Breaking News
Home / मनोरंजन / ह्या छोट्या मुलीने पार्टीमध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, मुलीच्या स्टेप्स पाहून तुम्हीही कौतुक कराल

ह्या छोट्या मुलीने पार्टीमध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, मुलीच्या स्टेप्स पाहून तुम्हीही कौतुक कराल

लग्नाचे वायरल व्हिडियोज बघणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं. खासकरून मागील वर्षीपासून जी परिस्थिती आहे ती पाहता, लग्नाची निदान ऑनलाईन मजा तरी घेता यावी म्हणूनही अनेक जण हे व्हिडियोज पाहतात. यात सहसा नवरा नवरीने केलला डान्स हा प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. काही वेळेस आत्या, मावश्या, काकू यांचे डान्स ही वायरल होतात. तर कधी कधी मित्र मंडळींनी दिलेल्या अतरंगी गिफ्ट मुळे लग्नाचे व्हिडियोज वायरल होतात. पण आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो वायरल होण्याचं कारण यापैकी कोणीच नाहीये. तर आहे एक छोटी मुलगी. चला तर मग या व्हिडियोविषयी जाणून घेऊयात.

या व्हिडियोला आतापर्यंत जवळपास ५० लक्ष लोकांनी पाहिलं आहे. एवढ्या व्ह्यूजच कारण आहे या मुलीचा डान्स. यो यो हनी सिंघ यांच्या ‘दिल चोरी साड्डा हो गया, की करिये की करिये’ या सुप्रसिद्ध गाण्यावर ही मुलगी डान्स करत असते. तिचा आत्मविश्वास ही तिच्या व्यक्तिमत्वाला एक झळाळी देतो. त्यामुळे आजूबाजूला अनेक जण उभे असतात, येत जात असतात पण आपलं लक्ष तिच्या डान्सवर असतं.

सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत तिच्या सगळ्या स्टेप्स मस्तच होतात. काही वाक्य त्या गाण्यात पुन्हा पुन्हा येत असल्याने त्या स्टेप्स ही पुन्हा पुन्हा केल्या जातात. पण त्यात कुठेही अघळपघळपणा दिसत नाही. प्रत्येक वेळी ही मुलगी त्या स्टेप्स अगदी उत्तमरीत्या करते. तिला हे गाणं आवडत असावं आणि डान्सची ही आवड असावी हे कळून येत असतं. गाणं सुरू झाल्यापासून तिचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा असतो. डान्सर स्वतः उत्साही असेल तर त्यांना बघणारे प्रत्येक जण आपसूक त्या उत्साहात सामील होतात. इथेही तसच होताना दिसतं. तिच्या पाठीशी असणारा प्रत्येक जण या गाण्यावर डुलत असतो. तसेच समोर बसलेले ही प्रोत्साहन देत असतातच. तीन वेळा तर समोर बसलेली मंडळी येतात आणि काही पैसे तिच्यावरून दृष्ट काढावी तसे ओवाळून टाकतात. सहसा एखादा डान्स केलं की उत्तर भारतात हे असे पैसे ओवाळून टाकणं अनेकदा होतं. पण त्यावरून उपस्थितांना डान्स आवडला आहे याची पोचपावती मिळत असते.

आपल्याला ही तिचा आत्मविश्वासपूर्ण डान्स आवडतो. लहान असूनही अगदी बिनधास्तपणे तिने सगळ्यांसमोर उत्तम सादरीकरण केलं याबद्दल तिचं खूप कौतुक. येत्या काळातही ती तिचं हे डान्स कौशल्य जपत राहू दे ही सदिच्छा. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला आवडला असेलच.

सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार याची खात्री आहे. आपण नेहमीच आपल्या टीमच्या पाठीशी वाचक म्हणून उभे असता. सातत्याने नवनवीन लेख शेअर करत असता. कमेंट्स मधून सकारात्मक सूचना करत असता. हे सगळं प्रोत्साहनकारक आहे. यांमुळे नवनवीन विषयांवर लिखाण करण्याची ऊर्जा सतत मिळत राहते आणि उत्तम लिखाण होतं. येत्या काळातही हा सिलसिला कायम राहू दे आणि आपला स्नेह आमच्या टीमशी अजून वृद्धिंगत होउदे ही सदिच्छा. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *