डान्स वायरल व्हिडियोज वरील लेख म्हणजे मराठी गप्पाच्या वाचकांचे आवडते लेख. या लेखांना मिळणारा प्रतिसाद इतका उत्तम आहे कि तुमच्यासाठी विविध व्हिडियोज बघणं आणि त्यावर लेख लिहिणं हे मराठी गप्पाच्या टीमसाठी नित्याचं झालेलं आहे. आम्हालाही डान्स बघण्याची आवड असल्याने आम्हीही त्यातून आनंद घेत असतो. आमचा हा आनंद आज द्विगुणित झाला. कारणीभूत होती ती एक छोटी चिमुकली आणि तिने सादर केलेला डान्स. काय नाचली हो छोटी पोर. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तिचं.
हा व्हिडियो आहे सप्तरंग सांस्कृतीक महोत्सव २०१८ या समारंभातील. सप्तरंग ट्र’स्ट च्या वतीने हा वार्षिक सोहळा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जातो. २०१८ साली हा सोहळा नांदेड येथे २-५ जून दरम्यान आयोजित करण्यात आला होता. त्या सोहळ्यात भरवण्यात आलेल्या स्पर्धेत या चिमुकलीने आपल्या नृत्याने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं होतं. सांगतो ऐका या चित्रपटातील लावणी या चि’मुरडीने सादर केली होती.
लावणी सुरू होते तेव्हा ही चिमुकली पाठमोरी उभी असते. जशी लावणी सुरू होते तशी एक एक स्टेप्स चपळाईने करत ती प्रेक्षकांसमोर येते. एक एक स्टेप्स करताना तिची चपळाई जशी लक्षात राहते तसेच चेहऱ्यावरील भाव सुद्धा. तिच्यातील चुणचुणीतपणा समजून येतो. कारण लहान वयामुळे एकसारखे भाव चेहऱ्यावर दिसू शकतात. पण या छोट्या परीच्या बाबतीत तसं दिसत नाही.तसेच ती या डान्स मध्ये पूर्णतः गुंगून गेलेली असते. इतकी गुंगून गेलेली असते की आंबड्यातला गजरा खाली पडतो ते ही तिच्या लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येतं, तेव्हाही तिचं लक्ष विचलित होत नाही. हे सगळ्यांत महत्वाचं. कारण लक्ष विचलित झालं तर पुढच्या स्टेप्सही चुकणार आणि परफॉर्मन्स ही खराब ना. पण ही बाय काय कसल्या अडथळ्यांना मानत नाही. तिला शिकवलेली प्रत्येक स्टेप अगदी उत्तमरीतीने करूनच ती थांबते. यात कौतुक करावंसं वाटतं ते तिच्या कोरिओग्राफरचं. कारण तिची डान्सची आवड बघता कोरिओग्राफी केलेली आहे. सगळ्या रंगमंचाचा उपयोग उत्तम रीतीने केलेला दिसून येतो.
आता या चिमुकलीचा डान्स एवढा आवडला आमच्या टीमला मग तिच्याविषयी थोडं जाणून घेण्याचा ही प्रयत्न केला. तेव्हा कळलं की तिचं नाव अक्षरा दोडे असं आहे. बरं केवळ नृत्यात ती निपुण आहेच सोबत अभिनयातही ती तेवढीच अग्रेसर आहे. तेही अगदीच लहान असल्यापासून. तिचे हे धमाल व्हिडियोज आपल्याला तिच्या यु’ट्युब चॅनेल वर दिसून येतात. तिच्या चुणचुणीतपणा मुळे तिचे डान्स आणि अभिनयाचे व्हिडियोज हे प्रेक्षक पसंतीस उतरलेले दिसून येतात. काही व्हिडियोज ना तर लाखो करोडो व्ह्यू’ज मिळाले आहेत. एका अर्थाने या चिमुकलीच्या कलागुणांना प्रेक्षकांनी दिलेली दादच. येत्या काळातही ही चिमुकली अक्षरा आपल्या परफॉर्मन्सनी धमाल उडवून देईल आणि लोकप्रियता मिळवत राहील हे नक्की. मराठी गप्पाच्या टिमकडून अक्षराला तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्याला हा लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. तसेच आमच्या टीमने लिहिलेले डान्स आणि अन्यही विषयांचे लेख आवर्जून वाचा. तसेच शेअर ही करा. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!!
बघा व्हिडीओ :