Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चिमुकलीने नवरा नवरींसाठी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या चिमुकलीने नवरा नवरींसाठी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा हा वायरल व्हिडीओ

वायरल गाणी, वायरल डान्स आणि इतर वायरल व्हिडियोज हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून आता बराच काळ लोटला आहे. पण आजही या ‘वायरल’ प्रकाराने आपलं मनोरंजन केलं नाही असा दिवस जात नाही. अर्थात येथे केवळ कलेच्या अनुषंगाने वायरल होणाऱ्या व्हिडियोजचा विचार केलेला आहे हे सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावं. या वायरल व्हिडियोज मध्ये सगळ्यांत वरच्या क्रमांकावर असतात हे म्युझिक व्हिडियोज !

तसंही संगीत हे आपल्या जीवनात अतिशय महत्वाचं असतंच असतं. आयुष्यातील विविध क्षणांच्या वेळी आपल्याला विविध प्रकारचे संगीत ऐकायला आवडतं आणि प्रत्येक वेळी हे संगीत आपल्या मनाला समाधानच देतं. मनात ज्या ज्या भावनांचा पूर आलेला असतो त्याला दिशा देण्याचे काम हे संगीत करतं. अर्थात अस असलं तरी सहसा आपला कल हा मन अगदी प्रसन्न करणारं, उत्साहाने भरलेलं संगीत ऐकण्याकडे असतं. अनेक कलाकार ही अशा प्रकारचं उत्साही संगीत बनवत असतातच. नजीकच्या काळातलं, यातील जबरदस्त उदाहरण म्हणजे ‘बुलेटू बंदी’ हे गाणं होय. मोहना भोगराजू यांनी हे गाणं आपल्या गोड आवाजात गायलं आहे आणि यातील म्युझिक व्हिडियोत त्या आपल्याला अभिनय करताना ही दिसून येतात. तसेच एस.के बाजी यांचे संगीत आणि लक्ष्मण यांचे शब्द यांमुळे हे गाणं विशेष लक्षात राहतं.

असं हे गाणं गेल्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालं आणि गेल्या अकरा महिन्यात तब्बल २३ कोटी लोकांनी या गाण्याचा म्युझिक व्हिडियो मार्फत आस्वाद घेतला आहे. तसेच सोळा लाखांहून अधिकांनी या म्युझिक व्हिडियोला लाईक केलं आहे. यावरून या गाण्याची लोकप्रियता लक्षात येते. अर्थात लोकप्रियतेचे अन्य ही मापदंड असतातच. सोशल मीडियावर एवढी लोकप्रियता मिळवलेल्या संगीताचा वापर रोजच्या जीवनातील प्रसंगात होत असेल तरीही त्या गाण्याला लोकप्रियता मिळाली अस आपण नक्कीच म्हणू शकतो. या गाण्याच्या बाबतीत हे नक्कीच म्हणता येतं. आता अजून एका व्हिडियोच उदाहरण घेऊयात. हा एका लहान मुलीच्या डान्सचा व्हिडियो आहे. ही लहान पोर, एका लग्न समारंभाला हजर असते. तिथे तिच्या आवडीचं असं हे गाणं लागलेलं असतं. त्यामुळे तिचा उत्साह ओसंडून वाहत असतो. त्यात वधू वराचं आगमन होतं. मग घरातील एक हौशी व्यक्ती या मुलीला त्या नवीन जोडी समोर उभी करतात आणि डान्स करायला सांगतात. आधीच आवडीचं गाणं लागल्याने उत्साहात झालेली ती मुलगी ही मग डान्स करायला लागते. बरं त्यात कौतुकाचा भाग असा की या मुलीच्या डान्स स्टेप्स अगदी उत्तम असतात. लहान असूनही तिच्यातील डान्सची ही कला सहज ओळखू येते. तसेच गाण्यातील बिट्स पकडून नाचणं हे सुदधा तिला जमतं अस दिसून येतं. त्यामुळे तिचा डान्स हा उपस्थित सगळ्यांना आवडून जातो हे नक्की.

अगदी आपल्याला ही आवडून जातो हे काही वेगळं सांगायला नको. या लोकप्रियते मुळेच मग तिचा हा डान्स व्हिडियो लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळवताना दिसून येतो. आमच्या टीमने ही हा व्हिडियो पाहिला तेव्हा आम्हाला ही अगदी पहिल्याच फटक्यात आवडून गेला. या लहान मुलीचं कौतुक वाटलं. त्यात बुलेटू बंदी हे आमचं ही आवडीचं गाणं आहेच. म्हंटलं मग या दोहोंविषयी लेख लिहायला हवं. बरं, बुलेटू बंदी विषयी आपल्याला कल्पना असेलच. पण या व्हिडियो विषयी ही आपल्याला माहिती व्हावी हा सुद्धा एक उद्देश होता. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे. पण केवळ लेख लिहून आपलं मनोरंजन कसं होईल म्हणून आमच्या टीमने हा व्हिडियो ही या लेखानंतर शेअर केला आहे. तेव्हा आपणही या मुलीचा हा सुंदर डान्स परफॉर्मन्स स्वतः बघा आणि आनंद घ्या.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.