Breaking News
Home / मनोरंजन / ह्या जिल्हापरिषदेतील शाळेच्या शिक्षकांची शिकवण्याची हि अनोखी पद्दत पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या जिल्हापरिषदेतील शाळेच्या शिक्षकांची शिकवण्याची हि अनोखी पद्दत पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आज आपल्या सगळ्यांचे व्हाट्सअप ग्रुप असतात. त्यात एक ग्रुप हमखास असतो. हा ग्रुप असतो शाळेचा. यात सहसा आपल्या इयत्तेत असणारी किंवा दहावीच्या वर्षाला एकत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा ग्रुप असतो. या ग्रुपवरून नेहमीच एक मेसेज हमखास फिरत असतो. यात आपल्या शाळेचं एखादं चिन्ह असतं वा फोटो असतो आणि खाली लिहिलेलं असतं – गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. आज मोठं झाल्यावर शाळेतल्या त्या आठवणींची किंमत कळते. रम्य ते बालपण हे पदोपदी जाणवून देतात त्या या आठवणी. या सगळ्या आठवणींना प्रामुख्याने जबाबदार असतात ते आपले शिक्षक. त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने शिकवलेलं आणि वागवलेलं असतं त्यानुसार आपल्या आठवणी असतात. अनेक शिक्षक आपल्याला एवढ्या मायेने वागवतात आणि तेवढ्याच प्रेमाने शिकवतात की ते आयुष्यभर लक्षात राहतात. आज एवढ्या उत्साहाने हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो.

हा व्हिडियो जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील आहे असं कळतं. या शाळेतील एका शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत केलेल्या डान्सचा हा व्हिडियो आहे. वरकरणी हा डान्स व्हिडियो दिसत असला तरी सुज्ञ वाचकांना हे नक्की कळून येईल की त्या लहान मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी गुरुजींनी केलेली ही एक नामी युक्ती आहे. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा वर उल्लेख केलेले गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी एका वर्गात जमलेले असतात. व्हिडियोच्या सुरुवातीपासूनच आपण गुराजींच्या आवाजात गाणं ऐकत असतो. गुरुजी एकदम झिंगाट स्टाईलने गाणं गात असतात. संगीत झिंगाट गाण्याचं असलं तरीही गाण्याचे शब्द हे गुरुजींचे असतात. हे शब्द निवडताना त्यांनी अगदी हुशारीने निवडलेले असतात. त्यात जसा मुलांच्या मानसिकतेचा विचार करून धमाल वाक्य असतात. त्याचप्रमाणे शाळेत येणं किती चांगलं आहे या भावनेची हुशारीने पेरणी केलेली असते. बरं शाळेत येताना मुलं कुठून येतात हे तर सांगितलेलं असतंच. सोबतच मुलांनी कसं यावं याचा वस्तुपाठ ही दिलेला असतो.

शाळेत येताना सगळं वाचून सावरुन यावं म्हणजेच दिलेला अभ्यास करून यावा हा अप्रत्यक्ष संदेशच म्हणायला हवा. बरं मुलं सुद्धा अगदी आनंदाने ही वाक्य म्हणत असतात आणि ते ही अगदी तालात. त्यामुळे नकळतपणे शाळेत जाणं चांगलं आहे हा विचार त्यांच्या मनात रुजत असणार हे नक्की. व्हिडियो सुरू झाल्यापासून जवळपास तीन मिनिटं आणि काही सेकंद चालतो. पण मंडळी ही तीन मिनिटं आणि त्यापुढची काही सेकंद तुम्हाला आनंदच देऊन जातात. होय, त्यातही शेवटची तीस सेकंद तर गुरुजी आणि विद्यार्थी हे केवळ झिंगाट होत नाचताना दिसतात. पण त्या ३० सेकंदांसाठी गुरुजींनी आधीची अडीच मिनिटं मस्तपैकी वातावरण निर्मिती केलेली असते. सोबतच ही वातावरण निर्मिती एवढी चपखल असते की मुलं अगदी मनसोक्तपणे नाचताना दिसतात. रंगून जातात अगदी. त्यांच्या मनात हा तास आजही घर करून राहिला असणार हे नक्की !

आणि अजून काही वर्षांनी जेव्हा त्यांचे ही चॅट ग्रुप्स असतील तेव्हा या डान्सची आठवण निघणार आणि त्या गुरुजींचे ते मनोमन आभार मानणार हे नक्की. खरं तर या व्हिडियो विषयी लिहावं अस बरंच आहे. पण या व्हिडियोविषयी तुम्ही केवळ वाचत बसण्यापेक्षा तो अनुभवावा असं आम्हाला वाटतं, म्हणून तूर्तास इथेच थांबतो. आपण हा व्हिडियो नक्की बघावा.

तसेच या लेखापूरता आपला निरोप घेण्यापूर्वी आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपण आपल्या टीमचे लेख मोठ्या प्रमाणात शेअर करत असता आणि आम्हाला कमेंट्स मधून प्रोत्साहन ही देत असता. या दोन्हीमुळे आम्हाला नवनव्या विषयांवर लिहिण्याची ऊर्जा सातत्याने मिळते आणि उत्तम लेखन होतं. तेव्हा आपला हा पाठिंबा आमच्यापाठी कायम असू द्या ही विनंती. आजही आपण हा लेख मोठ्या प्रमाणात शेअर करालच याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *