Breaking News
Home / मनोरंजन / ह्या कॉलेजच्या तरुणीने साडीमध्ये जो डान्स केला तो पाहून सर्वजण दंग राहिले, स्टेप्स पाहून तुम्हीसुद्धा फॅन्स व्हाल

ह्या कॉलेजच्या तरुणीने साडीमध्ये जो डान्स केला तो पाहून सर्वजण दंग राहिले, स्टेप्स पाहून तुम्हीसुद्धा फॅन्स व्हाल

कोणत्याही वादकासाठी अप्रतिम दाद कोणती असेल तर त्याच्या वादनावर प्रेक्षक डोलले पाहिजेत. कारण एखादं वाद्य वाजत असताना आपल्याला डुलावसं (डुलक्या नव्हे) वाटणं याचा अर्थ समोरच्या कलाकाराने अगदी उत्तम वादन केलेलं आहे. अर्थात काही वाद्य केवळ जागच्या जागी डोलायला लावतात तर काही मात्र अगदी उठून नाचायलाच लावतात. त्यात मोठे ढोल वगैरे असतील तर माणूस उठून नाचायलाच लागेल. आणि त्यात या वाद्यांना लोकप्रिय गाण्यांची जोड असेल तर बघायला नको.

काही वेळा तर असंही होतं की व्यक्ती ही भन्नाट नाचते. इतकी भन्नाट हळूहळू आपलं लक्ष केवळ त्या नाचणाऱ्या व्यक्तीवर खिळवून राहतं. कानावर वादानाचा आवाज येत असतो पण डोळे मात्र त्या नाचण्याकडे लागलेले असतात. बघायला गेलं तर एकमेकांना अनुरूप अशाच या कला आहेत. याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर आपल्याला एका जुन्या व्हिडियोची मदत घेता येते. जवळपास तीन ते चार वर्षांपूर्वी हा व्हिडियो वायरल झाला होता. या व्हिडियोत आपल्याला दोन मुली भेटतात.

त्यांच्या महाविद्यालयात किंवा जी कोणती संस्था असेल त्यात सांस्कृतिक कार्यक्रम असावा. कारण या मुली आणि बाकीचे प्रेक्षक उभे असतात, त्याच्या समोर रंगमंच असतो. आपल्याला या व्हिडियोत हा रंगमंच चुकता चुकता दिसतो. तसेच त्यावर अभाव राहून ढोल वाजवणारे ही चुकते चुकते दिसतात. पण त्यांचं वादन एवढं जबरदस्त असतं की विचारू नका. आपणही पूर्ण व्हिडियोभर त्यांचं वादन ऐकतो आणि आपल्याला ही नाचावं असं वाटून जातं. पण या व्हिडियोचं मूळ आकर्षण मात्र या मुलींचा डान्सच ठरतो. त्या तशा भन्नाट नाचतात सुद्धा ! व्हिडियोची सुरवात होते तेव्हा त्या या डान्ससाठी तयार होत असतात. एक मुलगी बहुतेक त्या सांस्कृतिक कार्यक्रमाची स्वयंसेवक असते. त्यामुळे कॉलेज विद्यार्थी स्वयंसेवक असताना घालतात तशा जीन्स, टीशर्ट आणि आयकार्ड या पेहरावात ती असते. तर तिची मैत्रीण साडी घालून पारंपरिक वेशात असते. डान्ससाठी तयार होताना साडी घातलेली मुलगी केसांचा बुचडा बांधत असते. तोपर्यंत पहिल्या मुलीने डान्सला सुरुवात केलेली असते. दोन्ही हात हवेत उचलून तिचा डान्स सुरू होतो. असं वाटतं की हीच मुलगी आता पुढचा सगळा डान्स कसा असतो ते ठरवेल. पण नाही. आपला अंदाज चुकतो. साडी घातलेली मुलगी एकदा डान्स करायला लागल्यावर अशी काही नाचायला लागते की विचारू नका.

तिच्या अंगात ते वादन, ते गाणं भिनलेलं असतं. त्यामुळे कसा डान्स करू, कसं वाटेल कोण काय म्हणेल वगैरेच्या पलीकडे ती गेलेली असते. त्यावेळी फक्त आणि फक्त त्या संगीताचा आस्वाद घ्यावा इतकंच तिच्या मनात असतं. काय नाचते पोरगी ! धमाल ! धमाल ! धमाल !त्यात तिची ऊर्जा ही जबरदस्त असते. एकापाठोपाठ एक स्टेप करत ती या सगळया माहोलाची मजा घेत असते. अर्थात तिला दुसऱ्या मुलीकडून ही तेवढाच जबरदस्त प्रतिसाद मिळतो. दोन मैत्रिणी एकत्र येऊन जबरदस्त झिंगाट परफॉर्मन्स देतात. खरंच झिंगाट हाच शब्द योग्य आहे. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आमचं हे म्हणणं पटेल. पण आपण आतापर्यंत जर हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. आम्ही सांगितलं म्हणून नाही, पण उत्तम मनोरंजन म्हणून बघा. खरं तर अशा डान्सचा जास्त वेळेचा व्हिडियो असेल तर बघायला अजून मजा येते. छोट्या व्हिडियोत ती मजा येत नाही. पण हा व्हिडियो मात्र त्यास अपवाद ठरतो. कमी वेळेचा असूनही तीच मजा देतो. तेव्हा केवळ मनोरंजन म्हणून हा व्हिडियो बघा. आपली टीम आपल्या वाचकांसाठी हा व्हिडियो खाली शेअर करेल. आपण तिथून हा व्हिडियो पाहू शकता.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख !आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *