Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चिमुकलीने लग्नामध्ये आईसोबत ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या चिमुकलीने लग्नामध्ये आईसोबत ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आपण प्रत्येक जण काही ना काही काम करत असतो. प्रत्येकजण उद्योग, व्यवसाय, नोकरी यांत गुंतलेले असतात. या कामात आपल्याला काही वेळेस नवीन असं काही तरी बघायला मिळतं आपलं मन उल्हसित होतं. भलेही तो आपल्या कामाचा भाग असला तरीही त्यातील नावीन्य आपल्याला नवीन ऊर्जा आणि उत्साह देऊन जातो. आज आपल्या टीमच्या बाबतीत असंच काहीसं घडलं.

आपल्या टीमने वायरल व्हिडियोज वर विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे हे आपण जाणताच. त्यातही आपला वाचक म्हणून आणि आमच्या टीमचा एक लाडका विषय म्हणजे लग्नाचे वायरल व्हिडियोज. लग्न समारंभ सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे त्यावरील व्हिडियोज सुदधा आपसूक गंमत आणतात. काही व्हिडियोज तर आपल्याला एवढे भावून जातात की विचारू नका. आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो याच पठडीतला आहे. तो काहीसा नवीन ही आहे आणि मनाला भावणारा ही आहे. आता लग्न म्हंटलं म्हणजे डान्स फ्लोअर आणि त्यावर डान्स करणं आलंच. पण बहुतांश वेळेस आपण नवरा नवरी किंवा जास्तीत जास्त त्यांचे मित्र डान्स करताना बघतो. काही वेळेस त्यांना नातेवाईकांची ही साथ लाभते. पण केवळ नातेवाईक एखाद्या लग्नात डान्स करताहेत असा व्हिडियो कमीच बघायला मिळतो.

आजचा हा व्हिडियो तसाच आहे. तो लग्नातील व्हिडियो असला तरी एका कुटुंबाच्या डान्सने सजला आहे. त्यात आपल्याला नवरा नवरी दिसून येत नाहीत. पण त्यांची कमतरता हे कुटुंब भासू देत नाही. सुरुवात होते तेव्हा या कुटुंबातील नन्ही परी डान्स करण्यास सुरुवात करते. लंडन ठुमकदा हे आपल्या सगळ्यांचं आवडतं गाणं आहेच. त्यावर गोड मुलगी नाचू लागते. तिची या डान्सची तयारीही उत्तम असते, म्हंटल्यावर तिचा डान्स आपल्याला आवडून जातोच. तसाच तो उपस्थितांना ही आवडून जातो. मग येतात या मुलीच्या मातोश्री. या ताईंची ही डान्स करण्याची तयारी अगदी परिपूर्ण असते. त्यामुळे मग माय लेकीची ही जोडी पूर्ण डान्स फ्लोअर वर स्वतःच्या डान्स परफॉर्मन्सने उत्साहाचं वातावरण निर्माण करतात. त्यात या ताईंचे अहो आणि मुलीचे वडील ही मधेमधे येऊन जाऊन असतातच. पण शेवटी मात्र त्यांचा पूर्ण परफॉर्मन्स बघायला मिळतो. ते ही आपल्या डान्स स्टेप्स मस्त करतात. त्यामुळे या दोघींच्या डान्सने तयार झालेला उत्साह टिकून राहतो.

खरं तर व्हिडियो जेवढा जास्त वेळेचा तेवढा जास्त कंटाळा येण्याची शक्यता असते. पण हे कुटुंब रंगलय नृत्यात अशी अवस्था असल्याने आपल्याला कंटाळा येत नाही. किंबहुना या कुटुंबाचं कौतुक वाटत राहतं. एखाद्या लग्नात एखाद्या संपूर्ण कुटुंबाने डान्स करणं काही नवीन नाही, पण ते प्रत्येक वेळीही होत नाही. त्यामुळे हा व्हिडियो इतर वायरल व्हिडियोज मध्ये उठून दिसतो. त्याचं हे वेगळेपण आपल्या वाचकांपर्यंत ही पोहोचावं ही आमची इच्छा होती. त्यातूनच हा लेख लिहिला गेला आहे.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.