हल्ली सोशल मीडियावर आपल्याला एक ट्रेंड बघायला मिळतो. तो म्हणजे शॉर्ट व्हिडियोज बघण्याकडे वाढता कल होय. हा ट्रेंड अगदीच नवीन नसला तरी अगदीच जुना ही नाहीये. पण याचा परिणाम मात्र असा होतोय की आपण एखादा मोठा व्हिडियो ही थोडाच वेळ बघून सोडून देतोय. अनेकवेळा तर सुरुवातीच्या काही सेकंदातच, पुढील व्हिडियो विषयी अंदाज बांधण्याकडे आपला कल वाढतोय. आम्ही हे सांगतोय कारण आम्हीही, आपल्याप्रमाणे सोशल मीडिया वापरतो. त्यामुळे आमच्या वागण्यात ही हा बदल झालाय हे जाणवतं.
पण आमचं सुदैव असं की लेखन करायचं असल्याने अनेकवेळा जास्त लांबीचे व्हिडियोज हे बघावेच लागतात. त्यामुळे सुरुवातीलाच मनात अनेक गोष्टी आल्या तरी व्हिडियो बघणं थांबवता येत नाही. पण अनेकवेळा उलटं ही होतं. काही व्हिडियोज, सुरुवातीपासूनच इतके खिळवून ठेवणारे असतात की आपण ते व्हिडियो आपसूक पूर्ण बघतो. सहसा असे व्हिडियोज, हे प्रचंड वायरल ठरतात असा ही अनुभव आहे. आता आज आमच्या टीमने बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. कॉलेज फेस्टिव्हल्स मध्ये विद्यार्थी जे परफॉर्मन्स सादर करतात ते आमची टीम बघत होती.
एकेक करत परफॉर्मन्स बघताना अचानक एका व्हिडियो वर येऊन आमची गाडी थांबली. मग ती पुढेच जाईना. कारण व्हिडियो पाच मिनिटांचा असला तरी त्यात मनोरंजन मूल्य दिसून आलं. बरं हे केवळ आम्हालाच वाटलं अस नाहीये. या व्हिडियोला तब्बल पावणे पाच व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून आपल्याला या व्हिडियोच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. हा व्हिडियो नोएडा येथील एका शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणातला आहे. त्या संस्थेने २०१८ साली अयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान एका मुलाने जबरदस्त डान्स केला होता त्याचा हा व्हिडियो आहे. त्या मुलाचं नाव अर्पित असल्याचं कळतंय. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला कोलेज फेस्टिव्हल्स मध्ये असतं, तसं वातावरण दिसून येतं. विद्यार्थी आणि शिक्षक गोलाकार आकारात बसले आहेत, तसेच कोर कमिटी पाठीशी उभी राहून सगळं सांभाळते आहे. किंबहुना समोर चालणाऱ्या डांसपेक्षा त्यांचीच जास्त धावपळ होते असते. आणि समोर अर्थातच हा डान्स चालू असतो. सुरुवातीला भरपूर आवाजात हा परफॉर्मन्स चालू होतो. पण आपण नीट लक्ष दिलं तर कळतं की डान्स करणाऱ्या त्या मुलाचं या गोंगाटाकडे लक्ष नसतं. कारण आपल्याला सुरुवातीला वाटतं, हा केवळ वॉर्म अप करतोय. पण नीट लक्ष दिल्यावर कळतं, तो तर गण्यातले बिट्स पकडत असतो.
एखाद्या कलाकाराने केवळ कलेकडे लक्ष देऊन सादरीकरण केलं की ते असं उत्तम सादरीकरण होतं. कारण गोंगाट शांत झाल्यावर ही त्याच्या बिट्स पकडणं सुटत नाहीत. किंबहुना त्याने केलेली कोरिओग्राफीच अशी असते की सुरुवातीचं म्युझिक आणि त्याने त्यातील बिट्स पकडणं, हे प्रेक्षकांना जाणवावं. पण सुरुवातीचा गोंधळ, बराच व्यत्यय आणतो. पुढेही या डान्सर मुलाला प्रोत्साहन दिलं जातंच. पण गोंधळ होत नाही. परिणामतः पूर्ण परफॉर्मन्स बघायला मिळतो. बरं हा मुलगा, केवळ एकाच गाण्यावर परफॉर्मन्स देतो असं ही नाही. या पाच मिनिटांत आपल्याला विविध प्रकारचे म्युझिक ऐकायला मिळतं. तसेच त्यावर वैविध्यपूर्ण स्टेप्स ही बघायला मिळतात. अनेकवेळा गाण्यानुसार स्लो स्टेप्स तर कधी जबरदस्त वेगाने डान्स करणं हे सगळं होत असत. आपल्याला हा परफॉर्मन्स जसा आवडतो, तसाच तो उपस्थितांना ही आवडतो. त्यांच्या देहबोलीवरून ते कळून येतं. उजव्या बाजूला बसलेल्या मुली तर थोड्या वेळाने बसलेल्या बेंचवर ताल धरताना दिसून येतात. एखादा डान्स बघताना, वा गाणं ऐकताना, प्रेक्षकांनी तल्लीन होऊन जाणं ही पहिली शाबासकी त्या कलाकारासाठी असते.
आणि खरं सांगायचं तर हा मुलगा, ज्यांचं नाव अर्पित असल्याचं कळतं, तो खरंच या शाबासकीचा हकदार आहे. कारण एवढा वेळ परफॉर्मन्स करताना त्याच्या चेहऱ्यावर कुठेही कंटाळल्याचे भाव नसतात. तसेच त्याची शु लेस ही सुटलेली असते. पण डान्स न थांबवता तो परफॉर्मन्स करत राहतो. एवढा तो त्यात गुंतलेला असतो. आणि असे कलेत गुंतलेले कलाकारच उत्तम सादरीकरण करतात. तो याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणायला हरकत नाही. तसेच चार वर्षे होऊनही आजही हा डान्स आपल्याला आवडून जातो हे ही नमूद करायला हवं. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडून गेला असेलच. पण, आपण हा व्हिडियो बघितला नसेल, तर जरूर बघा. आपल्याला नक्की आवडेल. तसेच आता हा व्हिडियो कुठे शोधायचा वगैरे विचार नका करु. कारण, आपली टीम हा व्हिडियो, आपल्या वाचकांसाठी या लेखाच्या खाली शेअर करते आहे. तेव्हा या व्हिडियोचा जरूर आनंद घ्या. तसेच हा लेख शेअर करून तो इतरांना ही द्या.
बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :