Breaking News
Home / मनोरंजन / ह्या जुळ्या भावंडांचा भांडणाचा व्हिडीओ होतोय वायरल, बघा हा क्युट व्हिडीओ

ह्या जुळ्या भावंडांचा भांडणाचा व्हिडीओ होतोय वायरल, बघा हा क्युट व्हिडीओ

वायरल व्हिडियोज बघणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं. किंबहुना आपल्या सगळ्यांना आवडतील असेच व्हिडियो वायरल होत असतात. पण तुम्ही एक गोष्ट त्यात नक्की बघितली असेल. बहुतांश वेळेस लहान मुलांचे व्हिडियोज वायरल होताना दिसतात. आजपर्यंत आपणही अनेक लहान बाळांचे वायरल व्हिडियोज पाहिले असतील. पण यातही जुळ्या बाळांचा वायरल व्हिडियो तसा दुर्मिळ म्हणावा असा प्रकार. आज आपल्या टीमने एक गोड व्हिडियो पाहिला आहे, ज्यात आपल्याला दोन जुळी भावंडं भेटतात. चला तर मग, या व्हिडियो विषयी अजून थोडीशी माहिती घेऊयात. तर हा व्हिडियो आहे निहांत चंद्रा आणि निधी कृष्णा या जुळ्या भावंडांचा. आज ही लहान मूल अदमासे पाच सहा वर्षांची असावीत. पण ती लहान असल्यापासूनच त्यांच्या आईने त्यांच्या बाललीला कॅमेऱ्यात टिपणं सूरु केलं होतं.

आपलं सुदैव असं की या बाललीला आपल्याला तेव्हापासून युट्युबवरून पाहता येतात. आम्ही ज्या वायरल व्हिडियो विषयी इथे लिहितो आहे तो ही जवळपास पाच वर्षे जुना आहे. तेव्हा अगदीच लहान मुलं होती ही दोघं. या जोडीतली निधी या व्हिडियोत आपल्याला दिसते ती मधाच्या एका छोट्या बॉटल सोबत. ती आपली त्या बॉटल सोबत खेळत असते. जवळच तिचा भाऊराया म्हणजे निहांत बसलेला असतो. नाव किती वेगळं वाटतं नाही. असो. तर आता ही दोन्ही जुळी भावंडं बसलेली असताना निहांतचं लक्ष त्याच्या दिदीच्या हाताकडे जातं. तिच्या हातातली मधाची बॉटल बघून निहांतला सुद्धा ती बॉटल हवी असते. पण निधी दीदी तर बॉटल न देण्याचा मूड मध्ये असते. मग काय दीदी हलकेच त्याला मारल्यासारखे करते. त्यावर त्याचाही रडल्यासारखा चेहरा होतो. आपण मात्र त्यांच्या या बाललीला बघून मस्त हसत असतो. आपल्या घरातील बाळांची यानिमित्ताने आठवण होते. काही वेळेस तर आपली भावंडं लहान असतानाच्या आठवणी मोठे दादा ताई म्हणून आपल्या मनात रुंजी घालू लागतात. इथे या दोघांची जुगलबंदी चालू असते. व्हिडियो च्या मध्यावर निधी ताई तिच्या बोबड्या बोलांनी आपल्या भावाला काही तरी सूनवते. आपल्याला तर काही कळत नाही, हसू मात्र येतं. पुढेही ताई मारल्यासारखं करते आणि दादा रडल्यासारखं. शेवटी कॅमेऱ्यामागून कोणीतरी येताना दिसतं तेव्हा निहांत तिकडे बघत रडल्यासारखं करतो.

तेवढ्यात दुसऱ्या बाजूने त्याला कोणी तरी उचलून घेतलेलं असतं. व्हिडियो संपतो आणि अजूनही ती बॉटल मात्र ताईच्या हातात कायम असते. अगदी गंमतीदार व्हिडियो. या विडियोतले दोघा छोट्यांचे हावभाव, देहबोली आणि न समजणारे पण गोड वाटणारे बोल आपल्याला आवडून जातात. त्यांची निरागसता या व्हिडियोतुन दिसून येते. हा वायरल व्हिडियो आपल्या टीमला तर प्रचंड आवडला. आज पाच वर्षात या व्हिडियोला जवळपास ३९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

तर अशा या लोकप्रिय व्हिडियो वर आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. वाचकांना जे आवडेल ते देण्याचा यशस्वी प्रयत्न आपली टीम नेहमीच करत आलेली आहे. कारण आपले लेख वाचून तुम्हाला काही क्षणांचा आनंद देता आला तर किती बरं हे आमचं म्हणणं असतं. पण असं असलं तरीही आपल्या पाठींब्याशिवाय सगळं व्यर्थ आहे. तेव्हा आपल्या टीमने लिहिलेले लेख शेअर करत रहा. तसेच आपल्याला या लेखातून काय आवडलं याविषयी कमेंट्स ही करत राहा. यातून आम्हाला प्रोत्साहन मिळतं. आपला लोभ मीडिया मराठी वर कायम असू द्या. मनापासून धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.