Breaking News
Home / मनोरंजन / ह्या छोट्याश्या मुलीने जो डान्स केला आहे तो पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या छोट्याश्या मुलीने जो डान्स केला आहे तो पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही, बघा व्हिडीओ

कलाकार मग तो किंवा ती कोणत्याही वयाचे का असेना, जेव्हा जेव्हा आपली कला सादर करतात तेव्हा त्यात आपला जीव ओतून ती सादर करीत असतात. किंबहुना तसा त्यांचा प्रयत्न असतो. काही वेळा हा प्रयत्न यशस्वी होतो तर काही वेळा अयशस्वी होतो. पण अस असलं तरी त्या कलाकाराच्या सादारीकरणाचं कौतुकच वाटतं. त्यात हे सादरीकरण यशस्वी झालं तर अजून लोकप्रिय ठरतं. त्यातही कलाकार जर लहान वयाचे असतील तर मग अजूनच छान ! कारण अगदी लहान वयातही एखाद्या अनुभवी कलाकारासारखं सादरीकरण म्हणजे उत्तम यशचं म्हणायला हवं.

त्यात हल्लीची लहान मुलं म्हणजे जबरदस्त आकलनशक्ती असलेली पिढी आहे. तसेच त्यांच्यात असलेला आत्मविश्वास एखाद्या मोठ्या व्यक्तीला ही कोड्यात पाडू शकतो की बाबा, हा एवढा आत्मविश्वास येतो कुठून. अर्थात त्याच उत्तर मिळो न मिळो, या कलंदर चिमुकल्यांचं कौतुक सदैव वाटत राहतं. अशाच एका कलंदर मुलीच एक उत्तम सादरीकरण बघण्याचा योग आला. हे सादरीकरण आपल्या टीमने आणि बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर बघितलं असणार आहे. पण नसेल बघितलं तरी हरकत नाही. इथे त्याविषयी जुजबी माहिती मिळेलच.

या व्हिडियोत दिसणारी मुलगी म्हणजे एक उत्तम नृत्यांगना आहे याचा प्रत्यय या व्हिडियोतुन येतो. ती भारतीय शास्त्रीय नृत्यांचा अभ्यास करणारी कलाकार आहे हे पहिल्याच काही क्षणांत कळून येतं आणि पुढील काही क्षणांत त्यावर शिक्कामोर्तब ही होतं. कारण शास्त्रीय नृत्य शिकणं ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नाही. त्यासाठी शिस्त, सातत्य आणि कलेप्रति समर्पित वृत्ती असावी लागते. तसेच या काळात शिकलेल्या विविध पैलूंचा अभ्यास सातत्याने करूनच मग नृत्य विशारद होता येतं. ही मुलगी काही नृत्य विशारद नाही हे काही वेगळं सांगायला नको. पण तिचं नृत्य बघून, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे मात्र खरं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्या कानावर एक परिचीत संगीत पडतं. कदाचित शिव स्तोत्रम असावं असं पहिल्यांदा वाटून जातं. मग काही क्षणातच लक्षात येतं, की हे तर बाहुबली चित्रपटातील सुप्रसिद्ध, ‘कौन हैं वोह कौन हैं वोह’ हे गाणं आहे. या गाण्यातच प्रभास यांनी साकारलेल्या बाहुबलीने भलीमोठी शिवपिंडी उचलण्याचा सिन आहे. अर्थात यासाठी हे गाणं ओळखणं हे जसे मदतशीर ठरतं. तसेच या मुलीचं नृत्य हे महत्त्वाचं कारण ठरतं. कारण गाण्यातील शब्दांना अनुसरून अशा तिच्या भावमुद्रा असतात. तसेच देहबोली ही अगदी या संगीतास चपखल म्हणावी अशीच असते.

बरं, प्रत्येक शब्दाचा विचार करून हे नृत्य आकारास येत असल्याने या मुलीमधील कलागुणांना वाव मिळतो असं म्हणायला हरकत नाही. अर्थात तिच्या मेहनतीचं श्रेय तिला द्यायलाच हवं. या तिच्या परफॉर्मन्स मधील सगळ्यांत जास्त लक्षात राहिलेली गोष्ट कोणती असेल तर तिचे हावभाव होय. गाण्यातील प्रसंगानुरूप हावभाव बदलणे यांमुळे हा परफॉर्मन्स आपलं खऱ्या अर्थाने मनोरंजन करून जातो. तसेच कोणत्याही नृत्यास आवश्यक असं उत्तम पदलालित्य ही या चिमुकलीकडून बघायला मिळतं. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपण ही या बाबी बघितल्या असतीलच आणि आपल्याला ही या चिमुकलीच कौतुक वाटलं असेल. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर एका सुंदर परफॉर्मन्सला आपण मुकता आहात. तेव्हा हा परफॉर्मन्स जरूर बघा. आपली टीम या लेखाच्या शेवटी सदर व्हिडियो, आपल्या वाचकांसाठी शेअर करेल. त्याचा नक्की आनंद घ्या.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *