Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चाचांनी घोळक्यात केलेला मुर्गा डान्स’ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या चाचांनी घोळक्यात केलेला मुर्गा डान्स’ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा हा अतरंगी व्हिडीओ

आपण केलेलं काम मग ते लिखाण, डान्स, गायन किंवा अजून काहीही असो हे प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. आजकाल या प्रसिद्ध होण्याचा समानार्थी शब्द म्हणजे वायरल होणं होय. असं वायरल होणं आणि तसं व्हावंसं वाटण हे अगदी साहजिक आहे. अगदीच नैसर्गिक भावना आहे. पण अस असलं तरी आपल्या प्रत्येकाचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. आता बघा ना, काही जण अगदी सहजगत्या एखादी गोष्ट करतात आणि ती वायरल होऊन जाते.

त्याउलट काही जण जीवाचा अगदी आटापिटा करतात, प्रसंगी वेळ आणि पैसा खर्च करतात. बरं एवढं करूनही काही वेळेस यश मिळतं तर काही वेळेस म्हणावं तसं यश न आल्याने निराशा पदरी येते. पण असं का होतं? त्याचं साधं उत्तर आहे प्रेक्षकांना जी गोष्ट आवडते ती वायरल होते. बरं या आवडणाऱ्या गोष्टींची यादी तशी बरीच मोठी आहे. पण काही गोष्टी अगदीच सामायिक दिसून येतात. त्यातील अतरंगीपणा आणि कोणाचीही भीडभाड न बाळगता केलेलं सादरीकरण ह्या दोन गोष्टी असतात.

बरं काहींकडे फक्त या दोघांपैकी एखादीच गोष्ट असते. पण काही जण मात्र बिनधास्त आणि अतरंगी असे दोन्ही असतात. त्यांना कसं काय जमतं ते माहिती नाही. पण जेव्हा जमतं, तेव्हा धमाल उडते. अशी धमाल जी पुढे बराच काळ लक्षात राहते. आज आपल्या टीमने बघितलेला व्हिडियो असाच आहे. हा व्हिडियो आहे एका काकांचा. खरं तर दाढी पिकली आहे, वय दिसून येतंय पण काकांची मजा मस्ती करण्याची सवय मात्र कायम असल्याचं दिसून येतं. आम्हाला असं का वाटतं अस वाटत असेल तर थोडं थांबा. जाणून घ्या. अहो हे काका आपल्याला भेटतात ते एका वायरल व्हिडियोत. आता वायरल व्हिडियो म्हंटलं की डान्स बहुधा असतोच. अगदी बरोबर. यातही तो असतो. पण कोणत्या गाण्यावर नाही तर केवळ म्युझिक वर. हे म्युझिक कोणतं असतं? तर हे असतं एका कोंबड्याच्या आवाजाचं म्युझिक. आपणही अनेक वेळा ते ऐकलं असेल. कधी तरी आपल्या आजूबाजूला कोणाला तरी या गाण्यावर डान्स करताना ही पाहिलं असेल. नसेल पहिलं तरी हरकत नाही. हे काका आहेत ना त्यांचा डान्स बघून ती इच्छा ही पूर्ण होते. हा व्हिडियो तसा अगदी कमी वेळेचा आहे. पण एवढ्याश्या वेळेत ही काका मजा आणतात.

ही मजा येण्याचं कारण काका करत असलेला डान्स होय. कारण यात केवळ म्युझिक वाजत असल्याने बिट्स पकडत नाचणं महत्वाचं असतं. काका हे अगदी बरोबर करताना दिसतात. त्यांना कदाचित या गाण्यावर डान्स करण्याची सवय असावी असं दिसतं. कारण अतरंगी हावभाव देत देत, हे काका मस्त डान्स करतात. एवढा की सगळे जण काकांचा हा डान्स कॅमेऱ्यात कैद करू इच्छित असतात. मंचावर असणारे सगळे ही काकांच्या या डान्सने आनंदी झालेले असतात. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेल. नसेल बघितला तर एकदा बघा. आपल्याला आवडून जाईल. आपल्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि आपल्या वाचकांना याविषयी जाणून घ्यायला आवडेल अस वाटलं.

त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.