Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चिमुकलीचा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील तिच्या प्रेमात पडाल, बघा व्हिडीओ

ह्या चिमुकलीचा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील तिच्या प्रेमात पडाल, बघा व्हिडीओ

हा लेख वाचत असताना आपल्या सगळ्यांना श्रावणाचे वेध लागले आहेत. श्रावण महिना म्हंटला की सणांची रेलचेल आलीच. तसेच श्रावणा नंतर येणार भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव म्हणजे वर्षातील सगळ्यांत आनंदाचा सण. या दहा दिवसांत आपण गणरायाचा मनोभावे पाहुणचार करतो. आपली सगळी दुःख्ख त्याच्या चरणी अर्पण करतो आणि नवीन जोमाने कामाला लागतो. या दहा दिवसांत सगळं वातावरण कसं प्रसन्न असतं. खासकरून बच्चे मंडळींना तर हा काळ म्हणजे आनंदाची पर्वणी. मंडप सजावट करण्यात सहभागी होण्यापासून ते मोदकांवर ताव मारण्यापर्यंत सगळ्यात मजा असते. त्यातही जेव्हा गणरायाच्या आगमनाला किंवा विसर्जनवेळी वाजंत्री येतात तेव्हा या आनंदाला उधाण येतं. यात अगदी चिल्ली पिल्ली मंडळी सुद्धा मागे नसतात बरं. त्यांना या सगळ्यात जो आनंद मिळतो तो आपल्या चेहऱ्यावर ही आनंद घेऊन येतो.

असाच आनंद आपल्या चेहऱ्यावर घेऊन येणारा एक व्हिडियो आपल्या टीमने नुकताच बघितला. खरं तर गणेशोत्सव अगदी महिन्याभरावर येऊन ठेपला असताना हा व्हिडियो बघायला मिळणं हा उत्तम योगायोग ठरला. आपल्या टीमला तर आनंद झालाच. मग हा आनंद आपल्या वाचकांना मिळावा म्हणून हा लेखनप्रपंच. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला व्हिडियोत डाव्या बाजूला एक मकर दिसून येतो. नीट बघितल्यावर त्यात आपले लाडके गणराय विराजमान झालेले दिसून येतात. त्यांचं ओझरतं दर्शन होत असतं, पण तेवढही पुरेसं असतं. आपण मनोमन त्यांना नमस्कार करतो. त्यांच्या समोरच आपल्याला वाजंत्री मंडळी दिसून येतात. आणि या दोहोंमध्ये असते एक चिमुकली. बाप्पांची ही छोटू भक्त मस्तपैकी उभी असते. तेवढ्यात बाप्पांचं एक गाणं वाजू लागतं. ‘गणपती माझा नाचत आला’. गणेशोत्सव काळात काही गाणी वाजली नाहीत तर अपुरं अपुरं वाटतं त्यातलं हे अव्वल स्थानी असणारं गाणं. शिंदे साहेबांनी आपल्या पहाडी सुरांनी या गाण्याला असं काही सदाबहार केलंय की आजही हे गाणं ऐकताना मनाला नकळत प्रसन्नता येते.

यास ही नवी पिढी पण अपवाद नाही हे कळून येतंच या व्हिडियोतुन. हे गाणं वाजायला सुरुवात झाल्यापासून ही छोटी बाळ एक ताल पकडते. त्यामुळे एक स्टेप करत जागच्या जागी नाचत राहते. गाणं जस जसं पुढे सरकतं तस तसं ती हातवारे करायला लागते. त्यात ते वाजंत्री घेऊन आलेले काका सुद्धा सामील होतात. आपल्या चेहऱ्यावर ही नकळत एक हास्य येऊन जातं. आपण तिच्या बाललीला पाहण्यात असे काही गुंगून जातो की अर्ध्या मिनिटांचा हा व्हिडियो संपतो तेव्हा आपण काहीसे खट्टू होतो. एवढा गोड व्हिडियो पण कमी वेळेचा वाटतो. मग ही कसर भरून काढण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडियो पुन्हा पुन्हा बघतो. त्यानिमित्ताने बाप्पा सुद्धा दिसतात आणि त्यांच्या या चिमुकल्या भक्तांचा निरागस डान्स ही पाहता येतो. हा व्हिडियो आपल्या चेहऱ्यावर नकळत हास्य आणि मनात प्रसन्नता आणतो हे नक्कीच. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला ही हाच अनुभव आला असेल.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख ही आपल्याला आवडला असणार यात शंका नाही. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा. तसेच नेहमीप्रमाणे आपल्या टीमचा हा लेखही मोठ्या प्रमाणात शेअर करा. आपल्या सकारात्मक कमेंट्स आणि सोशल मीडिया शेअर यांतून नवनवीन विषयांवर लेखन करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं. तेव्हा येत्या काळातही आपला हा लोभ, आपल्या टीमवर कायम असू द्या. लेख वाचत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *