Breaking News
Home / मनोरंजन / ह्या ज’पानी मुलींनी गायलेलं ‘जय जय महारा’ष्ट्र माझा’ हे गीत होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

ह्या ज’पानी मुलींनी गायलेलं ‘जय जय महारा’ष्ट्र माझा’ हे गीत होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

नुकताच महाराष्ट्र दिन संपन्न झाला. यंदा को’विड मुळे महाराष्ट्र दिनी आपण सगळेच घरी होतो. पण या दिवशी आपण एक गीत मात्र हमखास ऐकलं असणार. हे गीत म्हणजे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’.कै. शाहीर साबळे यांच्या स्वरांनी नटलेलं हे गीत. महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवणारं, आपल्या संस्कृतीचं दर्शन करून देणारं हे गीत. राजा बढे यांनी या गीताचे शब्द लिहिले आहेत. हे शब्द संगीतबद्ध केले आहेत श्रीनिवास खळे यांनी. संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या या त्रयीने या गीतांत खरंच आपल्या कौशल्याने जिवंतपणा आणला आहे. त्यामुळे कित्येक दशकांनंतर ही हे गीत आपल्या हृदयाच्या जवळ आहे आणि या पुढेही राहील. आज या गीताची आठवण व्हावी असा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. व्हिडियो तसा जुना आहे. जवळपास चार वर्षे जुना. यात आपल्याला तीन जपानी मुली एका रांगेत उभ्या राहिलेल्या दिसतात.

पाठीमागे एक तसबीर दिसते. या तसबीरीत आपल्याला दोन भारतीय व्यक्ती दिसून येतात. त्यावरून कदाचित हा भारतातील व्हिडियो असावा. अथवा परदेशातील भारतीय दूतावास वा इतर ठिकाणचा व्हिडियो असावा असं वाटतं. तसेंच कोणी तरी मोठी व्यक्ती भेटीस गेल्यावर त्यांचा सन्मान म्हणून हे गीत गायलं गेलं असेल, असं वाटतं. अर्थात या सगळ्या शक्यता आहेत. पण व्हिडियो कुठचाही भूमीतला का असेना, यातील जपानी मुलींनी गायलेलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं समोर बसलेल्या मराठी माणसांसाठी असणार हे नक्की. अर्थात मराठी भाषेत गात असताना काही उच्चार हे अगदी कौतुकास्पदरित्या छान असतात. पण काही मात्र थोडेसे गंमतीदार वाटतात. तसेच आलाप घेत असताना मात्र गंमतच वाटते. पण एक मात्र खरं. संपूर्ण व्हिडियोभर तिघींचे चेहरे हे हसरे असतात त्यामुळे अवघडलेपणा कमी होतो. तसेच देहबोली ही सकारात्मक भासते. बाकी संपूर्ण व्हिडियो मध्ये हातवारे वगैरे काही नाहीयेत. पण गाणं संपत असताना हातांचा वापर करत गाण्याचा समारोप केला जातो, ते छान वाटतं.

एकूणच बघायला गेलं तर या मुलींनी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. गायन कलेला भाषेचं बंधन असत नाही, असं म्हणतात. हा व्हिडियो त्याचंच एक उदाहरण म्हणूयात. आपल्या पैकी ज्यांनी हा व्हिडियो पाहिला असेल त्यांना हा व्हिडियो आवडला असेल. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आवडला असेल, अशी अपेक्षा आहे. खास आपल्यासाठी म्हणून मराठी गप्पाची टीम विविध विषयांवर लेखन करत असते. त्यात वायरल व्हिडियोज, मराठी कलाविश्व, सामान्य ज्ञान, वायरल बातम्या यांचा समावेश असतो. आपण या सगळ्यांचा आस्वाद घ्यावा ही इच्छा. तसेच आपल्याला आवडणारे लेख शेअर करायला ही विसरू नका. कारण त्यातून आपण आम्हाला प्रोत्साहन देत असता. आपला प्रोत्साहनपर पाठिंबा कायम राहू दे. लोभ असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ:

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *