Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चिमुकल्या मराठमोळ्या मुलीने बोबड्या बोलांनी गायलेलं हे गोड गाणं ऐकून तुम्हीदेखील तिच्या प्रेमात पडाल

ह्या चिमुकल्या मराठमोळ्या मुलीने बोबड्या बोलांनी गायलेलं हे गोड गाणं ऐकून तुम्हीदेखील तिच्या प्रेमात पडाल

लहान मुलं घरात असली की त्यांच्या निरागस प्रश्नांनी, लडिवाळ खेळाने, बोबड्या बोलांनी वातावरण भारून राहिलेलं असतं. म्हणूनच त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. आपल्यातलं मोठेपण विसरून लहान व्हावंसं वाटतं. अगदी अकबर बिरबलाच्या गोष्टीत बादशाहला सुद्धा लहान मुलांच्या लडिवाळपणाने भुरळ घातली होतीच. असो. आज एवढं सगळं आठवण्याचं कारण आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो.

हा व्हिडियो आहे एका चिमुकलीचा. या चिमुकल्या मुलीचं नाव आहे स्वरदा. नाव जितकं गोड, तितकाच तिचा गळा सुद्धा गोड आहे. आहे खरं तर इवलीशी पोर, पण जेव्हा गायला लागते तेव्हा ऐकत राहावंसं वाटतं. अशा या स्वरादाच्या गाण्याचे व्हिडियोज आपल्याला ‘प्रमोद’ नाव असलेल्या युट्युब चॅनेल वरून पाहायला मिळतात. तिच्या स्वरांनी मुग्ध व्हायला होतं. यातही तिचा एक व्हिडियो तर खूपच प्रसिद्ध पावला आहे.

हाच व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला. या व्हिडियोत आपल्याला स्वरदा छान नटून थटून उभी असलेली दिसते. गळ्यांत मोत्यांची माळ असते. एकदम गोंडस रूपडं दिसत असतं. अशी ही गोड पोर गायला सुरुवात करते ते – जैत रे जैत चित्रपटातलं गाणं. ‘लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला’ हे या गाण्याचे बोल. रवींद्र साठे यांच्या दमदार आवाजाने हे गाणं अजरामर झालेलं आहे. स्वरदा खूप छान पद्धतीने हे गाणं म्हणत असते. गाणं सादर करत असताना तिचे हावभाव, देहबोली यातून कळून येतं की या छोट्या बाईसाहेब त्या गाण्याशी अगदी एकरूप झाल्या आहेत. लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला म्हणताना हात उंचावणे, तसेच ठाकर गडी तिथे कधी नाही गेला म्हणताना हाताने नाही म्हणणे या त्यातल्या काही लकबी. तसेच हाती घेई दोर, ठाकराचा पोर म्हणून झाल्यानंतर ती थांबते, तेव्हा कॅमेऱ्यामागून तिला साथ दिली जाते, यावरून तिने या गाण्याची तालीम केली असल्याचं कळून येतं. खरं तर पोर आहे एवढीशी पण मन जिंकून जाते.

तिचे बाकीचे व्हिडियोज सुदधा अप्रतिम आहेतच. प्रत्येक व्हिडियोत ती वेगवेगळ्या गाण्यांच्या समवेत आपल्याला भेटते. प्रत्येक सादरीकरणात छान पैकी नटलेली ही स्वरदा प्रत्येक गाण्यालाही आपल्या निरागस स्वरांनी नटवत आली आहे. आपल्या टीमला तर ही चिमुकली आणि तिचं गाणं खूप आवडलं. आपणही हा व्हिडियो अनुभवला असेल तर तो आपल्यालाही पसंतीस उतरला असेल हे नक्की.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार यात शंका नाही. आपण नेहमीच आपल्या टीमला नवनवीन विषयांवर लेख लिहिण्यास प्रोत्साहन देत असता. कधी सकारात्मक कमेंट्स मधून, तर कधी सुचनांमधून. एकूण काय, तर आपण वाचक म्हणून आपण नेहमीच आपल्या टीमच्या पाठिशी उभे असता. येत्या काळातही हा पाठिंबा कायम राहील हे नक्की. आपला लोभ, आपल्या टीमवर कायम असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *