Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चिमुकलीचा गोड आवाज तुम्हालासुद्धा ऐकत राहावेसे वाटेल, बघा व्हिडीओ

ह्या चिमुकलीचा गोड आवाज तुम्हालासुद्धा ऐकत राहावेसे वाटेल, बघा व्हिडीओ

गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं की आपल्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. आपल्या आवडत्या गणरायाचं स्वागत, पूजा-अर्चा, आरत्या, प्रसाद आणि शेवटी निरोप असं सगळं आपण दरवर्षी करीत असतो. त्या गणोबाचं आणि आपलं अगदी अतूट नातं असतं. त्याच्या संदर्भात आपल्या कितीतरी आठवणी निगडीत असतात. आठवतं का, किती लहानपणापासून गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण कसे रंगून-दंगून जात होतो? त्या आठवणींना उजाळा देण्याकरीता आजचे हा खास व्हिडीओ आणि लेख आम्ही तुमच्यासाठी आणला आहे.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… अशी एक उस्फूर्त घोषणा किंवा प्रार्थना आपण गणपती बाप्पाची आरती झाली देतो. पण खरी मजा आरतीच्या वेळी असते. आता लवकरच गणरायाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठीची लगबग देखील आता घरोघरी पाहायला मिळत आहे. गणपतीची आरास कशी असावी? प्रसादासाठी कोणकोणते नैवेद्य बनवायचे? याची तयारी देखिल अगोदरच ठरलेली असते.

मात्र ह्या सर्वातून आपण आरती पाठ करायचे विसरतो हे न उलगडणारे कोडे. कारण बऱ्याच जणांच्या आरत्या ह्या ऐकून ऐकूनच पाठ झालेल्या असतात. त्यामुळे आपल्याला आरती म्हणता येते हा एक गोड गैरसमज प्रत्येकाच्याच मनात रुजलेला पाहायला मिळतो आहे. आजचा व्हिडीओ हा स्पेशल आरतीचा आहे. एका लहान क्युट मुलीने इतक्या सुंदर पध्दतीने आरती म्हटली आहे की, ते पाहून तुमच्याही चेहऱ्यावर एक गोड स्माईल येईल.

काही अंशी समूहातून कोण्या एकाच्याच ह्या आरत्याचा शब्द न शब्द पाठ असतील मात्र आरती म्हणणारे बाकीचेही त्याच अविर्भावात येऊन आरती पाठ असल्याचे मिरवताना दिसतात. आरतीच्यावेळी कडव्यांची अदलाबदल करणे हे देखील पाहणे बऱ्याच वेळा मजेशीर ठरते. चुकून एखादा व्यक्ती मोठमोठ्या आवाजात चुकीचे कडवे म्हणतो त्यावेळी सगळेच जण त्याच्याकडे बघतात मग तो आरती म्हणताना कसा चुकला हे त्याच्या लक्षात आणून देतात. मग अशावेळी आरतीच्या पुस्तकांचा देखील आधार घेतला जातो.

ज्यांना आरती म्हणता येत नाही त्यांच्यासाठी हा उपाय तर अगदी त्यांच्यासाठी सहज सोपा वाटतो. कित्येक जण तर शब्दांमध्येही बदल करताना दिसतात… पण आजच्या उभा व्हिडीओत ज्या चिमुकलीने आरती म्हटली आहे. तिने आरती तर बरोबर म्हटली पण तिच्या बोबड्या बोलांनी ती आरती अधिकच सुंदर झाली. या आरतीला तोडच नाही…

ऐन गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आणि त्यातच व्हायरल झालेला हा चिमुकलीचा हा सुंदर व्हिडीओ, हे कॉम्बिनेशन अप्रतिम आणि क्युट आहे. या व्हिडीओत तिचे शब्द बोबडे असले तरी तिची भावना, तिची प्रार्थना नितळ मनाने केलेली आहे. तिचा आवाज पण एकदम मनाला भावणारा आहे. हा व्हिडीओ तुमचं फक्त मनोरंजन करणार नाही तर त्यासोबतच बाप्पाच्या आगमनाची वेळ झाली असे म्हणत तुमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आणेल, याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *