Breaking News
Home / मनोरंजन / ह्या जोडप्याने लग्नामध्ये नवरा नवरीसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या जोडप्याने लग्नामध्ये नवरा नवरीसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आपली टीम वायरल व्हिडियोज विषयी लिहिते हे तर आपण जाणताच. किंबहुना वाचक म्हणून आपण आपल्या टीमला जे प्रोत्साहन दिलं आहेत त्यामुळे एवढं उत्तम आणि विपुल प्रमाणातलं लिखाण आपण करू शकलो आहे. त्यातही वायरल व्हिडियोज वरील लेखांना आपली विशेष पसंती लाभली आहे, हे पाहून आनंद होतो. आता आणि यापुढेही आपला हा पाठिंबा आपल्या टीमच्या पाठीशी राहील हे नक्की. या सगळ्या प्रवासात एक बाब आपण लक्षात घेतली असेल की, एखादा व्हिडियो छोटा असेल तरी चालेल पण मनोरंजक असला तर वायरल होतोच. काही व्हिडियोज मोठे असतात आणि त्यात गंमतीचा भाग असतोच. पण काही व्हिडियोज अगदी छोटे पण तेवढेच मनोरंजक असतात. आज आपल्या टीमने असाच एक छोटा पण मस्त असा व्हिडियो पाहिला. तुम्हाला यावरील लेख वाचायला आवडेल असं वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे.

हा व्हिडियो आहे एका लग्नाताला. यात जी वधू आहे तिचं नाव अफ्रोजा असं आहे. तिच्या युट्युब चॅनेल असून त्यावर आपल्याला हा व्हिडियो बघायला मिळतो. तिच्या लग्नात तिच्या नातेवाईकांपैकी असणाऱ्या एका जोडप्याने जो डान्स केला तो वायरल झाला होता. हे जोडपं ज्या गाण्यावर डान्स करतं ते गाणं म्हणजे ‘राधिका के डॅडी’ हे हम साथ साथ हैं चित्रपटातलं गाणं. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा दोघेही डान्स फ्लोअर वर गाण्याची सुरुवात होण्याची वाट बघत उभे असतात. दादा एकदम मस्त भारी अशा सूट मध्ये असतात तर वहिनी अगदी छान डिझायनर कपड्यात. समोरच नवरा आणि नवरी पण बसलेले असतात. ते ही अगदी राजेशाही पेहरावात. एकंदर मस्त माहोल असतो. सोबतीला नातेवाईक आणि मित्रमंडळी ही उत्साह वाढवायला असतातच. गाणं सुरू होतं आणि हे जोडपं डान्स करू लागतं. त्यांच्यातली केमिस्ट्री आपल्याला आवडून जाते. काही स्टेप्स अगदी ठरवल्याप्रमाणे करत तर कधी मोकळेपणाने नाचत हे जोडपं एकेका कडव्यावर मस्त डान्स करत असतं. आपल्याला आठवत असतील तर गाण्यातील कडवी सुद्धा एकेक लक्षात राहावी अशीच आहेत. त्याला या दोघांची जोड मिळाल्याने यांचा डान्सही लक्षात राहतो.

जवळपास दोन मिनिटांपेक्षा कमी असा हा व्हिडियो आहे. पण यातील डान्स, दोघांची सकारात्मक ऊर्जा आणि नवरा नवरीची प्रसन्नता ही आपल्या लक्षात राहते. खरं तर आपण नीट बघितलं तर लक्षात येतं की यात जो नवरा मुलगा असतो त्याचा उत्साह ही वाखाणण्याजोगा असतो. नवरी मुलगी ही आनंदात आणि उत्साहात असलेली दिसून येते. एकंदरच हा व्हिडियो छोटा असला तरी खूप सारी ऊर्जा आणि प्रसन्नता देऊन जातो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याही आवडीस उतरला असेल.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे आपला पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण कमेंट्स मधून आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता. तसेच आपले लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करत असता यातून आम्हाला जी सकारात्मक ऊर्जा मिळते त्याचं वर्णन करता येत नाही. तेव्हा आपला हा लोभ आपल्या टीमच्या पाठिशी कायम असू द्या ही सदिच्छा. आपल्या पाठिंब्यासाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.