Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चिमुकलीने केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीसुद्धा तिचे फॅन्स व्हाल, बघा व्हिडीओ

ह्या चिमुकलीने केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीसुद्धा तिचे फॅन्स व्हाल, बघा व्हिडीओ

एखादी गोष्ट जेव्हा नव्याने दाखल होते तेव्हा तिला दोन प्रकारे प्रतिसाद मिळतो. पहिला म्हणजे त्या गोष्टीला संधी म्हणून बघितलं जातं आणि दुसरं म्हणजे तिची हेटाळणी केली जाते. अर्थात हे सुरवातीला होतं. नंतरच्या काळातही या गोष्टीचे प्रशंसक आणि विरोधक हे असतात. पण जसजशी तिची लोकप्रियता वाढते तसतसं तिचं महत्व अनेकांना पटत जातं आणि ती लोकांच्या विश्वासास पात्र ठरते. इतकंच नव्हे तर अनेक जण तिचा सुयोग्य उपयोग करताना दिसतात.

सुज्ञ वाचकांना जाणवलं असेलच की आमचा इशारा कोणत्या दिशेने आहे. सोशल मीडिया ही गेल्या दीड एक दशकातील आपल्या आयुष्यात घडलेली महत्वाची गोष्ट आहे. कारण या माध्यमाने आपल्या जगण्याची समीकरण लक्षात यावीत इतक्या प्रमाणात बदलली आहेत. त्याची कारण, त्याची रूपं आणि त्याचे परिणाम आपण जाणता. त्यामुळे त्याविषयी विवेचन करण्यात अर्थ नाही. पण काही जण याच माध्यमाचा उत्तम वापर करून घेताना दिसतात. यात अर्थातच कलाकारांचा क्रमांक पहिला असणार हे नक्की. कारण सोशल मीडियाने असं काही माध्यम उपलब्ध करून दिलं ज्यातून तुम्ही बसल्या जागेतून आपली कला सादर करू शकता.

बरं ही कला केवळ आपल्या जवळपासच पाहिली जाते असं नाही. सोशल मीडियावर तिला जगाचं व्यासपीठ मिळतं. त्यामुळे होतकरू आणि उत्साही तरुण कलाकारांना थेट प्रेक्षकांसमोर येण्याचं हक्काचं साधन मिळतं. यात अजून एक घटक असा असतो ज्यांना आपण कलाकार आहोत, आपल्यात काही वेगळं कौशल्य आहे वगैरेची तेव्हढीशी जाण नसते. पण ती त्यांना तशी करून दिली की त्यांच्यातील कलाकारांना वाव मिळतो आणि मग एकसे एक कलाकृती जन्माला येतात. हा घटक म्हणजे बालकलाकार होय. आपल्याला जे जमतंय त्या कलेचा आनंद घेणं इतकंच त्यांना माहिती असतं. आता ‘चैतन्या शिंगटे’ या बालकलाकार मुलीचं उदाहरण घेऊ. तिचं वय अगदी लहान आहे पण तिचा डान्स हा आपल्यावर प्रभाव पाडून जाणारा आहे. तिच्या डान्स स्टेप्स जशा उत्तम असतात तसाच तिचा वावर ही आत्मविश्वासपूर्ण असतो. हे नवीन पिढीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आमच्या पिढीसारखं ही पिढी मागेमागे राहत नाही. आपल्याला जे येतं ते अगदी बिनधास्तपणे सादर करतात.

तसेच या गोंडस मुलीचा चेहरा नेहमी हसरा असतो. सदैव हसमुख ! त्यामुळे तिच्या डान्समध्ये तिचा वावर हा प्रसन्न ही होतो. त्यामुळेच की काय जेव्हा तिच्या डान्स व्हिडियोने युट्युब वर पदार्पण केलं होतं तेव्हापासूनच ती लोकप्रिय ठरली आहे. बरं युट्युबच काय तर इंस्टा वर सुद्धा तिचे हजारोंनी फॉलोवर्स आहेत. यावरून तिची आणि तिच्या नृत्याची, अभिनयाची कल्पना यावी. नुकताच तिचा वाढदिवस साजरा झाला. आमच्या टीमला तिचा डान्स, तिचा अभिनय आवडतो. त्यामुळे तिच्या वाढदिवसानिमित्त काही लिहावं अस वाटलं आणि त्यातून हा लेख आकारास आला आहे. आमच्या टीमकडून या चिमुकलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! तुला उदंड आयुष्य मिळो हीच सदिच्छा ! तसेच मंडळी वर तिच्या डान्स व्हिडियोचा उल्लेख झाला. सदर व्हिडियो आमची टीम आपल्या वाचकांसाठी शेअर करते आहे. आपण त्याचा जरूर आनंद घ्या.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख !आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.