Breaking News
Home / मनोरंजन / ह्या ट्रॅफिक पोलीस भाऊंचा व्हिडीओ होतोय वायरल, टॅलेंट पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या ट्रॅफिक पोलीस भाऊंचा व्हिडीओ होतोय वायरल, टॅलेंट पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

सोशल मीडियाचे जग मजेदार व्हिडीओंने भरलेले आहे. दररोज हजारो लाखो व्हिडीओ येथे पाहिले आणि अपलोड केले जातात. त्यांपैकी काही खरोखरच खूप मजेदार असतात, जे आपलं मनोरंजन करतात. म्हणून मग आपण त्यांना सारखेसारखे पाहतो, एवढेच काय तर आपण आपल्या मित्रांना देखील पाठवतो आणि या व्हिडीओंचा आनंद लूटतो. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरतात. म्हणजेच काही व्हिडीओ हे आपल्याला शिकवण देणारे, धडा देणारे असतात. हे व्हिडीओ गंभीरपणे पाहिले जातात. पण आपण शेवटी पडलो भारतीय लोकं… मनोरंजन सोडून आपलं लक्ष काय दुसरीकडे जात नाही. मग असाच मनोरंजन एक व्हिडीओ आमच्या टीमकडे आला. कायम मनोरंजन करणारे व्हिडीओ बघणारे आम्ही हा व्हिडिओ पाहून शॉक झालो. कारण यात चक्क पोलिसाने आपली कला दाखवली होती.

आता पोलीस म्हटलं अनेकांची भीतीने गाळण उडते. कडक स्वभाव, रागीट चेहरा आणि पोलीस म्हटलं की सगळ्यांना आधी भ्रष्टाचार आठवतो. पोलीस म्हटलं की ट्रॅफिक सिग्नल आणि तिथे पावती करणारा पोलिसमामा आठवतात. मात्र दुसऱ्या बाजूला पोलिसांची इमेज आपणच अशी आपल्या मनात बनवून घेतलेली आहे, हे आपल्या लवकर लक्षात येत नाही. मात्र या सगळ्यांना छेद देणारा एक व्हिडिओ आपल्यासमोर आला आहे. यात एका पोलीस मामाने आपली अशी कला दाखवली आहे, ती पाहून सगळे चक्क नाचू लागले. तर भावांनो… विषय असाय की, एके ठिकाणी भलं मोठं पब्लिक गोळा झालं होतं. नाचगाणी, मजा, मस्ती चालू होती. अशातच एन्ट्री झाली एका पोलिसाची. त्यातही युनिफॉर्म घालून ड्युटीवर असलेला पोलीस आला म्हणून सगळे शांत झाले. आता काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना त्या पोलिसाने थेट माईक हातात घेतला आणि मग सुरू झाला धिंगाणा…

या पोलिसाने सुरुवात धमाकेदार केल्याने सगळीकडे रंगत आली आणि पुन्हा या माहोलमध्ये लहान मुलांपासून तर आबाल वृध्दांपर्यंत सगळे नाचू लागले. व्हिडीओत तुम्हाला दिसून येईल की, सगळ्यांना आपलेसे करून हे पोलीस मामा गाणं गात आहेत आणि पब्लिक त्यांच्या गाण्यावर तुफान डान्स करत आहे.
‘जट यमला पगला दिवाना’ या गाण्यावर ज्या पद्धतीने हे पोलीस मामा गायले आहेत, ते पाहून आम्हीही त्यांचे फॅन झालो. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून लोकांना हे सुरेल गायन आवडले आहे. हा व्हिडीओ मुंबईचा असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी एकदम भन्नाट अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘उत्तम! फार वाद्ये नसताना पण आपण जे संगीत कौशल्य दाखवले, त्यासाठी स्टँडिंग ओव्हेशन!’ दुसर्‍याने लिहिले, ‘उत्तम कामगिरी, इतके चांगले गाणे, तेही पोलीस मामांच्या तोंडून ऐकून नाचायची इच्छा होते’.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *