Breaking News
Home / मनोरंजन / ह्या छोट्या गायकाचं आणि त्याच्या बँजो कंपनीचं कौतुक झालंच पाहिजे, एकदा नक्की बघा

ह्या छोट्या गायकाचं आणि त्याच्या बँजो कंपनीचं कौतुक झालंच पाहिजे, एकदा नक्की बघा

म्हणता म्हणता मे महिना संपला. पण येतो येतो म्हणत असणारा पावसाळा काही अजून आला नाहीये. अर्थात तो यायचा तेव्हा येईलच. आणि जेव्हा येईल तसा सगळ्यांना आनंदी ही करुन सोडेल. याच काळात सहसा शाळा उघडतात. किंबहुना येत्या काही दिवसांत त्या उघडतील सुद्धा ! मग एवढे दिवस घरी असणारी छोटे मंडळी हळूहळू शाळेतही जायला लागतील.

एकदा का ती शाळेत गेली की मग त्यांची सारखी आठवण ही येत राहते. कारण त्यांनी या सुट्टीत केलेली सगळी दंगा मस्ती आपल्या डोळ्यासमोर येत राहते. नकळतपणे आपणही आपल्या लहानपणीच्या आठवणीत रमतो. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी हे आपल्या बाबतीत कित्येक वर्षांपूर्वीच झालं आहे. पण तरीही बालपणीच्या आठवणी या कधीही अमूल्य असतात. त्या काळात खासकरून मित्रांसोबत केलेली धमाल मस्ती तर कधीही न विसरता येणारी असते. एकदा का मोठे झालो की हे सगळं करता येत नाही. म्हणूनच लहान मुलांना कधी मस्ती करताना बघितले की काही वेळा राग येतो, तर अनेकवेळा हसू येतं. कारण कमी अधिक प्रमाणात आपणही तेच केलेलं असतं. काही गोष्टी तर समान असतात. त्यातील एक म्हणजे आपल्या तीन ते चार खास मित्रांचा ग्रुप होय. या ग्रुपमध्ये आपण केलेली धमाल आपण इतरत्र कुठेही केलेली नसते. त्यातही आपलं बालपण जर गरिबीत गेलं असेल तर विचारू नका.

कारण काही नवीन खरेदी करावं अशी परिस्थिती नसते. मग काय, जे आहे त्यातच काम चालवायचं. किंबहुना डोकं लावायचं. आणि त्यातून मग जी काही मजा यायची ती औरच असे. अर्थात गरिबीचं इथे उदात्तीकरण करण्याचा हेतू नाहीये. पण त्या काळात चालवलेलं डोकेबाज काहीही, आयुष्यभर लक्षात राहणारच असतं. आता हेच बघा ना. आमच्या टीमने एक व्हिडियो बघितला. हा व्हिडियो चार ते पाच वर्षे जुना आहे. पण यातील गंमत मात्र आजही आपल्या चेहऱ्यावर हसू आणते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला चार मित्र एके ठिकाणी उभे असलेले दिसतात. चौघांची आर्थिक परिस्थिती बेतास बात असावी अशीच दिसत असते. पण डोकं मात्र भन्नाट चालत असतं. त्यातील एक छोटा मुलगा असतो. त्याने हातात एक गोष्ट घेतलेली असते. त्या वस्तूचा वापर तो माईक म्हणून करत असतो. तर त्याचे बाकीचे तिन्ही मित्र हातात काहीना काही वस्तू घेऊन उभे असतात. त्यातील दोघांनी हातात काठ्या आणि एकच वस्तूच्या दोन बाजू घेतलेल्या असतात. तर तिसऱ्याने बहुधा काही तरी धातूची वस्तू हातात घेतली असावी. अनन्य सगळ्यांचा हा बँड मिळून एक गाणं सादर करत असतो. हे आपल्या सगळ्यांच्या आवडीचं गाणं आहे. बाकीच्यांच माहीत नाही, पण हे गाणं ऐकलं आणि एखादा माणूस नाचला नाही असं आम्ही तरी बघितलं नाही.

अशा या लोकप्रिय गाण्याचं सादरीकरण आणि ते ही या चार पोरांनी केलेलं असतं. त्यांच्या या डोकेबाजपणाच कौतुक ही वाटतं. तसेच हे ही जाणवतं की इंटरनेट मुळे हा सगळा प्रकार बघता आला. नकळतपणे आपल्याला आपल्या लहानपणी घेऊन गेला. आम्हाला खात्री आहे की आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हे वाटलं असणार. पण आपण हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर बघा. त्यानिमित्ताने ते लोकप्रिय गाणं ही पुन्हा एकदा ऐकता येईल आणि सोबत या पोरांचा मस्त परफॉर्मन्स आहेच.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *