Breaking News
Home / मनोरंजन / ह्या चिमुकल्याचे वडिलांसोबतचे क्युट भांडण पाहून तुम्हीदेखील हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या चिमुकल्याचे वडिलांसोबतचे क्युट भांडण पाहून तुम्हीदेखील हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

लहान मुलांचे खट्याळ व्हिडियोज बघणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं. त्यातून त्यांचा निरागस खोडकरपणा, त्यांचं चुटुचुटु बोलणं, अनपेक्षित प्रश्न विचारणं हे सगळं पुन्हा पुन्हा अनुभवावस वाटतं. पण कधी कधी असंही होतं, की लहान मुलांचे आईवडील सुद्धा खट्याळ असतात. लहान मुलांकडून येणाऱ्या गोड प्रतिक्रिया अनुभवण्यासाठी मग खोटं खोटं रागे भरणं, काही गोष्टी चट्कन न देणं हे ते करत असतात. असाच एक गंमतीदार व्हिडियो आज आपल्या टीमने पाहिला आहे. म्हंटलं हा व्हिडियोविषयी आपण लिहिलंच पाहिजे. आपल्या वाचकांना आवडेल. चला मग सुरुवात करूया.

हा व्हिडियो आहे एका खट्याळ वडिलांचा आणि त्यांच्या बाळाचा. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला समोर कांदे बटाट्यांनी भरलेली टोपली असते. सोबत काही भाजीही असते आणि या सगळ्यांच्या बाजूला या बाळाचे वडील बसलेले असतात. त्या बाळाला नेमकं काही तरी हवं असतं पण वडील मात्र त्याला नकार देतात. त्यांना त्यांच्या या छोट्या बाळाची कल्पना असणार. नाही हे उत्तर ऐकून हे बाळ कशी प्रतिक्रिया देतं याची कल्पना असणार. कारण हसत हसत ते त्या बाळाला नकार देतात.

त्यांना माहिती असतं की यापुढे बाळाची मजा येणार आहे. तसच होतं. बाळ आपल्या वडिलांकडे ती वस्तू मागू लागतं. त्याच्या बोबड्या बोलांनी घर भरून जातं. पहिल्यांदा नकार येतो तेव्हा जवळच असलेल्या वॉशिंग मशीनच्या स्टिकरशी खेळत राहतं ते बाळ. मग रडवेला चेहरा करून पुन्हा त्याच गोष्टीची मागणी होते. वडील मात्र नकार देतात. वर, त्याला रडू नकोस असंही सांगतात. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून खरं तर त्यांनाही हसू आवरत नसतं. आपलीही परिस्थिती वेगळी नसते. त्या बाळाच्या देहबोलीमुळे अजून हसायला येतं. खासकरून जेव्हा तो ‘नाही मिळणार’ असे हातवारे करतो तेव्हा गोड वाटतो. पण एव्हाना त्याचाही संयम काहीसा संपलेला दिसून येतो. त्यामुळे मग मागे मागे जात तो निघून जायला निघतो. पण बोबडे बोल चालूच असतात. त्यामुळे हास्याचे फवारे फुटत असतात. शेवटी त्याचे वडील त्याला हवी असलेली गोष्ट द्यायला तयार होतात. पण तरीही त्याचं बोलणं सुरू असतं. आपण त्याचं अवसान बघून हसत असतो. यथावकाश मग तो वडिलांकडे जात असतो आणि व्हिडियो संपतो.

व्हिडियो दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेचा आहे. पण त्यात जे निरागस मनोरंजन आहे ना ते कुठेही शोधून सापडणार नाही. कारण आपल्याच मुलाची हलकीशी मस्करी करताना होणाऱ्या गंमती जंमती फार बघायला मिळतातच असं नाही. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपणही हा व्हिडियो आवर्जून बघा आणि त्याचा आनंद घ्या. तत्पूर्वी आपण या लेखाचा सुद्धा आनंद घेतला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सकारात्मक सूचना नेहमीप्रमाणे कमेंट्स सेक्शनमध्ये करायला विसरू नका. लेख तर मोठ्या प्रमाणावर आपण शेअर करत असताच. आपल्या प्रतिक्रिया, शेअर यांच्यामुळे आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्याची स्फूर्ती मिळते. योग्य सूचनांचा अवलंब करत उत्तमोत्तम लेख लिहिता येतात. आपल्यामुळे हे होतं, त्याबद्दल आपले आभार. यापुढेही आपला हा स्नेह वाढीस लागू द्या. लोभ कायम ठेवा बरं का ! आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *