Breaking News
Home / मनोरंजन / ह्या क्लासच्या सरांचा आवाज ऐकून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

ह्या क्लासच्या सरांचा आवाज ऐकून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

गेल्या महिन्यातच शिक्षक दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने आपण सगळ्यांनीच आपल्या गुरुजनांच्या आठवणींना उजाळा दिला असणार. आमची टीमही यात सहभागी होतीच. यानिमित्ताने काही वायरल व्हिडियोज ही बघण्यात आले होते. याचमुळे की काय अजून एक व्हिडियो बघण्याचा योग आला. हा व्हिडियो एवढा सुरेल वाटला की याविषयी आपल्या वाचकांना कळायला हवं असं वाटलं. त्यातूनच हा लेख आकाराला येतो आहे, चला तर मग या व्हिडियो विषयी जाणून घेउयात.

हा व्हिडियो आहे राहुल योगी या सरांचा. ते काही वर्षांपूर्वी एका कोचिंग क्लास मध्ये शिकवत असताना त्यांनी एक गाणं गायलं होतं. निमित्त होतं ते शिक्षक दिनाचं. त्यांच्या या सादरीकरणाचा हा व्हिडियो म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला वायरल व्हिडियो आहे. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक विद्यार्थी या व्हिडियोचं रेकॉर्डिंग करत असतो असं जाणवतं. समोर राहुल सर मंचावर उभे असतात. त्यांच्या समोर बसलेल्या मुलामुलींकडून त्यांच्याकडे एका गाण्याची शिफारस केली जात असते. पण गाणं कोणतं असावं यावर एकमत होत नसत. राहुल सरांचं म्हणणं असतं की उगीचच धिंचाक गाणं नको. पण मुलं तर तुम्हाला माहिती आहेतच. त्यात खोडकर मुलांच्या बुद्धीला तर धार येते असे काही प्रसंग असतील तर.

इथेही तेच होतं. सरांकडून ‘बिडी जलायले’ गाण्याची फर्माईश हलक्या आवाजात केली जाते. पण या व्हिडियोत मात्र तो आवाज रेकॉर्ड होतो. दुसरी कडे काही मुलींकडून काही फर्माईशी होत असतात. पण त्या फर्माईशी काय आहेत हेच सरांना कळत नसतं. शेवटी जवळपास दीड मिनिटं हे संभाषण चालल्यावर सर सगळी सूत्र आपल्या हातात घेतात. सगळ्यांना शांत होण्याचं आव्हान करतात. आता ते गाणार एवढ्यात पाठच्या बाकांवरून कोणी तरी ‘गाओ’ अस म्हणतं आणि हशा पिकतो. मग त्यात अजून काही क्षण जातात. एव्हाना दोन मिनिटं झालेली असतात. पण शेवटी राहूल सर गायला लागतात आणि एवढा वेळ आपण वाट बघितली याच बर वाटतं. कारण सर जे गाणं सादर करतात ते अर्थपूर्ण असतं. ‘एक था व्हिलन’ या चित्रपटातलं ‘बंजारा’ हे गाणं या प्रसंगी राहुल सर गात असतात. सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रध्दा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं लोकप्रिय आहेच. सोबतच हा सिनेमा सुदधा खूप लोकप्रिय झाला होता आणि विशेषकरून रितेश देशमुख यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका विशेषतः वाखाणली गेली होती. तर अशा या लोकप्रिय कलाकृतीतलं गाणं गाताना राहुल सर सुदधा अगदी मग्न होऊन गेलेले असतात.

एवढंच काय तर त्यांच्या गाण्यामुळे मघाशी गडबड करणारी मुलं सुदधा आपसूक शांत झालेली असतात. त्यांच्या सोबत नकळत गाणं म्हणत असतात. टाळ्या वाजवत असतात. एक क्षण असाही येतो की सगळे जण त्या गाण्याच्या अर्थामध्ये इतके गुंग होऊन जातात की निरव शांतता अनुभवायला मिळते. गाण्याची ही ताकद आपण अनुभवत असताना नकळत व्हिडियो संपत आला हे आपल्या लक्षात येत नाही. जेव्हा हे गाणं संपत आणि सगळी मुलं अगदी जोरकस टाळ्या वाजवतात तेव्हा आपण भानावर येतो. पहिली दोन मिनिटं, गोंधळात जातात खरी पण पुढची अडीच मिनिटं शांत आनंद घेण्यात जातात. एकूणच ही साडेचार मिनिटं आपल्या आपसूक लक्षात राहतात. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूपच आवडला. आपल्याला ही हा व्हिडियो आवडला असेल अशी अपेक्षा आहे.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख ही आपल्यास आवडला असणार हे नक्की. आपल्याला तर माहिती आहेच की आपली टीम नेहमीच मनोरंजक आणि उत्तम विषयांवर लेखन करत असते. हा लेखही त्याच एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण हे लेखन सातत्याने करण्यासाठी आवश्यक आहे ते आपलं प्रोत्साहन जे आम्हाला आजतागायत मिळत आलं आहे. ते यापुढेही मिळत राहावं हीच सदिच्छा. तेव्हा आपलं प्रोत्साहन आम्हाला देत राहा. लेख वाचत राहा. शेअर करत राहा !! धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.