Breaking News
Home / मनोरंजन / ह्या छोट्या शिवभक्ताच्या व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील मुलाच्या प्रेमात पडाल, बघा किती गोड बोलतो मुलगा

ह्या छोट्या शिवभक्ताच्या व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील मुलाच्या प्रेमात पडाल, बघा किती गोड बोलतो मुलगा

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र आणि भारताचं दैवत ! या देशात जन्मलेल्या प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी आपल्या महाराजांविषयी वाचावं अस वाटतं. त्यांच्या विषयी जाणून घ्यावे अस वाटतं. इतकंच काय तर अनेक परदेशी व्यक्तींना ही आपल्या महाराजांच्या कर्तृत्वाविषयी जाणून घ्यावे असं वाटतं. आणि या प्रत्येकाला महाराजांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ आयुष्यभर पडल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलेलं कार्य इतकं थोर आहे की आज इतकी शतके उलटून सुदधा त्या कार्याविषयी वाचताना मन भरून येतं आणि अभिमान वाटतो. त्यांनी केलेलं कार्य, त्यांची नीती, त्यांचं वागणं, त्यांचे थोर विचार हे आजही आपल्या मार्गदर्शनपर करणारे ठरतात. येत्या अनेक शतकांतही त्यांचं हे कार्य याचप्रमाणे आपल्या पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणारे ठरेल हे नक्की. अर्थात यासाठी नवीन पिढ्यांमध्ये अगदी लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं कार्य, यांच्याविषयी संस्कार केले तर ते पहिल्यापासून खोलवर रुजण्यास मदत होईल हे नक्की. किंबहुना आपल्यापैकी अनेकांनी आपल्या लहानग्यांना या मार्गाने शिकवण्यास सुरुवात केली आहे हे ही खरं !

नुकत्याच साजऱ्या झालेल्या शिवजयंती निमित्ताने अनेक आई वडील आणि त्यांच्या सोबतीने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले अनेक लहान मुलंमुली आपण बघितले असतीलच. त्यांचं राजांच्या रूपातील गोंडस स्वरूप पाहून त्यांची दृष्ट काढावी असंच वाटतं. त्यांच्या आई वडिलांनी तर हे नक्कीच केलं असणार ! बरं त्यात जी मुलंमुली चुणचुणीत असतात त्यांना अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराजांचं गौरव करणारं एखादं गीत वा कविता ही पालक शिकवताना दिसतात. सोशल मीडियावर या लहानग्यांचे व्हिडियोज बघायला मिळू शकतात. असाच एक व्हिडियो आज आमच्या टीमला बघायला मिळाला. खरं तर हा व्हिडियो तीन ते चार वर्षांपूर्वीचा आहे. पण त्यातील गोडवा आजही कायम आहे आणि या गोडव्याचं कारण आहे एक लहान बाळ ! अर्थात बाळ म्हणजे अगदीच बच्चू नाहीये, पण निदान बोबडे बोल बोलले जातील एवढं वय त्यावेळी होतं अस दिसतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला या बाळाची पहिली झलक बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जसा पेहराव असायचा त्याप्रमाणे या बाळाचा पेहराव केलेला दिसून येतो. डोईवर जिरेटोप, कपाळी चंद्रकोर, अंगात राजवस्त्र म्हणता येईल असा पोशाख आणि त्यावर मोत्यांचे दागिने असा एकंदर जामानिमा असतो. त्यामूळे बघताच क्षणी आपल्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित येतं जे पूर्ण व्हिडियो भर कायम राहतं.

इतकंच काय पण व्हिडियो संपून गेला तरी त्या गोंडस बाळाची ही छबी मनात कायम राहते. किंबहुना या बाळाचं ते रूप पुन्हा पुन्हा पाहावं आणि त्याचे बोबडे बोल कानात साठवत जावे असंच वाटतं. किंबहुना आपण तसं करतो सुदधा ! हा व्हिडियो एवढा गोड आहे की आपण हा वारंवार नक्किच पाहतो. पण केवळ या बाळाचं राजस रुपडं लक्षात राहतं का? तर ते लक्षात राहतंच आणि सोबतच त्याच्या बोबड्या बोलांनी ऐकू येणारी कवी भूषण यांची कविता ही आनंद देऊन जाते. आता कवी भूषण कोण आहेत हे काही वेगळे सांगायला नको. तसेच त्यांनी काव्यातून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे केलेले कौतुक ही आपल्या सगळ्यांना परिचित आहेच. त्यांनी रचलेली, ‘रघुकुल राज हैं’ ही कविता तर लोकप्रिय ठरली आहेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एका मालिकेचं ते शीर्षक गीतं ही होतं हे आपणास आठवत असेलच. हीच लोकप्रिय कविता आपल्याला या लहान बाळाच्या बोबड्या बोलांत ऐकायची संधी मिळते. बरं एवढ्या लहान वयातही ही कविता लक्षात ठेवल्याबद्दल या लहानग्याचं कौतुक वाटतं. तसेच प्रत्येक शब्दाबरोबर खुलत जाणारं त्याच हास्य आपल्या मनात ठसत. या व्हिडियोतील प्रत्येक क्षणाचं वर्णन करायला गेलं तर वेळ पुरणार नाही.

किंबहुना हा लेख एकवेळ लांबला तर चालेल पण आपली व्हिडियो बघण्याची जी उत्सुकता आहे त्याला नख लागेल असं वाटतं. त्यामुळे आम्ही या व्हिडियो विषयी लिहिण्याऐवजी आपणच या व्हिडियोचा आनंद घ्यावा. खास आपल्यासाठी म्हणून हा व्हिडियो आमची टीम खाली देईल. आपण या व्हिडियोचा आनंद घ्यावा. आमच्या टीमने या व्हिडियोस वारंवार बघून याचा आनंद घेतलाच आहे. त्याचवेळी म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी कळायला हवं आणि आपल्याला झालेला आनंद त्यांनाही व्हायला हवा. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.