Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चिमुकलीने ‘नाच रे मोरा’ गाण्यावर केलेला डान्स पाहून तुमचादेखील दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

ह्या चिमुकलीने ‘नाच रे मोरा’ गाण्यावर केलेला डान्स पाहून तुमचादेखील दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

सध्या आपल्या आजूबाजूचं वातावरण अस काही झालंय की त्याला काय म्हणावं हे कळत नाही. कधी अतिशय थंडी वाटते तर कधी गरम होतं. बरं तिथपर्यंत ठीक आहे. पण थंडीत पाऊस ? वातावरणाचा मूड स्विंग असा काही होतो आहे की काही विचारू नका. त्यात आमच्या एका मित्राला भलताच प्रश्न पडला. म्हणे, थंडीत पाऊस पडलाय तर मोर चुकून पहिला पाऊस समजून नाचला असेल काय?

आता काय बोलणार. प्रत्येक ग्रुप मध्ये एखादा नग असतोच. तो ही तसाच आहे. पण जाऊ दे आपला यार आहे. बरं त्याच्यामुळे फायदा ही झाला. काय झालं की मोराचा विषय निघाला आणि मागील वर्षी प्रसिद्ध झालेला एक व्हिडियो आठवला. त्यावेळी त्या व्हिडियोने धुमाकूळ घातला होता. यात एक तरुण नाच रे मोरा या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसला होता. आपल्या टीमला आणि अनेकांना तो व्हिडियो आवडला होताच. पुन्हा तो व्हिडियो बघण्यात आला आणि आम्ही खूप हसलो. आता हा व्हिडियो बघण्याचा एक परिणाम असा झाला की अजून एक जुना व्हिडियो आमच्या नजरेस पडला. तो व्हिडियो ही बघितला आणि प्रेमातच पडलो. याला कारणीभूत ठरली एक छोटुशी परी !

होय, हा व्हिडियो आहे एका छोट्या मुलीचा. छोटी म्हणजे किती छोटी तर अजून बोलायला शिकली नाही एवढी छोटू. अर्थात तो आहे पाच वर्षांपूर्वीचा व्हिडियो. त्यामुळे आता मोठी झाली असेल. पण लहान असताना तिने जो काही गोड डान्स केलाय ना, त्यामुळे मजा येते. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं छानच आहे. पण आधीच्या व्हिडियो आणि या व्हिडियोत काय साम्य आहे? साम्य आहे ते म्हणजे या दोघांमध्ये असलेलं गाणं समान आहे. होय आपल्याला या व्हिडियोत ही ‘नाच रे मोरा’ हेच गाणं ऐकायला मिळतं. फरक एवढाच आहे की आधी उल्लेख केलेल्या व्हिडियोत त्याचं डीजे व्हर्जन ऐकायला मिळतं. तर इथे मूळ गाणं ऐकता येतं. अर्थात केवळ गाणंच नाही तर या चिमुकलीचा डान्स ही आपल्याला आवडून जातो. किंबहुना लक्षात राहतो. याचं एक मोठं कारण म्हणजे तिच्या मनाप्रमाणे आणि एकट्याने ती डान्स करते. त्यामुळे तिचं हात उंचावून नाचणं, तो ताल धरणं हे सगळं नैसर्गिक वाटतं. तसेच नकळतपणे होणारे तिचे बालसुलभ हावभाव त्यात अजून गंमत आणतात. त्यात ‘वीज देते टाळी’ या वाक्यावर या छोट्या मॅडम पडतात त्यावर ‘अरेरे’ ही आपली प्रतिक्रिया असते. पण मॅडम मात्र एकदम रंगलेल्या असतात. फक्त एकदा येऊन चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला छोटीशी हुल देऊन जातात. पण नंतर मात्र पुन्हा एकदा डान्समध्ये मग्न होऊन जातात. त्यात जेव्हा डान्स संपतो तेव्हा तर अशा काही भुर्रर्रकरून निघून जातात की काही विचारू नका. रम्य ते बालपण याचा पुनःप्रत्यय येतो.

त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की या व्हिडियोत आपल्याला बालसुलभ वागणं, मस्त निरागस डान्स बघणं आणि सोबतीला एक सुंदर गाणं ऐकायला मिळणं याचा आनंद घेता येतो. आपण जर हा व्हिडियो बघितला असेल तर यांचा आनंद आपण घेतला असेलच. पण आपण जर हा व्हिडियो बघितलेला नसेल तर जरूर बघा. कारण हल्ली निरागस आणि नैसर्गिक वाटणारं मनोरंजन पाठी पडतंय की काय अस वाटतं. त्यामुळे या व्हिडियोचा आनंद जरूर घ्या.

असो. बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *