बॉलिवूडमध्ये अनेक अशी जोडपी आहेत जे लग्न झाल्यापासून एकमेकांची साथ निभावत असून अजूनही सोबत आहेत. ज्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असून विवाहानंतर जे कधी वेगळे झाले नाही. विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. ह्या दोघांची जोडी चाहत्यांनी खूप आवडते. दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले होते. वयाने ऐश्वर्या अभिषेकपेक्षा २ वर्षांनी मोठी आहे, परंतु हि वयाची गोष्ट दोघांना एक होण्यापासून थांबवू शकली नाही. असं सांगितलं जातं कि ऐश्वर्याला मंगळसुद्धा होते, ह्या गोष्टीमुळे दोघांच्या विवाहादरम्यान अडचणी सुद्धा येत होत्या, परंतु पूजा-विधी करून सर्व ठीक केले गेले. दोन दिवसांअगोदरच ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांना आराध्या नावाची एक सुदंर मुलगीदेखील आहे. हे सगळे एका सुखी कुटुंबासारखे एकत्र राहतात.
परंतु तुम्हांला माहिती आहे का, कि एक वेळ अशी सुद्धा आली होती जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फो’टाबद्दल खूप चर्चा होत होत्या. तेव्हा अभिषेकने मजबुरी मध्ये सोशिअल मीडियावर हे देखील लिहून टाकले होते कि, ‘होय मी घटस्फोट घेत आहे..’ खरंतर हा इशारा अभिषेकने मीडियावर नाराज झाल्यामुळे दिला होता. चला तर अगोदर ह्यामागची संपूर्ण घ’टना जाणून घेऊया. २०१६ सालची गोष्ट आहे. तेव्हा ऐश्वर्या आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सरबजीत’ च्या प्र’मोशनदरम्यान व्यस्त होती. ह्याच दरम्यान एका इव्हेंटमध्ये ती आपला पती अभिषेक बच्चन सोबत आली होती. इथे मीडियाने अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांना एकत्र पोज देण्यासाठी सांगितले. तिथे अभिषेकने रागामध्ये ऐश्वर्याच्या दिशेने इशारा करत सांगितले कि, ‘ह्यांचेच फोटो घ्या.’ खरंतर हि गोष्ट मोठी नव्हती. कारण ऐश्वर्याच्या चित्रपटाचे प्र’मोशन असल्यामुळे कदाचित त्याने ऐश्वर्याचे फोटोज घेण्यासाठी सांगितले असेल. परंतु मीडियाने ह्या छोट्या गोष्टीची बातमी बनवत अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यांबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले. हे सुद्धा लिहिले गेले कि, हे दोघे घटस्फो’ट घेऊन लवकरच वेगळे होतील.
जेव्हा ह्या अ’फवा खूप जास्त जोर धरू लागल्या आणि थांबण्याचे नावच घेत नव्हत्या तेव्हा मात्र अभिषेकने आपला राग व्यक्त करण्यासाठी ट्वि’टरची मदत घेतली. त्याने ट्विट करत सांगितले कि, ‘ठीक आहे, मी घटस्फोट घेत आहे. मला सांगण्यासाठी धन्यवाद, काय मला तुम्ही हे सुद्धा सांगणार का कि मी दुसरे लग्न केव्हा करत आहे ते ?’ ह्या ट्विटनंतर अभिषेकने ह्या विषयावर एका मुलाखतीत सुद्धा चर्चा केली होती. त्याने सांगितले होते कि, ‘मला माहिती आहे कि खरं काय आहे ते, मीडियाच्या कोणत्या गोष्टींना किती गांभीर्याने घ्यायला हवं ते. आता कोणी तिसऱ्या व्यक्तीला हि गोष्ट सांगण्याची गरज नाही कि, मला आणि ऐश्वर्याला आमचे नातं कसं निभवायचं आहे ते. ऐशला खूप चांगलं माहिती आहे कि मी तिच्यावर किती प्रेम करतो. आणि मला सुद्धा माहिती आहे कि ऐश्वर्या माझ्यावर किती प्रेम करते ते.’ तर हा होता ह्यामागचा खरा किस्सा. ह्या लोकप्रिय जोडीचे एकमेकांवरील प्रेम तसेच राहू दे आणि दोघांनाही करिअरच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाकडून खूप शुभेच्छा. त्याचसोबत सरबजीत चित्रपटाच्या इव्हेंटदरम्यान मीडियाने ज्या व्हिडिओचा छोटोसा भाग हायलाईट करून त्यात तिखटमीठ घालून बातमी बनवली होती, त्याचा संपूर्ण व्हिडीओ आम्ही देत आहोत नक्की पहा.
बघा व्हिडीओ :