Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चिमुकलीने केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील तिच्या प्रेमात पडाल, बघा व्हिडीओ

ह्या चिमुकलीने केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील तिच्या प्रेमात पडाल, बघा व्हिडीओ

नृत्य आणि गाणी या दोन्ही कला आपल्याला अगदी जवळच्या आहेत. किंबहुना त्या तशा वाटतात. कारण कोणत्याही कलेप्रमाणे आपल्या भावना व्यक्त करण्याचं त्या उत्तम माध्यम आहेत. बरं या कलांतून व्यक्त होण्यासाठी तुम्ही कलाकारच असणं गरजेचं आहे असं नसतं. आपल्याला केवळ आनंद म्हणूनही या कलांच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा आनंद घेता येतो. तसा तो इतर कलांचा ही घेता येऊ शकतो. पण या दोन कला मात्र आपल्या अगदी जवळच्या असल्याने यांचं स्व-प्रकटीकरण केव्हाही आनंद देऊन जातं.

बरं या कला सादर करणं जेवढं आनंददायक असतं, त्याच्याच एवढं या कलांचा प्रेक्षक म्हणून ही अनुभव घेणं हे ही आनंददायी असतं. अगदी कलासक्त म्हणून नाही तर केवळ मनोरंजन म्हणून जरी यांचा अनुभव घेतला तरी किती बरं वाटतं. आता मनोरंजन म्हंटलं की हल्ली अनासायासे सोशल मीडियाचा उल्लेख होतोच होतो. कारण या नवं माध्यमाच्या मार्फत आपल्याला अनेक उत्तम डान्स आणि गाण्याच्या कलाकृतींचा अनुभव घेता येतो. मग तो तुम्ही केवळ मनोरंजन म्हणून घ्या किंवा एखादी कलासक्त व्यक्ती म्हणून आनंद घ्या. बरं त्यातही आनंद वाढवणारी बाब अशी की काही वेळा केवळ मनोरंजन म्हणून एखादी कलाकृती बघताना त्या कलेचा आनंद ही मिळून जातोच !

आता आज आपल्या टीमने बघितलेल्या व्हिडियोच उदाहरण घेऊ. हा व्हिडियो गेले काही दिवस सोशल मीडियावर होता आणि आज आपल्या टीमचं याकडे लक्ष गेलं. या व्हिडियोत आपल्याला एक छोटी मुलगी भेटते. तसेच या व्हिडियोतून आपल्याला तिचं नृत्यकौशल्य दिसून येतं. आता आपल्या पैकी काही जण आमची थट्टा करत म्हणतील की तुम्हाला भारी ज्ञान आहे नृत्याच ! खरं सांगायचं तर आम्हाला फारसं ज्ञान नाहीये. पण एखादा सुंदर डान्स बघितला की कळतं या डान्स सादर करणाऱ्या कलाकाराने यात अगदी आत्मीयतेने डान्स केला आहे. तसेच मंडळी एक गोष्ट कधी पण लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा डान्स आवडणाऱ्या व्यक्ती डान्स करायला लागतात तेव्हा त्या त्यात अगदी गुंगून जातात. मग त्या एकट्या किंवा इतरांसोबत नाचत असू देत काहीही फरक पडत नाही. इतक्या त्या चालू असलेल्या गाण्याचा किंवा सुरवटींचा आनंद घेत घेत डान्स करत असतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला कसाही डान्स होत असो, ही मंडळी नेहमीच उत्तम परफॉर्मन्स देतात हे जाणवून जातं. कारण त्यांच्या मनात मात्र त्या वेळी, त्या क्षणी वाजत असलेल्या गाण्याचा डान्समार्फत आनंद घेणं एवढी एकच भावना असते. ही बाब प्रत्येक वयोगटात आपल्याला हेच बघायला मिळतं. हीच बाब आपल्याला या छोट्या मुलीमध्ये दिसून येते.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा गाणं एव्हाना सुरू झालेलं असतं आणि तिचा डान्स सुदधा ! हे गाणं हरयाणवी भाषेतलं सुप्रसिद्ध गाणं आहे. ‘बहु रंगीली’ हे ते गाणं होय. रुचिका जंगीड यांच्या जबरदस्त आवाजातलं हे गाणं अतिशय लोकप्रिय ठरलं आहे. अशा या लोकप्रिय गाण्यावर ही मुलगी नाचत असते. तिच्या डान्सचं वैशिष्ट्य असं की लहान असूनही गाण्यातील बिट्स पकडून डान्स करणं तिला जमत असतं. तसेच तिला डान्स करण्याचा जो काही उत्साह असतो तो कळून येत असतो आणि आवडून ही जातो. तिच्या आजूबाजूला बरीचशी चिल्ली पिल्ली असतात. त्यांचाही आपापला असा डान्स चालू असतो. पण या मुलीच्या डान्स स्टेप्स, तिचा गाण्याचा आनंद घेत डान्स करणं हे आपल्याला आवडून जातं आणि लक्ष वेधून घेतं. तसेच तिचा आत्मविश्वास ही कौतुक करावा असाच आहे. त्यामुळे अगदी ३० सेकंदांचा असा हा छोटा व्हिडियो असला तरी लक्षात राहतो. आमच्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि आमच्या ही असाच लक्षात राहिला.

तसेच या मुलीचा याच ठिकाणचा दुसरा एक डान्स करतानाचा अजून एक व्हिडियो बघण्यात आला. त्यावेळी या व्हिडियोची पुन्हा एकदा आठवण झाली. म्हंटलं याविषयी या आपल्या वाचकांना सांगायचं राहून गेलंय. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. या लेखाच्या निमित्ताने या लहानग्या मुलीचं तिच्या कलेसाठी खूप खूप कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

चला तर मंडळी हा होता आजचा लेख. या लेखात उल्लेख केलेला व्हिडियो आपल्या वाचकांसाठी आम्ही खाली शेअर करतो आहोत. त्याचा आनंद घ्या. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.