Breaking News
Home / मनोरंजन / ह्या ट्र’क ड्रा’इवर भाऊंनी ज्याप्रकारे उत्तरे दिलीत ते पाहून हसू आवरणार नाही, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या ट्र’क ड्रा’इवर भाऊंनी ज्याप्रकारे उत्तरे दिलीत ते पाहून हसू आवरणार नाही, बघा हा वायरल व्हिडीओ

व्यक्त होणं ही प्रत्येक माणसाची गरज असते. पण प्रत्येक जण म्हणावा तसा व्यक्त होतोच असं नाही. प्रत्येकाला ते जमतच असं नाही. पण काहींना मात्र ते अगदी उत्तम रित्या जमतं तर काहींचा प्रयत्न उत्तम असतो. यातील काही जणं असेही असतात की ज्यांच्या व्यक्त होण्याने आपली मात्र हसून हसून पुरेवाट होत असते. आज हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला वायरल व्हिडियो. गेले काही दिवस आपल्या टीमने लग्नातील वायरल व्हिडियोज विषयी एवढं लिहिलं आहे, की आम्हालाही थोडा वेगळेपण हवा होता. वाचक म्हणून तुम्हाला ही काही तरी वेगळं वाचावसं वाटत असणार. मग काय, आपली टीम लागली कामाला आणि त्यात हा व्हिडियो पुन्हा एकदा नजरेस पडला. हा व्हिडियो आहे तरी काय. तर एका ट्रक चालक दादांनी चारोळ्यांमार्फत स्वतःला व्यक्त केलंय या व्हिडियो मार्फत. अगदी जमतील तेवढी सगळी यमकं जुळवून ते स्वतःला व्यक्त करत असतात.

यात सोबतीला आहेत अजून एक दादा. जे ट्रक बाहेर उभे राहून संवाद साधताहेत, असं दिसून येतं. यात त्यांची भूमिका महत्वाची ठरते. कारण ते या संपूर्ण व्हिडियोत तीन प्रश्न विचारतात आणि त्यांना उत्तरं म्हणून आपले ट्रक वाले दादा व्यक्त होतात. पहिला प्रश्न असतो, काय भरलंय रे ट्रक मध्ये ? मग ट्रक वाले दादा उत्तरतात. गाडी मध्ये रेती भरली आहे आणि मग पुढच्या वाक्यांपासून यमकांची जी काही जुळवा जुळव करतात की हसुन हसून पुरेवाट होते. यात ते त्यांची कैफियत मांडत असतात पण गंमतीशीरपणे. पण पुढील दोन प्रश्नांतून जसे गंमतीशीर यमक जुळून येतात तसेच त्यांच्या आयुष्यातले काही विषय सुदधा अधोरेखित होतात. जेव्हा बाहेरचे दादा विचारतात की लाऊ का काटा? तेव्हा मालकाचा झालाय घाटा या वाक्यापासून पुढे त्यांना काय काय सहन करावं लागतं हे कळतं. पण साहेब संध्याकाळी भेटा तुम्हाला देतो एक फेटा हे मात्र आवडून जातं अगदी. या दुसऱ्या प्रश्नावरून मग तिसरा आणि शेवटचा प्रश्न येतो. पण त्यातही आपले ट्रक वाले दादा काही मागे हटायला तयार नसतात.

आपलं म्हणणं जोरकसपणे आणि यमक जुळवून मांडता मांडता एक क्षण असाही येतो जिथे यमक जुळवणं संपतं आणि व्हिडियो सुद्धा. खरं तर केवळ सवा मिनिटांचा हा व्हिडियो. पण त्यात ट्रकवाल्या दादांनी यमक जुळवत केलेल्या चारोळ्या पूर्णपणे भाव खाऊन जातात. तसेच समोरील व्यक्तीस दाद न लागू देण्याचा पण तरीही वातावरण गंमतीदार राहील, हे बघण्याचा त्यांचा स्वभावही लक्षात राहतो. ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणं हे किती अवघड आणि मेहनतीचं काम असतं हे काही वेगळं सांगायला नको. सततचा प्रवास, धड जेवण नाही, लोकांकडून धड वागणूक नाही अशा परिस्थितीतही आपले ट्रक चालक बंधू आपापली कामं चोखपणे पार पाडत असतात. त्यांच्या कष्टाचं कौतुक फार थोड्या लोकांना असतं. या थोड्या लोकांमध्ये अर्थातच आपली मराठी गप्पाची टीमही समाविष्ट आहे. कारण मेहनत करणाऱ्या प्रत्येक माणसाविषयी आम्हाला आदर आहे. त्यात या दादांनी आपल्या यमक जुळवण्याच्या कलेने आमचं तर मन जिंकलं बुवा. त्यांनी केलेल्या मनोरंजनामुळे काही घटका तरी प्रसन्न गेल्या हे नक्की. त्यांच्या विनोदी वृत्तीला सलाम.

आपल्याला हा लेख आवडला असेल, तेव्हा शेअर करा. इतकंच नाही, तर आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही आवर्जून वाचा. कारण हे सगळे लेख आपलं मनोरंजन डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेले आहेत. आपण आनंदी असलात की आपली टीमही आनंदात असते. आपला आंनद आपल्या लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स मधून व्यक्त होतो. आणि आपल्याला तर माहिती आहेच. व्यक्त होणं ही आपली गरज आहे. तेव्हा मराठी गप्पाचे लेख शेअर करत राहा, व्यक्त होत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *