Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चिमुकलीने स्टेजवर नाचत असलेल्या तरुणीची केली सुंदर नक्कल, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या चिमुकलीने स्टेजवर नाचत असलेल्या तरुणीची केली सुंदर नक्कल, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

लहान मुलांच्या स्वभावाचं वर्णन करायचं झालं तर अनेक विशेषणं वापरता येतील. कारण त्यांच्या या लहान वयात त्यांचे अनेक पैलू आपल्या समोर सतत येत असतात. पण या सगळ्या पैलूं मधील एक महत्वाचा पैलू म्हणजे अनुकरणीय स्वभाव होय. अनुकरणातून मुलं सतत शिकत असतात हे आपण जाणतो. त्यामुळे ती कशाचं अनुकरण करतात आणि कितपत करतात याकडे आपलं लक्ष सदैव असणं आवश्यक असतं. कारण यातूनच त्यांची अन्य स्वभाव वैशिष्ट्य घडत असतात.

उदाहरणार्थ आपलं बोलणं, वागणं या गोष्टिंचा तर लहान मुलांवर विशेष प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपण वारंवार उच्चारणारे शब्द असोत वा आपली देहबोली असो, लहान मुलांकडून तिचं अनुकरण केलं जातं. त्यामुळे अचानकपणे आपल्या आजूबाजूला असणारं एखादं लहान मुलं काही तरी बोलून वा वागून जातं की आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. काही वेळा हा आश्चर्याचा धक्का आपल्या सवयी सुधारून जातो. तर काही वेळेस आपण जे करतो आहोत, वागतो आहोत त्याचा योग्य परिणाम मुलांवर होतोय याची पोचपावती देऊन जातो. बरं केवळ वागणं बोलणं इथपर्यंत हे मर्यादित नाहीये. तर या संस्कारक्षम वयात आपल्या आवडीनिवडी या सुद्धा मुलांच्या मनावर परिणाम करत असतात. शेवटी मुलंच ती. अनुकरण करतातच.

त्यामुळे अनेक वेळेस वय लहान असूनही काही विषयांत आणि खासकरून कलाप्रकारात आपल्या प्रमाणेच त्यांना असलेली रुची ही अव्हेरता येत नाही. काही वेळेस त्यांच्या स्वतःत सुद्धा काही कला व गुण उपजत असतात. जे वेळोवेळी आपल्याला दिसून येत असतात. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो होय. हा व्हिडियो तसा काहीसा जुना आहे. तसेच वायरल ही झालेला आहे. त्यामुळे आपण हा व्हिडियो पाहिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अस असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की की यातील जो कंटेंट आहे तो आजही भुरळ पाडून जातो. त्यामुळेच आमच्या टीमने हा व्हिडियो आज पुन्हा एकदा पाहिला. पण मन राहवेना. म्हंटलं याविषयी आपल्या वाचकांना कळायला हवं. हा व्हिडियो आहे एका चिमुरडीचा. होय, हा व्हिडियो चित्रित होताना चिमुरडी म्हणावी असंच तिचं वय असतं. गुलाबी रंगाचे मस्त कपडे घातलेली आणि डोक्यावर दोन बो बांधलेली ही छोटी परी अगदी गोड दिसत असते. पण तिचं केवळ दिसणं यातून ती लक्षात राहत नाही. ती लक्षात राहते तिच्या नृत्य विषयक आवडीमुळे. आता चिमुकली म्हणजे कितीसं वय असणार असून असून. पण तिची नृत्याप्रति असलेली आवड पाहिली की अचंबित व्हायला होतं.

तिची ही आवड एका नृत्य कार्यक्रमात दिसून येते. समोर रंगमंचावर शास्त्रीय नृत्य सादर होत असत. अर्थात गाणं ही ऐकू येत असतंच. त्याचवेळी समोर ही आपली चिमुरडी मैत्रीण नृत्य करत असते. तिचे हावभाव, तिची देहबोली यातून तिला या नृत्याची गोडी उपजत असावी किंवा तयार झाली असावी हे कळून येतं. कारण काहीही असलं तरी या शास्त्रीय नृत्यविषयक तिचं प्रेम मनात भिनलेलं असतं हे मात्र नक्की. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही याची जाणीव झाली असेलच. पण आपण हा व्हिडियो नसेल बघितला तर जरूर बघा. आपल्याला या मुलीत असलेली नृत्याची आवड जाणवून येईल. या व्हिडियोतील आमच्या टीमला एक क्षण फार आवडला. यात काही क्षण हा कॅमेरा एकदा या चिमुरडीकडुन मंचावर असणाऱ्या नृत्यांगनेकडे आणि मग पुन्हा चिमुरडीकडे फिरतो. हा क्षण आम्हाला भारी वाटून गेला. जणू काही या चिमुरडीचं भविष्यातलं प्रतिबिंब हा कॅमेरा दाखवत असतो. असो. आमच्या टीमला हा क्षण आणि हा व्हिडियो दोन्ही आवडले. आपल्या वाचकांना याविषयी माहीती मिळावी या हेतूने हा लेख लिहिला गेला आहे हे आपण जाणता आहात.

आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *