आपल्या टीमने वायरल व्हिडियोज विषयी अगदी विपुल लेखन केलेलं आहे. आपणही ते आवडीने वाचलेलं आहेच. त्यात अनेक वेळेस लग्नाच्या वायरल व्हिडियोजविषयी लेख लिहिले गेले होते. पण त्यात बहुतांश वेळेस त्या लग्नातील नवरा नवरी हे आपल्याला डान्स करताना दिसून आले आहेत. आपल्या टीमने ही लेखांतून त्यांचं कौतुकच केलं आहे. आजही असाच एक वायरल व्हिडियो पाहण्यात आला. त्यातही एक जोडपं अगदी धमाल डान्स करताना आपल्या टीमने पाहिलं. पण या व्हिडियोचं वेगळेपण अस की हे काही त्या लग्नातील नवरा नवरी नव्हते. तर नातेवाईक किंवा स्नेही जोडपं होतं. पण त्यांच्या मस्त डान्स बघून वाटलं की चला आपल्या वाचकांना याविषयी सांगूया आणि त्यातूनच हा लेख लिहिला जातो आहे. चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडियोविषयी. हा व्हिडियो जवळजवळ तीन वर्षे जुना आहे. या काळात या व्हिडियोला जवळपास सत्तेचाळीस लाख लोकांनी पाहिलं आहे आणि त्याच प्रमाणात अनेकांनी पसंत ही केलं आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी.
तर, हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला या जोडप्यातील वहिनी आणि दादा दिसून येतात. गाण्याचं म्युझिक ही आपल्या कानावर पडत असतं. ओळखीचच गाणं वाटत असतं. पुढच्या काही क्षणांत यावर शिक्कामोर्तब होतं. ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ मधील ‘चलो इश्क लडाए सनम’ हे ते गाणं. रविनाजी टंडन आणि गोविंदाजी यांनी या गाण्यावर जो अप्रतिम डान्स केला होता त्याच्या आठवणी यानिमित्ताने ताज्या होतात. वर उल्लेख केलेले दादा आणि वहिनी आपल्या परफॉर्मन्स मध्ये अभिनयाची सुद्धा पखरण करतात. अगदी सुरवातीलाच त्याची चुणूक दिसून येते. त्यातून त्यांची गोड केमिस्ट्री दिसून येते. मग जेव्हा गाण्याचे बोल कानावर पडू लागतात तेव्हा या दोघांच्या विविध स्टेप्स ही बघायला मिळतात. अर्थात ही बाब मान्य करायला हवी की यात वहिनी अगदी आघाडीवर असतात. दादा ही मस्त स्टेप्स करत असतात पण त्यांच्या स्टेप्स कुठे तरी वहिनींच्या स्टेप्स वर आधारित असतात अस वाटतं. पण त्यांचा उत्साह मात्र जबरदस्त असतो. गाण्यातील शब्दांचा वापर करत ही हे दोघे मस्त स्टेप्स करत राहतात. तसेच स्वतःच्या स्टेप्स करण्यासोबतच मूळ डान्स परफॉर्मन्स मधील स्टेप्स करण्याचा ही प्रयत्न करतात.
हे गाणंच अस आहे की यातील काही वाक्यांवर ठराविक स्टेप्स करण्याचा मोह आवरत नाही. चलो इश्क लडाए या वाक्यावर दोन्ही हातांचा वापर करत केलेली स्टेप याच उत्तम उदाहरण आहे. आपणही कधी या गाण्यावर डान्स केला असेल तर ही स्टेप केली असेलच. हा व्हिडियो तसा पावणे दोन मिनिटांचाच आहे. पण त्यातील धमाल इतकी मस्त आहे की आपण आपसूक हा व्हिडियो निदान दोनदा तीनदा तरी पाहतोच. आपल्या टीमने तर हे केलंच आहे. आपणही जर का हा व्हिडियो पाहिलेला असेल तर आपणही केलं असण्याची शक्यता आहे. नसेलच पाहिला तर जरूर पहा. या जोडीचा मस्त डान्स अनुभवा.
सोबतच आपल्या टीमने लिहीलेला हा लेख आपल्यास आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असतात आणि यापुढेही देत राहतील. आपणही आमच्या पाठीशी असलेला आपला पाठिंबा कायम असू द्या. लवकरच एका नवीन विषयावरील लेखासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही वाचा. सगळे लेख आठवणीने शेअर ही करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :