Breaking News
Home / मनोरंजन / ह्या छोट्या पुष्पराज चा व्हिडीओ होतोय वायरल, ‘झुकेगा नाही साला..’ पाहून तुम्हीदेखील अचंबित व्हाल

ह्या छोट्या पुष्पराज चा व्हिडीओ होतोय वायरल, ‘झुकेगा नाही साला..’ पाहून तुम्हीदेखील अचंबित व्हाल

गेल्या काही महिन्यांत एकापेक्षा एक चित्रपटांची मांदियाळी आपण अनुभवली आहे. मग त्यात आपल्या माय मराठीतील सिनेमांपासून ते अगदी पार हॉलिवूड पर्यंतच्या अनेक सिनेमांनी आपलं मनोरंजन केलेलं आहे. बऱ्याच काळाने थिएटर मध्ये सिनेमा बघायला मिळणं ही तशीही आनंदाची बाब होतीच आणि त्यात या सिनेमांच्या कथांनी, त्यातील कलाकारांनी धमाल उडवून दिली. तसेच गाणी आणि नृत्यही गाजली. या सगळ्या आघाडीवर अगदी चर्चिला गेलेला सिनेमा म्हणजे ‘पुष्पा’ हा होय.

लोकप्रिय अभिनेते अल्लू अर्जुन यांच्या कलाकारीने गाजलेला हा चित्रपट आहे. यातील कथा ही प्रेक्षकांना भावली आहेच. सोबतच यातील गाणी आणि डान्स ही प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. इतके की आजही या गाण्यांच्या ओळी आणि धून आपल्या डोक्यात खेळत असतात. पण कथा, गाणी आणि डान्स यांच्यासोबतच अजून एक गोष्ट अशी आहे की जी या सिनेमातून पाहायला मिळते. किंबहुना दाक्षिणात्य चित्रपटांतून ही बाब हमखास पाहायला मिळते. होय, अगदी बरोबर ओळखलंत ! स्टाईल हा दाक्षिणात्य सिनेमांचा एक महत्वाचा भाग असतो हे आपण जाणतोच.

पुष्पा सिनेमा ही त्यास अपवाद नाहीये. बरं फायटिंग, डान्स मध्ये तर स्टाईल असतेच पण सगळ्यांत जास्त लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे डायलॉग्ज ! संवाद अगदी स्टाईलने म्हंटले म्हणजे हमखास लोकप्रियता मिळते. पुष्पा याचं अगदी प्रातिनिधिक उदाहरण आहे. या सिनेमात एक डायलॉग आहे जो आपल्या सगळ्यांना आवडून गेलाय. इतका की त्याच्यावर अनेक व्हिडियोज ही बनले आहेत आणि अगदी मिम्स ही बनले आहेत. होय, आपण बरोबर ओळखलंत, ‘मैं झुकेगा नहीं’ हा तो डायलॉग आहे. त्यातला अल्लू अर्जुन यांची दाढी खालून हात फिरवण्याची स्टाईल तर अफलातून प्रसिद्ध झाली आहे. आपल्या आजूबाजूला आणि अगदी सोशल मीडियावर सुदधा आपण असे अनेक ‘पुष्पा’ बघितले असतीलच. इतकंच काय पण ज्यांना दाढी नाहीये, त्यांनाही या डायलॉगची भुरळ पडली आहे. पण त्यातही एक व्हिडियो हा तुफान वायरल होतोय. हा व्हिडियो आहे एका नवजात मुलाचा ! या व्हिडियोच्या वेळी ही बाळ काही तासांच किंवा काही दिवसांच असावं असं जाणवतं. बरं लहान असलं तरी मुलांची हालचाल ही होतंच असते. तशीच या लहान बाळाने आपल्या एका हाताने हालचाल केलेली दिसते. खासकरून एका मोठ्या व्यक्तीचा हात या लहान बाळाजवळ जाताना दिसतो.

त्यास प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून या बाळाने हात हलवला असावा. पण हीच हालचाल अगदी स्लो मोशन मध्ये बघितली असता, पुष्पा सिनेमातील स्टाईलचा भास होतो. पण लहान मुलांच्या बाबतीत कोणतीही चांगली गोष्ट असो ती वायरल होतेच. कारण आपल्याला त्यांचं कौतुक असतं. त्यात या सिनेमातील स्टाईलशी साधर्म्य असल्याने हा व्हिडियो अजून लोकप्रिय ठरला आहे हे नक्की ! अर्थात कारण काहीही असलं तरी निदान एखादा क्षण तरी या व्हिडियो मुळे आपल्याला आनंद होतो हे नक्की ! तसेच यात आपल्याला हिंदी डबिंग ऐकायला मिळतं. श्रेयस तळपदे यांनी या सिनेमाचं हिंदी डबिंग केलं असून यात ते व्हॉइस ओवरच्या माध्यमातून पुष्पा ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारतात. त्यांनी आपलं काम अगदी चोख केल्याने या डायलॉगचा परिणाम ही जाणवतो. अगदी या लहान बाळाचा व्हिडियो बघताना ही हे जाणवतं. असो. एकूणच काय तर या सिनेमाची जादू अजूनही कायम असल्याचं यावरून दिसून येतंय. तसेच मिम्स असोत वा छोटेखानी व्हिडियोज असोत, यातून हा सिनेमा किती लोकप्रिय झाला आहे याची प्रचिती येते. येत्या काळात या सिनेमाचा दुसरा भाग, (ज्याची एव्हाना घोषणा ही झालेली आहे) ही प्रदर्शित होईल. तेव्हा तर अजून धमाल मस्ती होणार हे निश्चित !

तसेच या पहिल्या भागाने उंचावलेल्या अपेक्षा दुसरा भाग पूर्ण करेल अशी आशा असायला हरकत नाही. तसेच आता वर उल्लेख केलेला डायलॉग हा त्या दुसऱ्या भागात ही ऐकायला मिळाला तर हा आनंद दुप्पट होईल हे नक्की. असो. त्या दुसऱ्या भागावेळी ही जे काही लोकप्रिय होईल त्याविषयी वेळोवेळी आपली टीम लिहितच राहील. तूर्तास इथे थांबतो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *