नुकतीच एक बातमी वाचनात आली होती. ज्या बातमीनुसार, गेल्या दोनेक वर्षांत दाक्षिणात्य सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलेली आहे. त्यांनी एका संस्थेच्या अहवालाचा दाखला देत दाक्षिणात्य आणि त्यातही तेलगू भाषिक सिनेमा किती झपाट्याने प्रेक्षकवर्गाच्या पसंतीस उतरतो आहे हे दाखवलं होतं. याचं अगदीच ताज आणि प्रातिनिधिक उदाहरण घ्यायचं झालं तर ‘पुष्पा : द राईज’ या सिनेमाचं घ्यावं लागेल. अल्लू अर्जुन या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्याच्या या सिनेमाने सगळीकडे धमाल उडवून दिली आहे.
अगदी बॉक्स ऑफिसचा विचार करता या सिनेमाने कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली आहेच. पण त्यापेक्षाही हा सिनेमा त्यातील स्टायलिश डायलॉग्ज, ओठांवर रुळतील अशी गाणी आणि सगळ्यांत वरचढ ठरतील अशा अक्कडबाज डान्स स्टेप्स यांमुळे लक्षात राहिला आहे. एवढंच काय पण टीव्ही वरील शोज असू द्या, वा सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर असू द्या, प्रत्येकाने या सिनेमाची आणि वर उल्लेख केलेल्या गोष्टींची दखल घेतली आहे. मग ते पुष्पाचं दाढीवरून हात फिरवण असू द्या, वा ‘फ्लॉवर नहीं फायर हैं मैं’ हा डायलॉग असू द्या. प्रत्येकाने याची दखल घेतली आहे.
अगदी ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद फलंदाज ‘डेव्हिड वॉर्नर’ यानेही त्याच्या छोट्या मुलीसोबत एक छोटा गंमतीदार व्हिडियो बनवला आहे. त्या व्हिडियोला इंस्टावर कित्येक लाखांच्या घरात व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. यावरून या सिनेमाच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. पण ही बहुतांश उदाहरणं ही सेलिब्रिटीज किंवा मनोरंजन जगताशी निगडित आहेत. पण हा सिनेमा त्यापलीकडे गेला आहे. अगदी सामन्यातील सामान्य माणूस सुद्धा या सिनेमाच्या प्रेमात आहे. एवढंच काय तर या सिनेमातील गाणी आणि डान्सने बच्चे कंपनीला ही वेड लावलं आहे. बरं यात अगदी डायपर घालणाऱ्या छोट्या बाळांपासून ते मोठ्या मुलांचा ही समावेश आहे. काय म्हणता ? बाळं कशी यात समाविष्ट असतील. अहो आहेत. आमच्या टीमने हा व्हिडियो बघण्याच्या अगोदर आम्हाला ही वाटलं असतं की लहान बाळं कसं काय नाचेल. पण आज पाहिलेल्या एका व्हिडियोने ती शंका ही घालवून टाकली. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एका घराचा हॉल दिसत असतो. समोर टीव्हीवर पुष्पा सिनेमातील ‘श्रीवल्ली’ हे गाणं लागलेलं असतं.
युट्युबवर या गाण्याला केवळ एका महिन्यात १८ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून या गाण्याची लोकप्रियता लक्षात यावी. असो. तर हे गाणं चालू असतं आणि खाली उभं असलेलं बाळ हळूहळू सरकू लागतं. त्यात पुष्पा व्यक्तिरेखेची नक्कल केल्यासारखं हे बाळ फिरत राहतं. मग एके ठिकाणी हे बाळ धडपडत. पण तरीही डान्स चालू राहतो. ते ही अगदी हातवाऱ्यांसकट हा डान्स चालू असतो ! आपल्याला या बाळाचं कौतुक वाटतं. ते त्याच्या घरच्यांनाही वाटत असावं. कारण मधेच एक हसल्या सारखा आवाज ही येतो. असो. लहान मुलं आणि त्यांचे वायरल व्हिडियोज म्हणजे आपल्या टीमचा आवडता विषय आहे. त्यामुळे याविषयी लिहायला लागलो तर अजून बरंच काही लिहिता येईल. पण मग मंडळी, या व्हिडियोची मजा किरकिरी होऊन जाईल आणि आम्हाला ते करायचं नाहीये. किंबहुना आपणही त्या व्हिडियोची मजा घ्यावी अस आम्हाला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. याचसाठी आमच्या टीमने हा व्हिडियो आपल्या वाचकांसाठी शेअर करायचं ठरवलं आहे. हा लेख संपल्यावर या व्हिडियोस आपल्याला पाहता येईल. आपल्या टीमने तर या व्हिडियोची मजा घेतली आहे. आता तोच निखळ आनंद आपणही घ्या. आपण एव्हाना हा व्हिडियो पाहिला असेल तरी पुन्हा एकदा पहा. एखादी छान, निरागस गोष्ट पून्हा पाहिल्याने आनंद द्विगुणीतच होईल. असो. मघाशी म्हंटलं ना, लिहायला लागलो तर बरंच काही लिहू शकतो आणि त्यात आपला वेळ जायला नको.
चला तर मंडळी, हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :