सोशल मीडिया सध्या फक्त व्हायरल व्हिडीओसाठी ओळखला जातो. ग्रामीण भागात आणि म्हाताऱ्या मंडळींसाठी तर अजूनही व्हायरल होणारे व्हिडीओ म्हणजेच सोशल मीडिया अशी ओळख आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा अंदाज कुणालाच नाही. गाण्यापासून तर भांडणापर्यंत… सुरांपासून तर शिव्यांपर्यंत इथं सगळं काही व्हायरल होत असतं. लहान मुलांचे तर असले असले व्हिडीओ व्हायरल होतात, ते पाहून आपण एकतर हसून हसून लोटपोट होतो किंवा त्यांच्या करामती बघून आश्चर्यचकित तरी होतो. मात्र आज आमच्या हाती एक असा व्हिडीओ लागला आहे, जो तुमचे मनोरंजन पण करणार आहे आणि तुम्हाला आश्चर्यचकित सुद्धा करणार आहे. हा व्हिडीओ एका छोट्या मुलीचा आहे. इतक्या कमी वयात मुलींने जी कला दाखवली आहे, ती अफलातून आहे. हा साधासुधा डान्स नसून एक जबरदस्त डान्स आहे. अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ अतिशय प्रोफेशनल डान्सरचे असतात तर काही एकदम गावठी डान्सरचे असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होऊन जातो.
लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्ध लोकांचे डान्स व्हिडीओ तर खास चर्चेचा विषय ठरतात. अशा व्हिडीओंना आवडीने पाहिले जाते. सध्या एका तीन वर्षाच्या मुलीचा डान्स प्रचंड व्हायरल होतोय. या चिमुकलीचा बहारदार डान्सचा व्हिडीओ एकदा बघून तुमचं मन भरणार नाही, हे मात्र नक्की. तिच्या डान्स स्टेप्स आणि मूव्ह्स पाहून सोशल मीडियावर तिला भविष्यातील भावी अभिनेत्री असं म्हटलं जातंय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या 3 मिनिटाचा हा व्हिडीओ एका घरातील दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये तीन वर्षाची एक भलतीच चुणचुणीत आणि उत्साही असणारी मुलगी दिसत आहेत. तिच्या आजूबाजूला अनेक लोक बसलेले आहेत. यातील अनेक लोक हे पाहूणे मंडळी आहेत. तसेच सोबतीला सर्व किलबील परिवार पण आहे. आणि ही चिमुकली एका सुंदर अशा गवळणीवर थिरकताना दिसून येत आहेत. ही मुलगी या व्हिडीओत असा जबरदस्त डान्स करतेय की पाहणारे केवळ पाहतच राहीले.
ही चिमुकली फेमस सिंगर कार्तिकी गायकवाड हिच्या गाण्यावर एक एक डान्स स्टेप्स हुबेहुब कॉपी करताना दिसून येतेय. या व्हिडीओमध्ये डान्स करत असलेल्या मुलींचे मूव्स पाहून एखादी प्रोफेशनल डान्सर डान्स करत असल्याचा भास होतो. या व्हिडिओमधील मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव कौतुक करण्यासारखे आहेत. ही मुलगी टीव्हीवर दिसणार्या कलाकारांप्रमाणे डान्स करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मुलीचा हा डान्स पाहून तुम्हालाही खूप अभिमान वाटेल. अवघ्या काही मिनिटांचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आणि बघितला जात आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओवरील व्ह्यूज आणि लाईक्सचा सिलसीला सुरूच आहे.
हिच्यामुळे माझा दिवस छान गेला. कोण आहे ही चिमुकली? मला तिला भेटायचं आहे. अशा आशयाची कॅप्शन देत लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओमध्ये लहान मुलगी मस्तपैकी एका लोकप्रिय गवळणीवर डान्स करत आहे. तिचे हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून सगळेच लोक आणि डान्सर देखील शॉक झाले आहेत.
बघा व्हिडीओ :