Breaking News
Home / मनोरंजन / ह्या गृहिणीने साडीमध्ये सर्वांसमोर केला हटके डान्स, बघा हा अतरंगी डान्स असलेला व्हिडीओ

ह्या गृहिणीने साडीमध्ये सर्वांसमोर केला हटके डान्स, बघा हा अतरंगी डान्स असलेला व्हिडीओ

सोशल मीडिया म्हणजे उदयोन्मुख होतकरू कलाकारांसाठी एक हक्काचं माध्यम बनलं आहे. त्यातही ज्यांना मनोरंजन क्षेत्रात येण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव येऊ शकले नाहीत अशांसाठी तर ही सुवर्णसंधी म्हणायला हवी. काही जण अशा या संधीच सोनं करून घेताना दिसतात. त्यांचे पोस्ट्स, व्हिडियोज बघून आपल्याला कळून येतं की बंदी या बंदे मैं कुछ तो बात हैं. अशाच एका होतकरू सोशल मीडिया इन्फ्लुइन्सरचा एक वायरल व्हिडियो बघण्यात आला. प्रचंड आवडला. आपल्या वाचकांना ही त्याविषयी माहिती घ्यायला आवडेल अस वाटलं आणि त्यातून आजचा हा लेख लिहिला जातो आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

हा वायरल व्हिडियो दिव्यांका गुप्ता यांचा आहे. दिव्यांका या मूळच्या नॉयडाच्या रहिवासी असून एक गृहिणी आहेत. पण ही त्यांची एक ओळख आहे. त्यांची गेल्या काही वर्षांतील ओळख म्हणजे एक उत्तम डान्सर म्हणून त्या नावारूपाला येत आहेत. वर ज्या व्हिडियोचा उल्लेख केला त्या व्हिडियोचा यात सिंहाचा वाटा आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरू नये. त्यांना डान्स करायला आवडत आणि जिथे संधी मिळेल तिथे त्या डान्स करत असतात.

बरं केवळ डान्स करतात असे म्हणण्यापेक्षा ज्या ऊर्जेने डान्स करतात ते कौतुकास्पद आहे. ही ऊर्जा केवळ अंगभूत आवडीनेच येऊ शकते. त्यांच्यात असलेली डान्सची आवड आणि सादरीकरण करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास यांच्यामुळे त्यांचे सगळे परफॉर्मन्स हे धमाकेदार होतात. आता वर ज्या व्हिडियोचा उल्लेख झाला तो परफॉर्मन्स त्यांनी एका समारंभाच्या वेळी दिला होता. हल्ली समारंभ म्हंटला की डीजे आलाच. त्यात दिव्यांका आणि अजून एक स्त्री समोरच उभ्या असतात. डीजे गाणं सुरू करतो आणि त्यांच्यात डान्स फेस ऑफ सुरू होतो. डान्स फेस ऑफ म्हणजे डान्सची जुगलबंदी. त्यात समोर डान्स करणाऱ्या ताई मस्त स्टेप्स करतात. त्यावर दिव्यांका यांची प्रतिक्रिया भारी असते. एखाद्या प्रोफेशनल डान्सर सारखी त्या प्रतिक्रिया देतात आणि त्यांचा डान्स सुरू करतात. हे धमाल नाचतात. बरं गाणं पण उडत्या चालीच लागलेलं असतं. गुड न्यूज चित्रपटातलं ‘घर दिला दू चंदिगढ मैं’ हे ते गाणं. मग काय दिव्यांका यांच्या एकेक स्टेप ने सगळा माहोल जबरदस्त होतो. त्यांच्या स्टेप्स जशा नवीन आणि धमाकेदार असतात तसाच त्यांचा उत्साह सुद्धा. याचाच परिणाम असा की आजूबाजूला उभ्या असलेल्या इतर स्त्रिया ही त्यांच्या डान्सकडे आनंदाने बघत असतात. तसेच डीजेची टीम तर पूर्णपणे या परफॉर्मन्सचा आनंद घेत असते.

कारण एखाद्या स्त्रीने साडी घालून एवढया जबरदस्तपणे काहीसा वेस्टर्न परफॉर्मन्स देणं अनपेक्षित पण सुखावह असतं. पण यातली गंमत माहिती आहे का ? दिव्यांका यांचा डान्स बघून आपण एखाद्या प्रोफेशनल डान्सरचा डान्स बघतो आहोत असं वाटत राहतं. पण तसं नाहीये. त्यांनी कुठेही डान्सचे धडे घेतलेले नाहीत अथवा सध्या तरी कोणत्याही डान्स ग्रुपबरोबर त्या संलग्न आहेत का याची कल्पना नाही. पण तसंही आपल्याला प्रेक्षक म्हणून फारसा फरक पडत नाही. कारण त्यांचा डान्सच एवढा अफलातून असतो की आपण त्यात गुंग होऊन जातो. त्यांच्या या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीची खास अशी साथ लाभली आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून हे कळून येतं. त्यात हा व्हिडियो वायरल झाल्याने त्यांचं टॅलेंट सगळ्यांसमोर आलं आणि म्हणता म्हणता आज त्यांचे फॉलोवर्स अगदी झपाट्याने वाढताहेत. म्हणजे काही काळापूर्वी केवळ पाच हजारांच्या घरात असलेल्या फॉलोवर्सची संख्या जवळपास दहा पट झाली आहे.

यावरून त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची कल्पना यावी. अर्थात त्या अशाच उत्साहात, जल्लोषात डान्स करत राहिल्या तर ही लोकप्रियता अशीच वाढत राहील हे नक्की. आपल्या टीमकडून दिव्यांका यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!

अनेक उदयोन्मुख कलाकारांविषयी आपली टीम सातत्याने लिहीत असते. त्यांच्याविषयी आपल्या वाचकांना कळावं हा त्यामागचा उद्देश असतो. दिव्यांका यांच्यावरील लेख हा याच मांदियाळीतील एक लेख आहे. आपल्या टीमचा आजचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहनपर आणि मार्गदर्शक असतात. त्यातूनच नवनवीन लेख आकारास येत असतात. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला नेहमी मिळत राहू दे. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.