Breaking News
Home / मनोरंजन / ह्या जुळ्या भावंडांचे मोबाईसाठी झालेले भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या जुळ्या भावंडांचे मोबाईसाठी झालेले भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

भाऊ बहीण हे नातं म्हंटलं की त्यात प्रेम, राग, रुसवा, माया हे सगळं आलंच. वय कोणतंही असो, या नात्यातील वर उल्लेख केलेल्या गोष्टी कायम असतात. पण त्यामुळेच की काय हे नातं अधिक गहीरं होत जाते. याची सुरुवातच होते ती मुळात लहानपणापासून. त्यातही जुळी भावंडं म्हणजे तर धमालच म्हणावी. अशाच दोन जुळ्या भावा बहिणींचा एक वायरल व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. अगदी काही मिनिटांचा हा व्हिडियो आहे तसा पाच वर्षांपूर्वीचा. पण आजही हा व्हिडियो बघून मजा येते. आजपर्यंत तीन करोडच्या आसपास लोकांनी हा व्हिडियो बघितला आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी.

हा व्हिडियो आहे परदेशातील दोन जुळ्या बहीण भावांचा. त्यांच्या पालकांनी त्यांच्या आठवणींनी भरलेलं एक युट्युब चॅनेल तयार केलं आहे, त्यावर हा व्हिडियो बघता येतो. किंबहुना हा त्या चॅनेल वरील अगदी पहिला वहिला व्हिडियो आहे. तरीही त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या व्हिडियोत आपल्याला हे दोन जुळे बहीण भाऊ एका फोन वरून वाद घालताना दिसतात. दोघेही अगदी लहान असल्याने बोलणं होत नाही. जो वाद होतो तो केवळ रडणं आणि चेहऱ्यावरचे हावभाव यातून होतो.

व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा भावाच्या हातात फोन असतो. मग बहीण तो फोन घेते. त्या फोनला ती हातात घेते न घेते तोपर्यंत भाऊ तो फोन पुन्हा हातात घेतो. त्याच्या या कृतीमुळे ती बहीण अगदी कोसळतेच. तिला अगदी रडूच येतं. त्यात ती रडता रडता त्या फोनवर पडत असल्याने तिच्या भावाला ही तो फोन वापरता येत नाही. त्याच मग दुर्लक्ष झालं की ही बहीण तो फोन पुन्हा निरखु लागते. मग तो भाऊराया पुन्हा तो फोन हातात घ्यायचा प्रयत्न करतो. तो त्यात यशस्वी होतो तेवढ्यात पुन्हा तिचं घालीन लोटांगण सुरू होतं. एक क्षण असा येतो की एकदा तिच्या हातात आणि एकदा त्याच्याही हातात फोन असतो. दोघेही या फोनला निरखत असतात. त्यात काय आहे हे कळत नसेलही पण त्यांना त्याचं आकर्षण वाटत असतं हे नक्की.

अर्थात तो फोन धड काही कोणाच्या अखत्यारीत राहत नाही. कारण तो बहिणीकडे गेला की भाऊ ओढून घेतो. तर भावाकडे गेला तर बहीण थेट त्या फोनवरच डोकं टेकवून रडू लागते. जणू काही टेनिसची मॅच असल्यागत दोघांचा खेळ चालू असतो. शेवटी बहीण भावांमधलं कोणतंही भांडण कोण सोडवतं ते आपल्याला माहिती आहेच. एक तर आई किंवा बाबा.

या व्हिडियोचं चित्रीकरण या मुलांच्या आईने केलेलं आहे. ती तिथे उपस्थित असल्याने शेवटी तीच यात मध्यस्थी करायला येते आणि हा व्हिडियो संपतो. अवघ्या दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ असलेला हा भन्नाट व्हिडियो आहे. दोघा जुळ्या बहीण भावांची अगदी कमाल येते या व्हिडियोत. त्यात फोन हातात आल्यावर आणि फोन निसटल्यावर असणारे भाव तर कमाल. आपल्या टीमने तर या व्हिडियोची खूप मजा लुटली. त्यांच्या निरागस भांडणाने धमाल आणली. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्यालाही आवडला असणार हे नक्की.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार अशी अपेक्षा आहे. आपली टीम, आपल्या वाचकांना आवडतील असे विषय घेऊन लेख लिहीत असते. त्यात आपलं प्रोत्साहन मिळतच असतं. तसेच अनेक उपयुक्त सूचना ही आपण करत असता. त्यातून नवनवीन लेख लिहिताना अनेक सुधारणा करता येतात. तेव्हा आपल्याकडून प्रोत्साहन आणि सकारात्मक सूचना मिळत राहू देत ही सदिच्छा. आपला लोभ आमच्या टीमवर कायम असू दे. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *