरी त्यातून मिळणारा आनंद आजही उत्तम असाच आहे. तसेच या व्हिडियोत आपल्याला आपला आवडता डान्स प्रकार म्हणजे लावणी अनुभवायला मिळते. त्यामुळे म्हंटलं आपल्या वाचकांसाठी एक लेख तर बनतोच. चला तर मग मंडळी, या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.

हा वायरल व्हिडियो म्हणजे एका मुलींच्या ग्रुपने सादर केलेल्या लावणी नृत्याचं रेकॉर्डिंग आहे. हा डान्स परफॉर्मन्स त्यांनी मूड इंडिगो फेस्टिवल दरम्यान २०१९ साली दिल्याचं कळतं. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आधीच गाणं आणि परफॉर्मन्स सुरू झालेला असतो. ‘मला इश्काच्या झुल्यात झुलवा’ हे उर्मिला धनगर यांच्या दमदार आवाजातलं पण तेवढंच खट्याळ गाणं आपल्या कानावर पडत असतं. या मुली सुदधा अगदी जबरदस्त असा परफॉर्मन्स देत असतात.

सुरुवातीस गाणं थोडं हळुवार वेगाने जात, पण त्यात नजाकत दाखवता येईल अशा बऱ्याच ओळी आणि शब्द आहेत. त्या प्रत्येकाचा वापर या मुली अगदी खुबीने करून घेताना दिसतात. त्यांची बसून गिरकी मारण्याची स्टाईल अगदी आवडून जाते. तसेच त्यानंतर जेव्हा ‘नाच नाचून आला गं थकवा’ या वाक्यावर जेव्हा सगळ्या एकाचवेळी मान गर्रर्रकन मान फिरवतात ते ही उत्तम. यावरून त्यांनी हा परफॉर्मन्स बसवताना जबरदस्त मेहनत घेतली असणार हे स्पष्ट होतं. कारण त्याशिवाय हे टायमिंग जुळून येणं अशक्य आहे. पण या एकाच गाण्यावर त्यांचा परफॉर्मन्स थांबतो का ? नाही अजून काही गाणी बाकी असतात. पण त्याआधी जवळपास सदतीस सेकंद आपण ढोलकी आणि लेझीम यांच्यासाथीने या मुलींनी सादर केलेला परफॉर्मन्स बघण्याची संधी आपल्याला मिळते. केवळ ढोलकीचा ताल आणि लेझीमचा वापर करत या मुली डान्स स्टेप्स तर उत्तम करतातच सोबत त्यांचं डान्स फॉर्मेशन पण छान पद्धतीने करून दाखवतात. ते ही अगदी शिस्तबद्धपद्धतीने. त्यात कुठचीही चूक दिसून येत नाही.

मग वेळ येते ती ढोलकीच्या तालावर या गाण्यावर डान्स करण्याची. या मुलींच्या स्टेप्स या गाण्यावर ही वाहवा मिळवून जातात. तसेच जवळपास अकरा मुली या डान्स मध्ये सहभागी होताना दिसतात. पण त्यामुळे गर्दी वाटू न देता, या अकरा जणी कमी जागेत ही अतिशय सुंदर रित्या विविध अंतरांवर उभ्या राहत खूप छान फॉर्मेशन करतात. मग वेळ असते ती छबिदार छबी या गाण्याची. या गाण्याप्रमाणेच या मुलींचा परफॉर्मन्स ही अगदी जबरदस्त होतो. एकदम टांगा पलटी घोडे फरार. ठसक्यात डान्स करणं काय असतं याच उत्तम उदाहरण. आपण जर हा व्हिडियो बघितला नसेल तर आवर्जून बघा. त्यातही हा परफॉर्मन्स तर बघाच. पण एवढ्यातच परफॉर्मन्स संपतो अस समजू नका. अजून एक ठसकेदार परफॉर्मन्स बाकी असतो. आता ठसकेदार गाणं म्हणजे पुन्हा एकदा उर्मिला धनगर यांच्या आवाजातलं, ‘पाहुणा झालाय पागल पुरा’ हे ऐकायला मिळतं. त्यावर या मुलींचा डान्स तर दमदार असतोच. सोबतच डान्स संपताना या सगळ्या एकाचवेळी ज्या वेगाने खाली बसतात. खरं तर एकत्र एकाच वेळी बसणं कठीण. पण या मुलींची तयारी जबरदस्त असते. तसं बघायला गेलं तर चार मिनिटांचा हा व्हिडियो आहे. पण त्यातून एवढा उत्तम परफॉर्मन्स बघायला मिळतो जो एखाद्या रियालिटी शो मध्येही कदाचित दिसणार नाही. या मुली त्यांच्या डान्स परफॉर्मन्स ने मन जिंकून घेतात.

अजून एका गोष्टीमुळे त्या आपलं मन जिंकून घेतात. यांच्यातील जी सगळ्यांत उंच मुलगी असते, तिच्या पायातील घुंगरू थोडेसे सैल होतात. ही बाब ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्याच्या वेळीच तिच्या लक्षात आलेली असते. पण त्यामुळे डान्स थांबत नाही. हेच पुन्हा शेवटच्या परफॉर्मन्सच्या वेळी होतं. यावेळी तर हे घुंगरू पूर्णपणे सुटलेले दिसून येतात. पण त्यामुळे तिच्या डान्स मध्ये अजिबात फरक पडत नाही. ती त्याच आत्मीयतेने डान्स करत राहते आणि परफॉर्मन्स पूर्ण करते. आपल्या टीमला तिची आणि तिच्या संपूर्ण ग्रुपची समर्पित वृत्तीने डान्स करणं आवडलं. त्यांचा पूर्ण परफॉर्मन्सच आवडला. त्यांच्यातील प्रत्येकीला आमच्या टीमकडून त्यांच्या नृत्यकलेच्या जोपासनेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आपणही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असणार हे नक्की. सोबतच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे. आपला हा आनंद आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. त्यातून आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्यास प्रोत्साहन मिळत राहतं. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे आपण न वाचलेले अन्य लेख जरूर वाचा. आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *