Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चाचा ने मिरवणुकीमध्ये ढोल ताशाच्या तालावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या चाचा ने मिरवणुकीमध्ये ढोल ताशाच्या तालावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

सणांच्या स्वागतासाठी किंवा निरोप समयी होणारं ढोल ताशा वादन म्हणजे पहावा आणि अनुभवावा असा सोहळा. अगदी एखाद्या मिरवणुकीस शोभा आणण्याचं काम ढोल ताशा मुळें होतं. अनेक जण तर ढोल ताशांच वादन होत असताना स्वतःला रोखू शकत नाहीत. ढोल ताशांचा आवाज कानावर पडला की आपोआप त्यांचे पाय थिरकायला लागतात. हात हवेत जातात आणि अगदी बेधुंद होत ही मंडळी त्या वादानाचा आनंद घेत असतात. याचंच एक उदाहरण आपल्याला एका व्हिडियोतून मिळालं. हा व्हिडियो आहे पुण्यातील. येथील एम. जी. रोड वरील एका मिरवणुकीचा हा व्हिडियो आहे. अवघ्या बारा सेकंदांचा हा व्हिडियो आहे. पण तरीही त्यात असणारी ऊर्जा आपल्यातही नकळतपणे संचारते.

या व्हिडियोच्या सुरुवातीपासून ढोल ताशांचं वादन होत असत. सगळी मंडळी गोलाकार उभी असतात आणि त्यांच्या मध्ये एक चाचा उभे असतात. व्हिडियोत अथपासून ते इतिपर्यंत केवळ चाचा आणि त्यांचा उत्साहि डान्स दिसून येतो. कधी कंबर मटकावत तर कधी हातवारे करत काका नाचत असतात. त्यांच्यात जणू उत्साहाचं भरतं आलेलं असतं. त्यांचा हा डान्स बघायला आजूबाजूला अनेक बघे जमलेले असतात. पण चाचा मात्र केवळ डान्स करण्यात व्यस्त असतात. आजूबाजूने कोण काय करतंय यापेक्षा ते त्या क्षणांचा आनंद घेत असतात. त्यांच्या या उत्साहामुळे ढोल ताशा पथकातली मंडळींसुद्धा आनंदित झालेली असतात. त्यांना चाचांच्या नाचण्यामुळे प्रोत्साहनच मिळत असतं जणू. केवळ डझनभर सेकंदांचा हा व्हिडियो.

पण अजून काही क्षण का होईना आपलं मनोरंजन करतो. आपल्या वाचकांना या व्हिडियो विषयी वाचन करायला आवडेल असं वाटलं आणि त्यातून हा लेखप्रपंच घडून आला. आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या वाचकांसाठी आपली टीम नेहमीच नवनवीन विषयांवर लेखन करत असते. आपणही त्यास उत्तम प्रतिसाद देत असता. येत्या काळातही आपली टीम उत्तमोत्तम लेख लिहीत राहीलच. त्यांना ही आपण उत्तम प्रतिसाद द्याल हे नक्की. आजचा लेखही यास अपवाद नसावा. तेव्हा आपला हा लोभ आपल्या टीमच्याप्रति कायम राहू द्या. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.