Breaking News
Home / मनोरंजन / ह्या खोडकर मुलीचे टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या खोडकर मुलीचे टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा वायरल व्हिडीओ

आपल्या जुन्या मित्रांशी आपण गप्पा मारत असताना सहसा आपले विषय असतात ते जुन्या आठवणींचे. त्यातही आपण केलेल्या मजा, मस्ती, खोड्या यांचे. कारण या काळात आपण जेवढी धमाल करतो, तेवढी धमाल खचितच आपल्याला नंतरच्या काळात करता येते. पण हरकत नसते. निदान आपल्या जवळ त्या आठवणी तरी असतात. या आठवणींना उजाळा देणारा एक वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या पाहण्यात आला. आजचा लेख त्याच विषयी. हा वायरल व्हिडियो आहे एका मुलीचा. शाळा कॉलेजात जाणारी ही मुलगी. तिच्या पेहरवावरून ती खेळाडू असेल, हे कळून येतं. कदाचित मॅच संपवून हा संघ आता निघण्याच्या तयारीत असतो. पण याचवेळी या मुलीला काहीशी खोडी करण्याची लहर येते. पक्षी प्राण्यांचे आवाज काढणं यात तिचा हातखंडा दिसून येतो. मग काय पहिल्यांदा आवाज काढते ती कु’त्र्याच्या भुंकण्याचा.

याच वेळी व्हिडियो सुरू असतो आणि तिचा साईड फेस दिसत असतो. त्यामुळे आवाज नक्की कोण काढतंय हे काही क्षण कळत नाही. पण नंतर मात्र खरी गंमत कळते. हा आवाज काढता काढता ती सहज कोकीळेचा आवाज काढते. इतक्या सहजपणे आणि अगदी हुबेहूब आवाज काढण्याच्या तिच्या या कौशल्याचं कौतुक वाटतं. तिचं आणि तिच्या मैत्रिणींचं लक्ष बाहेर कोणी आहे की नाही, याकडेही असतं. त्यामुळे सतत कॅमेऱ्यात न बघता त्यांची मस्करी सुरू असते. त्यात मग आपण त्या गावचेच नाही, हे दाखवण्याचा पण प्रयत्न होतो. पण एकदा मैफिल जमली की मग फर्माईशी सुरू होतात. कु’त्र्याचा आवाज काढ, रडणाऱ्या कु’त्र्याचा आवाज काढ वगैरे. ही कलंदर मुलगी या फर्माईशी पूर्ण तर करते पण नंतर मात्र तिचं तिलाच हसू आवरत नाही आणि हा व्हिडियो ही संपतो.

४० सेकंदांचा हा व्हिडियो आपल्याला चट्कन आपल्या जुन्या आठवणीत घेऊन जातो. कु’त्र्या मांजराचा आवाज काढणं हे प्रकार न केलेलं अगदीच कोणी असेल. किंबहुना नसेलच. लहानपणी या असल्या गोष्टी सुचतातच. पण त्यात एवढ्या हुबेहूब पणे ही मुलगी हे आवाज सादर करू शकते याचं कौतुक वाटतं. म्हणायला गेलं तर हे एक प्रकारे कौशल्य नाही तर टाईमपास. पण यांमुळे आपण काही क्षण का होईना जुन्या आठवणीत रमतो हे खरं. आपल्याला रम्य त्या आठवणीत घेऊन जाणाऱ्या या मुलीचे मनापासून धन्यवाद.

तसेच नेहमीप्रमाणे तुम्ही हा लेखही सोशल मीडियावर शेअर कराल त्याबद्दल आधीच धन्यवाद !!! आपलं प्रेम आमच्या वर सदैव असू दे हीच सदिच्छा. आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही वाचायला आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *