Breaking News
Home / मनोरंजन / ह्या कॉलेजच्या शिक्षिकेने संपूर्ण वर्गासमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या कॉलेजच्या शिक्षिकेने संपूर्ण वर्गासमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

डान्स मग तो कोणताही असो आपल्याला आनंद देऊन जातो. फक्त एकच की त्यातील भावना आपल्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कदाचित डान्सचा एखादा नवीन प्रकार बघत जरी असलो तरी त्यातील मूळ भाव कळला पाहिजे. आणि तो तसा कळतो. फक्त डान्स करणारी व्यक्ती अगदी मनापासून डान्स करणारी असावी. कारण मनापासून डान्स केला की त्यात आपोआप हवे असलेले हावभाव, देहबोली आणि डान्स स्टेप्स बरोबर जमून जातात. मग ती व्यक्ती नियमित डान्स करणारी असो वा नसो.

अर्थात हे सगळं करण्यासाठी डान्ससोबत गाण्यावर ही प्रेम असावं लागतं. कारण आपण आपलं नृत्य ज्यावर सादर करणार आहोत त्याच्याशी एकरूपता असावी लागते. ती एकदा आली की पुढचा डान्स कठीण न वाटता अगदी सहज होऊन जातो. आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोच उदाहरण घेऊ. हा व्हिडियो दक्षिणेकडील आहे. बहुधा तामिळनाडू मधील असावा. कारण या डान्स व्हिडियोत आपल्याला एक तामिळ गाणं ऐकायला येतं. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं हे गाणं आजही लोकांच्या मनावर छाप पाडून आहे हे ही यानिमित्ताने कळून येतं.

‘सपनसुंदरी’ असं या गाण्याचं नाव. आता नावात काय आहे असं शेक्सपिअर म्हणून गेला असला तरी नावात बरंच काही असतं. हे गाणं आपण ऐकलं असो वा नसो, या गाण्यात काय आहे हे आपल्याला एव्हाना कळलं असेलच. असो. या गाण्याने सोशल मीडियावर करोडोंच्या संख्येने व्ह्यूज मिळवले आहेत आणि यापुढेही मिळवतील. कारण एवढ्या वर्षानंतर ही हे गाणं व्हिडियोतील समारंभांमधून वापरलं जातं आहे. या व्हिडियोतील समारंभ हा बहुधा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला समारंभ होता अस कळतं. तसेच डान्स करणाऱ्या ताई स्वतः शिक्षिका होत्या अस कळतं. पण त्याचं वय बघता, शिक्षिका होत्या की विद्यार्थिनी ते ठामपणे सांगता येत नाही. असो. त्या कोणीही असोत. पण त्यांचा डान्स एवढा जबरदस्त असतो की मजा येऊन जाते. वर उल्लेख केलेलं गाणं हे मजेशीर आणि काहीसं खट्याळ आहे. या ताईंच्या डान्समधून हा खट्याळपणा दिसून येतो. म्हणूनच की काय दोन तीन वेळेला कॅमेऱ्याच्या पाठीमागून जोरदार आनंदाचे चित्कार ऐकायला येतात. या ताईही मस्त नाचत असतात. तसेच वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचं या गाण्यावर ही प्रेम असावं. कारण त्यामुळेच त्या डान्स स्टेप्स ही अगदी उत्तम करू शकतात.

आमच्या टीमला तर हा व्हिडियो बघताच क्षणी आवडला. छोटासाच व्हिडियो आहे. त्यामुळे या व्हिडियोने आमचा थोडासाच वेळ घेतला. पण आनंद मात्र भरपूर दिला. तेव्हाच म्हंटलं हा व्हिडियो आपल्या वाचकांसोबत शेअर करायला हवा. आपल्याला झालेला आनंद त्यांनाही द्यायला हवा. त्याच हेतून आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे. तसेच आपल्या वाचकांसाठी खास म्हणून सदर व्हिडियो हा आमची टीम या लेखाच्या शेवटी शेअर करते आहे. जेणेकरून या लेखासोबत आपल्याला त्या व्हिडियोचा ही आनंद घेता यायला हवा. तेव्हा आपण हा व्हिडियो जरूर बघा. त्याचा आनंद घ्या.

सोबतच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही जरूर वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *